नमस्कार मंडळी.
आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर दिनांक २९ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या “माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो” या यश कथेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत. आतापर्यंत १४१ वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
माधवदादांच्या यश कथेतून आजच्या जगासाठी पुढील महत्वाचे संदेश दिल्या गेले आहेत, असे मला वाटते.
१) परिस्थितीला शरण जाऊ नका.
२) आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अपरंपार प्रयत्न करीत रहा.
३) आपल्या आई वडिलांना, ज्यांनी आपल्याला घडण्यास मदत केली आहे, त्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगा.
४) आपल्या गावाला,जुन्या मित्रांना कधी विसरू नका.
५) आपली मातृभाषा,संस्कृती याचा नेहमी अभिमान बाळगा.
६) आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे. ती व्यवस्थित पार पाडा.
७) आपण समाजाचे देणे लागतो, हे लक्षात ठेवून चांगला समाज / जग घडण्यासाठी यथाशक्ती कार्यरत रहा.
८) आपले आरोग्य आपणच जपले पाहिजे. त्यासाठी आपला आहार, विहार योग्य राहू द्या.
९) आपल्याला काही छंद असले पाहिजे आणि आपण ते जोपासले पाहिजेत.
१०) दुसऱ्याला आनंद देत राहिलात की आपलाच आनंद वाढत राहतो.
मला वाटते, उपरोक्त दशसूत्री ही जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती कुठल्याही धर्माची, वंशाची, देशाची,वयाची असली तरी लागू पडते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आजचा परवलीचा शब्द म्हणजे, “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” कितीही प्रगत झाले तरी ही जीवनमूल्ये, गुण हे सनातन असतात, हेच माधव दादांच्या जीवन कथेवरून दिसून येते. ही मूल्ये मानतच आपण आपले जीवन कंठीत राहिलो तरच आपल्याला खरे सुख, समृद्धी लाभेल, केवळ भरपूर पैसे कमावून नाही, हा त्यांच्या जीवनाचा संदेश, अशी मूल्ये मानत असलेल्या वाचकांना भावला आहे, हेच त्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या की लक्षात येते.
माधव दादांचे आणि आणि सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (लेखक/संपादक)
१
“माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो” ….
माधवजींची ओळख होणं हे आमचं खरंच भाग्य आहे. त्यांची असामान्य ऊर्जा, निःस्वार्थ सेवाभाव आणि दररोज इतरांसाठी सज्ज असलेली वृत्ती — याचं आपण सर्वांनी अनेक वेळा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. कोणताही गवगवा न करता, अत्यंत साधेपणाने आणि आत्मीयतेने ते सतत मदतीसाठी पुढे सरसावतात. दहा हजार किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीने त्यांच्या कार्याची घेतलेली ही लहानशी लेखरूप दखल, त्यांच्या प्रभावाची साक्ष देणारी आहे. खरंच, माधवजी MMC मध्ये असणं ही एक मौल्यवान गोष्ट आहे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि मनःशांती लाभो, हीच अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. “जीवन हे इतरांसाठी केलेल्या सेवेनेच महान बनते.” :गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
— Dr. Rajiv G. Chicago
२
Very inspiring life story, dada . Thank You for sharing and very humbling!! It’s an honor to know you in person and grateful to MMC to be able to partner w/u on many initiatives .
— Rajesh H. Chicago
३
Very inspiring Madhav Dada
— Sidhhesh S. Chicago
४
खूप छान
— रामदास. राजगुरूनगर
५
Congratulations .
— Gopal S. Solapur
६
श्री माधवराव गोगावले तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. तुमचे जीवन हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जीवनात तुम्ही अनेक क्षेत्रात चमकले आहात, तसेच अनेक देशांचा प्रवासही केलेला आहे, खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेत असता आणि तेही अमेरिकेत. शुद्ध मराठीत सांगायचे म्हणजे प्रतिभेचा अविष्कार तुम्ही प्राप्त केला आहे.
— बाजीराव बो. पुणे
७
अरे व्वा व्वा! माधव दादा.. मला तुमचा सार्थ अभिमान आहे well deserved.
— उर्मिला, शिकागो.
८
दादा आपला जीवनप्रवास वाचुन छान वाटलं. मला आठवतंय एकदा तुम्ही अमेरिकेला गेल्यानंतर कोरेगावला गावी आला होता आणि तुमच्या वाड्यातील माडीवर लोक जमले होते. तेव्हा आपण अमेरिकेत काय काय आहे वगैरे सांगितले होते. तो काळ जवळजवळ 40 वर्षांपूर्वीचा असावा. मी नववीत होतो. तेव्हापासून आमच्या समोर तुम्ही एक आदर्श आहात. गावची व्यक्ती म्हणजे अभीमान वाटणारच. आपला जीवन प्रवास, आपले विचार-आचार खुप प्रेरणादायी आहेत. आपला कृषी क्षेत्रातुन संगणक क्षेत्रात जाण्याचा निर्णय कालानुरुप अतिशय योग्य वाटला. आपल्यानंतर गावातील कोणीही अमेरिकेत जाऊन शकले नाही ही उणीव आपल्या प्रेरणेने भविष्यात नवीन पिढी भरून काढेल हीच एक अपेक्षा…. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा.
— एम बी डावरे. कोरेगाव बुद्रुक
९
ग्रेट ! हार्दिक अभिनंदन दादा ! खूपच अभिमानास्पद !
— मिनाक्षी. मुंबई
१०
Great, proud of you Madhavrao.
— Avinash. Nashik
११
Great अभिमानास्पद
— Sangeeta R., Thane
१२
We are proud of you. Great feeling. Most beautiful journey and best wishes for both of you.
— Chaitali T. Takalkarwadi, Rajgurunager
१३
Abhinandan Madhav Dada
— Vrushali A., Chicago
१४
Wow. Hearty Congratulations Madhav Dada. Your journey is very inspiring for future generations.
— Aniruddha D., Chicago
१५
श्री माधवराव आपल्यावरील लेख खरोखरच फार सुंदर आहे. आपला अनुभव, आपल्या देशाबद्दल असणारी बांधिलकी ,आपली संस्कृती, आपले सण, आपले देव देवता या सर्वांच्या बद्दल तुम्ही भरभरून लिहिले आहे. तुमच्या मध्ये खरा एक राष्ट्र अभिमानी दडलेला आहे तो कसा असावा याचे उत्तर, उदाहरण आपल्याकडे पाहिल्यावर कळते. आपली संस्कृती, आपली भाषा, आपला देश, आपली माणसं या सर्वांवर तुम्ही परदेशात राहूनही भरभरून प्रेम करीत आहात. तुम्हाला घडविणाऱ्या प्रत्येकाचा उल्लेख या लेखामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपणाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. शेवटी एवढेच म्हणावे असे वाटते “दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे युती जुळती”
— तुकाराम. चाकण
१६
खूप छान
— विद्या. शिकागो
१७
अरे वा, एकदम जबरदस्त ! खूप छान लेख ! अभिनंदन, माधव दादा!
— चेतन. शिकागो
१८
Very good journey, Madhavrao.Really inspiring. श्री माधवराव सलाम आपल्या कर्तुत्वाला.
— जितेंद्र. पुणे
१९
Congratulations,
Madhavarav.
— Shirish G., Chicago
२०
अरे वा वा, माधवदादांची नव्याने ओळख झाली. Thanks for sharing.
— Vaishali B., Chicago
२१
अभिनंदन, आभार आणि अनेक शुभेच्छा .
— अजित. शिकागो
२२
Vaa mast !
— Rajendra D., Pune
२३
Great
— Deepak S., Dubai UE.
२४
Madhav dada,
I am proud of you !
— Rashmi V., Nanded
२५
Bahot badhiya .
I am proud of you dear Madhav
— Mahendra N., Pune
२६
अभिनंदन माधवराव.
— श्रीधर दामले. शिकागो
२७
Namaskar Madhav dada – tumachya var lihilela lekh vachala! Apratim! Shree ani Ram sarakhya mulanich nahi tar amhi suddha tumachya sarakhi jidda jopasali pahije!
— Shalaka R., Chicago
२८
अभिनंदन माधवदादा !
— Archana S., Chicago
२९
Many congratulations, this is awesome Madhav Dada. Best wishes for the future
— Vivek W., California
३०
माधवदादा आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. हार्दिक अभिनंदन.
— आनंद. खेड
३१
Very very proud of you baba
— Hritik B. Navi Sangavi
३२
प्रवास खरोखरच उल्लेखनीय होता…. लहानशा गावापासून जगातील एका मोठ्या शहरापर्यंत… अविस्मरणीय प्रवास. One of gems of koregaon…khed taluka and pune district…like Babanrao Daware….Damaji Koregaonkar….Madhav gogavale.
— Vishwas D., Koregaon BK
३३
जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कोरेगावचे सुपुत्र श्री माधव गोगावले साहेब यांचा अविस्मरणीय प्रवास व यशस्वी वाटचाल आमच्यासारख्या लोकांना प्रेरणादायी, स्फूर्तीदायी ठरतात. श्री.माधव गोगावले साहेब व सौभाग्यवती यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
— गोपीराज. शेलू
३४
अत्यंत प्रेरणादायी प्रवास सर
— गाडे. कोरेगाव बुद्रुक
३५
Madhav ji, Thank you for sharing. Congratulations! All round personality. Nice to see people from India are noticing your social work.
— Deepak C., Chicago
३६
Congratulations Gogawaleji. Great journey
— Surendra I. Solapur
३७
लय भारी…..!!!
— यादवराव. सातारा
३८
Congratulations !!!
— Gorakshanath. Shrirampur
३९
Good morning Madhavji. Very impressive write up about your life, hard work, dedication towards whatever field you choose. Both of you and Jyoti are a good natured, friendly and caring couple. We are fortunate to meet you at various functions and chat with you both. Thanks for all the work you do for communities. Wishing you both a long and happy married life.
— Rajashree A., Chicago
४०
हरे कृष्ण ! माधवराव लई भारी GREAT. आपण मनापासून मराठीपण जपलय याचा खूप अभिमान वाटतोय. मी आपल कौतुक करतो. तुमचा आजपर्यंतचा जीवनप्रवास श्री देवेंद्र भुजबळ यानी प्रकाशित केल्यामुळेच आपल्या कार्यकर्तृत्वाची खोल ओळख आम्हास झाली आहे. आपला हा जीवनपट इतरांना प्रेरणा देईल असाच आहे. आपण उभयंतास आरोग्यदायक दिर्घायुष्य लाभावे व अधिक सत्कार्य घडावे यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व शुभेच्छा देतो.आपल्या या कार्यकर्तृत्वाबद्दल मी श्री देवेंद यांना अगोदरच अभिप्राय दिला आहे तसेच त्यांनी दिलेली लिंक मी माझ्या मित्रांना शेअर केली आहे. असो. सौ.वहिणींचेही निश्चितच कौतुक. त्यांना माझा नमस्कार
— आपला वर्गमित्र.
जगन्नाथ शंकर ढिकले. नाशिक
४१
खूप छान वाटलं हा लेख वाचून. आतापर्यंत माहिती नसलेली सगळी पार्श्वभूमी समजल्यानंतर तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटला. अतिशय प्रेरणादायक लेख आहे. पाठवल्याबद्दल धन्यवाद!
— Juilee S., Naperville – Chicago
४२
विलक्षण प्रेरणादायी !!!! आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची चपखल शब्दांत करून देण्यात आलेली ही ओळख केवळ अतुलनीय. आपल्याला यापुढेही अशा बहुविध कार्यासाठी शुभेच्छा आणि त्यासाठी उत्तम आरोग्य लाभो ही शुभकामना.
— स्वाती. औंध
४३
श्री माधवराव गोगावले यांच्या प्रेरणादायी जीवनाचा गोषवारा वाचून महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील घरातून बाहेर पडून आपल्या कर्तृत्वावर अमेरिकेतील संधीच्या भूमीत नाव आणि प्रतिष्ठा कमावली. सामाजिक कार्यक्रमात संचालन केले ही विशेष गोष्ट आहे. काही महिन्यापूर्वी शिकागो महाराष्ट्र मंडळातील इतिहास प्रेमींच्या करता नरवीर तानाजी मालुसरे यांचे सिंहगडावरील शौर्यगाथा आणि महाराणा प्रताप यांच्या हळदी घाटातील युद्ध यावरील प्रेझेंटेशन मी सादर करताना सूत्रसंचालन त्यांनी केले होते ही माझ्या संदर्भातील आठवा जरूर उल्लेखित कराशी वाटते.
— विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
४४
Congratulations, Madhav dada. It is a very inspiring and well written article about you. Thank you for sharing and all the good work for our community
— Brijen S. Chicago
४५
That’s wonderful, I had no idea that an article on you would be included in that book ! I would love to read.
— Aditye G., Dallas
४६
Congratulations Madhavdada .
— Laxmi D., Chicago
४७
Congratulations, Madhavdada.!!!
— Vandana P., Chicago
४८
अप्रतीम लेख…
खूपच प्रेरणादायी जीवन प्रवास…खूप खूप अभिनंदन आणि भावी आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य ह्या साठी ईश्वर चरणी प्रार्थना..
— आशिष. पुणे
४९
खूप छान माधव दादा thank you for sharing .
— Harsha T. Chicago
५०
Congratulations Madhavdada.
— Pallavi B., Chicago
५१
माधवराव आपला जीवन पट खरोखरच अवर्णनीय असाच आहे. श्री.देवेंद्र भुजबळ यांच्या माध्यमातून तो सर्व सामान्यांपर्यंत पोहोचला. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे की आमच्यासारखाच आमचा एक सामान्य मित्र अशी अनन्यसाधारण कामगिरी करून अत्युच्च शिखरावर पोहोचतो. आपल्या या कष्टप्रद व अतुलनीय जीवनप्रवासास आमचा मानाचा मुजरा. उर्वरित आयुष्य असेच दैदीप्यमान जावो व आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.
— दिलीप. पुणे
५२
Dear Madhav, you are GREAT. We are proud of you.
— Chandrakant P., Jalgaon
५३
Congratulations Madhav Dada !!
— Arundhati J., Chicago
५४
Wow ! Great Madhavbhai.
— Pauravi S., Munster,
५५
Very Inspiring.
— Gaurav P., Pune
५६
Congratulations! Madhav. I am really proud of you, keep it up. All the best
— Tanaji K., Pune
५७
नमस्कार माधवराव. आपण कृषि महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घेतला त्यावेळी आम्ही तिसऱ्या वर्षांत होतो. त्यावेळी एक हुशार विद्यार्थी आला म्हणून आनंद झाला होता. त्यापेक्षाही आज तुमची जीवन-यात्रा वाचून झाला. त्यात तुम्ही चिन्मयानंदांच्या अध्यात्मिक वाङ्मयाचा अभ्यास – प्रचार करता हे वाचून त्या आनंदात अजूनच भर पडली. असो. आद्य श्री शंकराचार्यांच्या आत्मबोधाचा भावार्थ माझ्या हातून लिहिला गेला आहे. तो आपल्या तेथील मराठी माणसांसाठी पाठवित आहे.
— श्रीराम. पुणे
५८
देवेंद्र यांचे अभिनंदन व आभार. त्यांच्या लेखामुळे आपला दैदीप्यमान यशस्वी जीवनाचा आलेख आम्हाला वाचायला मिळाला आणि मनापासून अभिमान वाटला तुमच्यासारख्या थोर व्यक्तीमत्वाचा
— मिनाक्षी. हडपसर, पुणे
५९
माधव दादा, आपली यशोगाथा निश्चितच सर्वांना प्रेरित करणारी आहे आणि अभिमानास्पद आहे.
— अर्चना. ठाणे
६०
लहानपणी अण्णांविषयी आम्हाला खूप उत्सुकता वाटायची. कारण कोरेगावातून कुणी तरी अमेरिकेत गेलंय आणि तिथं राहायला लागलंय हीच गोष्ट आम्हाला मोठी वाटायची. ते खूप दूर राहत होते, पण मनानं ते नेहमी गावातच होते.मी अनेकदा आजोबांकडून त्यांचं कौतुक ऐकल आहे. अण्णांचा स्वभाव शांत आणि समजूतदार. त्यांनी शिक्षण घेतलं, मेहनत केली आणि परदेशात यश मिळवलं. पण गावातल्या लोकांचं दुःख, त्यांचा संघर्ष ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळेच आम्हा तरुणांना ते नेहमी प्रेरणा वाटतात. मागे अनेकदा त्यांच्याशी व्हॉट्स अप द्वारे कॉल झाले.त्यांचा एक व्हिडिओ देखील मी आजोबांसंदर्भात घेतलाय.
खूप छान व्हिडिओ दिला होता. त्यांचे विचार “साध्या घरात जन्मलो म्हणून काही कमी नाही. मेहनत केली, चिकाटी ठेवली तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. फक्त पैसा कमावणंच महत्वाचं नाही. आईवडिलांची सेवा, कुटुंबाशी प्रेम आणि संस्कार यातही आयुष्यात खरं समाधान मिळतं.”
“आपल्या यशात देव आणि आपल्या जोडीदाराचाही मोठा वाटा असतो. नवरा व बायकोमधलं प्रेम, समजूत आणि आदर खूप महत्त्वाचं असतं.” अशा साध्या पण खूप खऱ्या गोष्टी ते वारंवार सांगत असतात.अण्णा, तुमचं आयुष्य आणि विचार आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहतील. तुमच्या कामासाठी मनापासून शुभेच्छा!
— अविनाश डावरे. कोरेगाव बुद्रुक.
६१
आदरणीय अण्णा अर्थात राजमान्य राजश्री मा.श्री.माधवराव गोगावले यांस सप्रेम नमस्कार वि. वि. शिकणाऱ्या सर्वांसाठी आपला जीवनप्रवास खूपच प्रेरक आहे. तुमच्याकडे पाहून किंबहुना तुम्हाला आदर्श मानून कोरेगावमधील अनेक युवक- युवती या शिकल्या आणि शिकत आहेत. केवळ अमेरिकेत आपण गेलात हेच अप्रूप नव्हतं तर आपण अमेरिकेत राहूनही भारतीय संस्कृती जोपासत ती सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहात हे विशेष उल्लेखनीय. फक्त रोजीरोटी, पैसे कमावणे यापलीकडे जाऊन आपण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, इत्यादी क्षेत्रातदेखील बहुमोल योगदान देत आहात हे अत्यंत अभिमानास्पद आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषद गाजवली होती आपण शिकागोमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत स्वामी विवेकानंदांचा वारसा जपत आहात हेदेखील आम्हा कोरेगावकरांसाठी आणि भारतवासीयांसाठी गौरवास्पद आहे. आपण उत्तम प्रकारचे लेखन करत आहात. पुढील काळात आपल्याकडून दर्जेदार लेखन होऊन अमेरिकेतील उत्कृष्ट व श्रेष्ठ दर्जाचे भारतीय लेखक म्हणून आपले नाव आम्ही अभिमानाने घेऊ. सर्व भारतीयांसाठी देखील हा एक आदर्श असेल ही माफक अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. आपणास दीर्घायुरारोग्य, मानसन्मान, पद प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती सर्व काही लाभो या सदिच्छा! –
— विजय बालघरे. कोरेगाव बुद्रुक.
६२
Madhavrao, Proud feeling.
— Vijay. Pune
६३
धन्यवाद माधवराव !
तुमचा विविध क्षेत्रातील उत्साह कौतुकास्पद आहे . Looking forward to meet you in Cleveland during June 13-15.
— Sharad B. Troy MI
६४
हार्दिक अभिनंदन.
— मकरंद. पुणे
६५
मनापासून अभिनंदन माधवजी.
— राधा. पुणे
६६
खूप सुंदर जीवन-यात्रा ! पुढील आयुष्यात विठ्ठलाची तुमच्यावर अशीच कृपा राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. पुण्यात आलात की जरूर भेट घेऊ. शिकागो मध्ये आमचा भाचा आहे मी त्याच्याकडून पत्ता घेऊन पाठवतो.
— राम. पुणे
६७
Madhavdada, Khupach sundar .
— Deepa S., Chicago
६८
खूप छान ! मन: पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!!
— Madhubala J. Mumbai
६९
अभिनंदन सरजी.
— Gajanan M. Amaravati
७०
Great ! Thanks for sharing Sir
— Samendra N. Mumbai
७१
या लौकिक कोरेगाव बु. ते शिकागो दरम्यान यशस्वी प्रवासा बद्दल अभिनंदन ! सध्या कल्याणकारी पुरूषोत्तम संगम युगात (कलियुग व सतयुग या मधील पवित्र संधी काल) सतयुगी दैवी घराण्यात लक्ष्मी नारायण समान उच्चतम पद भूषविण्यासाठी यशस्वी अलौकिक प्रवासासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
— बी के विठ्ठल. सातारा
७२
अरे वा ! शुभेच्छा आणि अभिनंदन ! पुस्तक मात्र पाठवा मला. त्यावर गोव्यातील वृत्तपत्रात परिक्षण लिहिन.
— चित्रा. पणजी, गोवा
७३
उत्तम लेख !! हा वाचल्यानंतर मला तुमच्या परीवाराबद्दल माहिती नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या. तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !!
— नंदा. शिकागो
७४
नमस्कार. आपला जीवन परिचय आणि वृत्तांत वाचून खूप छान वाटले. लहानपणी, आईवडील आजीआजोबा यांच्या कडून मिळालेले संस्कार, इच्छा शक्ती, कष्ट आणि मेहनत , आणि जिद्द यांच्या बळावर आपण या यशाच्या वाटचालीत इथवर येऊन पोहचलात. आयुष्य स्वतः साठी, लोकांसाठी, समाजासाठी, परोपकार करत आणि कर्तव्य आणि त्यातून मिळणारा आनंद घेत घालवले, यातून नवीन पिढीला बरेच काही शिकण्यासारखे आहे . भारतातील लहानशा गावापासून ते अमेरिकेतील शिकागो सारख्या शहरात, जगभरातील विविध अनुभव घेऊन ही आपली पाळंमुळं न विसरणारे, आपली संस्कृती जपणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ! आपल्याशी ओळख होऊन, आपण साहित्यकट्टा वर आमचा कार्यक्रम घडवून आणला. दुसऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देणं, गुणांचे कौतुक करणं, असे आपले हे साधेपण आपण खरे विठ्ठल भक्त असल्याची साक्ष देतात. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा तर आहेतच. अशा व्यक्तींना परमेश्वर, तो पंढरीचा विठुराया नेहमीच साथ देतो हे निश्चित. आपल्या हातून उत्तरोत्तर अशीच चांगली कामे घडत राहोत आणि त्यासाठी आपणास भरपूर आयुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा.
— गीता गद्रे. टिमारनी (म.प्र.)
७५
Shree Madhavrav, Jyotitai kautuk ani hardik Abhinandan! Tumachya sarakhya anek karykartyanmule MMC jagbhar gajatay.
— Dr Talathi, Pune
७६
Your story is amazing! Liked the message you gave in the end.
— Shreedatta R., Chicago
७७
माधवदादा, खूप सुंदर लेख. तुमच्याविषयी बरीच माहिती मिळाली. एवढ्या कष्टातून तुम्ही वर आलात. सलाम तुमच्या कार्याला !
— शिल्पा. शिकागो
७८
Congratulations Madhavdada.
— Sucheta B., Chicago
७९
congrats nice write up
— Shirish P., Chicago
८०
हार्दिक अभिनंदन,
माधवराव – प्रकाश, शिकागो.
८१
Madhavji, Your life story is so inspiring and admirable. Kindly accept my heartfelt congratulations and best wishes !
— Jayant B., Chicago
८२
Congratulations on the well deserved recognition, Madhavrao!
— Vishwas B. Chicago
८३
हार्दिक अभिनंदन ! तुमच्या आयुष्याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे !
— नितीन. शिकागो
८४
Madhavdada, That’s great !
— Yogita L., Chicago
८५
abhinandan.
— Piyush B., Amaravati
८६
Madhavji, Thank you for sharing this. Today for the first time I learned so much about you and family. Very commendable life journey.
— Mukund B. Chicago
८७
Very proud of u Madhav Dada.
— Manoj J., Chicago
८८
धन्यवाद दादा. आज तुमच्या बद्दल खूप नवीन माहिती मिळाली अणि आमचा अभिमान अजून द्विगुणित झाला. खूप लांबचा प्रवास डोळ्यासमोर दिसला. तुमच्याकडून अजून खूप काही शिकायला मिळेल .
— अमोल. शिकागो
८९
मला तुमचा खूप अभिमान आहे मामा … तुमच्यासारखे मामा मला मिळणे हे माझे भाग्य आहे.
— रजनी. कर्जत
९०
खूप सुंदर !! तुम्ही पण खर्या अर्थाने आज कळालात ! तुमचा आदर होताच पण आता तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
— स्वाती. शिकागो
९१
Congratulations ! Very interesting.
— Medha G. Cleveland
९२
माधवजी.. तुमचा सगळा जीवन प्रवास समजला… थक्क झाले सगळं वाचून.. अभिमान वाटला तुमचा… तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे असंख्य पैलू समजले… तुमचा सहजीवनाचा आदर्श वाटला. माणूस एका जन्मात काय काय करू शकतो याचा वस्तूपाठ म्हणजे तुम्ही आहात. खूप कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा !
— आरती. पुणे
९३
अभिनंदन माधव !
— अंकुश. पाबळ
९४
खुप छान, माधवदादा ! अगदी impressive ! Congratulations !!!
— Uma D. Miami
९५
Wow, Madhavrao, what an inspiring story indeed ! Hearty Congratulations !
— Kishor G., Saint Louis
९६
श्री माधवदादा गोगावले सर्व लेख वाचला व तुमची जिद्द व यशोगाथा कळल्यावर खूप आनंद व तुमचा अभिमान वाटला. तुमचे मनापासून अभिनंदन. शिकागो महाराष्ट्र मंडळातले तुमचे कार्य व सगळ्यांना करीत असलेले सहकार्य मी गेली चार वर्षे पहात आहे. तुम्हाला यापुढेपण अधिक यश लाभो.
— नीला. वॉशिंग्टन.
९७.
फारच छान लेख आहे. तुमचं तेथील कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे हे सर्व वाचल्यानंतर लक्षात येते आणि तुमच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो. तिथे इतक्या लांब सातासमुद्रापार राहूनही तुमची आपल्या देशाशी आणि त्याहूनही आपल्या गावाशी जोडलेली भक्कम नाळ पाहून तुमच्याविषयी खूप कौतुक वाटतं. आपल्या देशाचंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देवतांचे, संस्कृतीचे व सणावारांचं महत्त्व तुम्ही तिथे दाखवून दिलंय त्यासाठी तुमचे आणि ज्योती ताईचे मनापासून अभिनंदन.
— तृप्ती. पुणे
९८
वाह वाह वाह !!! माधवराव.. तुमचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! .आता KTKSF साठी आपले योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
— पोपटराव. राजगुरूनगर
९९
वा वा खूप खूप अभिनंदन.
— चंद्रशेखर. मुंबई
१००
खूपच छान.
— सुजाता. पुणे
१०१
वाह माधवजी, काय सुंदर लेख व त्याहून सुंदर तुमचं आयुष्य व धाडसी जीवन व त्यातून मिळालेली प्रसिद्धी! कठीण परिस्थितीतून इतक्या वर येणे भारी कठीण असतं, पण तुम्ही ते साध्य करून दाखवलंत! जगण्यामागचा दृष्टिकोन, सल्ला, मेहनतीचं महत्व सारच कौतुकास्पद ! मनापासून खूप खूप धन्यवाद.
— सुजाता. शिकागो
१०२
कोरेगाव ते शिकागो प्रवास, अप्रतिम. आपले कौतुक, प्रेरणादाई.. आपणास हार्दिक शुभेच्छा. ….
— दत्तात्रय. औंढा
१०३
साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले माधव गोगावले…. पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगर तालुक्यातील कोरेगाव बुद्रुकचे माधव गोगावले हे एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. ग्रामीण भागातच शिक्षण घेतले. आपल्या अभ्यासातून कृषी क्षेत्राचे ज्ञान अवगत केले आणि आपल्या देशाची संस्कृती शिकागो सारख्या शहरात जाऊन राबविली, याला म्हणतात देशाचा स्वाभिमान. आज-काल आपल्या देशात राहून देखील टोपी घालण्यास अनेकांना लाज वाटते. परंतु माधव गोगावले यांनी आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखवून दिली. मराठी मंडळ स्थापन केले. गेली २५ वर्ष शिकागो शहरात त्यांनी मराठी संस्कृतीचे प्रशिक्षण दिले. आपल्या मायभूमीत जन्मलेले माधव गोगावले यांनी आपल्या देशाची परंपरा परदेशात देखील अमलात आणून दाखवली, याला म्हणतात जिद्द. शिकागो शहरात त्यांनी विठ्ठल मूर्तीची स्थापनेसाठी पुढाकार घेतला केली. हे किती महान कार्य आहे. शिकागो शहरात खासदारांसमवेत टोपी घालून आपल्या परिवारासोबत फोटो काढला. त्यांनी शिक्षण घेत असतानाच “दिवसा पिकवा मळा रात्री शिका शाळा” अशाप्रकारे साक्षरतेचे प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेऊन आपल्या आरोग्याला चांगल्या सवयी लावल्या. शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या शाळेत मराठीचे शिक्षण दिले. आपल्या कार्यामुळे ते इंडो अमेरिकन कल्चर संस्थेचे अध्यक्ष व संगम फाउंडेशनचे ट्रस्टी झाले. माधवरावांनी शिक्षक व्हावे, ही त्यांच्या आईची इच्छा होती. आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिकागो येथील एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना लेखनाची आवड असून ते वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांचे लेख “न्यूज स्टोरी टुडे ” मधून प्रकाशित झाले. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. माधवराव मूळचे शेतकरी आहेत, हे ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी परदेश दौरे केले, परंतु ते आपल्या मायभूमीला कधीही विसरले नाहीत. परदेशात जाणाऱ्या मुला मुलींसाठी त्यांनी चांगला मंत्र दिला की, जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. समाजसेवा करीत असतानाच त्यांनी आपल्या परिवारालाही चांगले संस्कार दिले. सद्य परिस्थितीत आम्हाला माधव गोगावले यांचा नक्कीच अभिमान वाटतो की, कसलीही लाज न बाळगता त्यांनी आपल्या देशातील विशेषता महाराष्ट्रातील संस्कृती अमेरिकेसारख्या शिकागो शहरात आचरणात आणण्याचे महान कार्य केलं. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या कुटुंबाचं शिकागो सारख्या शहरात नावलौकिक केलं. अशा माधव गोगावले यांना गोदी कामगारांचा सलाम.
— मारुती विश्वासराव. लेखक, संपादक
१०४
श्री गोगावले यांची जीवनकथा प्रेरणादायी आहे. लहानशा खेड्यातून माणूस कुठवर झेप घेऊ शकतो याचा एक वस्तुपाठ जणू. धन्यवाद.
— स्वाती वर्तक. मुंबई
१०५
माधवजी,
राम कृष्ण हरी…
तुमचा एक खेडेगाव ते शिकागो पर्यंतचा प्रवास वाचून थक्क झालो. तुमच्या सारख्या एक बहुआयामी व्यक्तीमत्वाचा जीवन प्रवास म्हणजे एक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीच आहे. तुमच्या सारखे आदर्श जीवन इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तुमची लवकरात लवकर भेट व्हावी ही इच्छा आता द्विगुणित झाली आहे. हा योग भगवंताच्या कृपेने प्राप्त व्हावा ही प्रार्थना. राम कृष्ण हरी
ह.प. भ.
— प्रशांत महाराज मोरे – देहूकर.
१०६
Congratulations Madhavji, keep on doing excellent job.
— Prahlad P.l. Chicago
१०७
Congratulations ! Dear friend l have minutely observed your talent efforts since 3rd standard up till now and you are fit for the same. We have lots of sweet memories from primary school, high school, college and so on. we keep it up. Best wishes for my beloved friend and family.
— Chandrakant S. Rajgurunagar
१०८
I have gone through his biography and was quite impressed about his aptitude of learning in different areas and career progression. Importantly not to forget his very common personality of a country hood which reflects in his development. Primary education, agriculture to computer science and proving him as a data analyst is a remarkable achievement. We are proud as a group member and would like to share your experiences in the fields of Yoga and Bhakti creating a place for worship of Vitthal in Chicago. Hatts off to you Madhavrao Gogavale
— Anand M. Mahalunge Rajgurunagar, KTKKSF
१०९
अप्रतिम लेख !
— ज्योती. राजगुरूनगर
११०
देवेंद्र भुजबळ लिखित, माधवराव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो यशोगाथा खूपच समर्पक व प्रेरणादायी वाटली. माधवरावांनी विविध क्षेत्रात केलेली कामगिरी उल्लेखनीय तर आहेच पण त्या द्वारे त्यांचे बहुयामी व्यक्तिमत्व समोर उभे राहते. आपल्या अष्टपैलू कार्याला सलाम .
— विष्णू. राजगुरूनगर
१११
अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद यशोगाथा. आमच्या पीढीसाठी एक आदर्शवत रोल मॉडेल. जेंव्हा भारतात याल तेंव्हा आम्हा सर्वाना आपल्या मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ जरुर द्या …
— मिलिंद. राजगुरूनगर
११२
Hari OM Madhav ji, Thank you for sharing. तुमचा प्रवास एका छोट्या गावा पासून ते ईथपर्यंत खुपच प्रेरणादायी आहे. विशेषता, सर्व सांभाळून, मराठी भाषा, मराठी मंडळ, चिन्मय मिशन, लेखन व साहित्य, ईत्यादी मधे रुची टिकवणे खरोखरच उल्लेखनीय !! हा लेख वाचून खुप आनंद झाला.
— साहेबराव. शिकागो
११३
Dear Madhav and Jyoti, Congratulations! Very successful story on your progress from a small village to the USA. Please see my comments on the very good Article about your accomplishments. Keep up the good work throughout life. Best wishes!
— Geetaram (Anna) D. and Mandatai. Chicago
११४
खूप छान आणि प्रेरणादायी लेख… असे अनेक माधवराव आपल्या लेखाच्या प्रेरणेतून घडतील असा विश्वास मला वाटतो. सर माधवराव सरांना मनःपूर्वक शुभेच्छा.
— शिवानी गोंडाळ. मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन
११५
श्री माधवराव गोगावले यांची माहिती वेधक व प्रेरक.
— उज्वला केळकर. नवी मुंबई
११६
सर जी आपल्या ऍग्री ग्रुप 77 वर मी हे पाहिले आहे. आपला हा कोरेगाव बु. ते शिकागो प्रवास थक्क करुन टाकणारा आहे. याबद्धल प्रतिक्रिया द्यावी असे वाटत असतानाच आपणा परत एकदा याबाबतचे वर्णन मिळाले. आपण अमेरिकेत आहात हे माहित होते. पण मला वाटायचे आपण बी. के. सेंटर मध्ये कार्यरत असाल. कारण पुणे कॉलेज मध्ये असताना आपण भुजबळ आणि विठ्ठलभाई बराच काळ येथील बी के.सेंटर मध्ये जात असत. असो. आपल्या बालपणापासून ते आता पर्यंतचा प्रवास देवेंद्र भुजबळांनी अतिशय बारकाव्याने नमूद केला आहे. खरच या प्रवासाचे आपले धैर्य आणि बुद्धिमत्ता हे मला तरी अपरिचित होते. आपला हा विक्रम आणि जीवन शैली मनाला वेगळाच आनंद देऊन जाते हे नक्की. बराच वेळा मी आपल्याला ग्राउंड वर स्पोर्ट आणि NCC परेड मध्ये पाहिले आहे. आपल्या या प्रवासाबद्धल मला सार्थ अभिमान वाटतो. शिकागो मध्ये जाऊन आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसिद्धीचे सुंदर काम आपल्या दोघांकडूनही चिकाटीने होत आहे यासाठी दोघांचेही मनःपूर्वक “अभिनंदन”.
सर्व कामात आपण व्यस्त आहात. आनंद घेत आहात. अशीच आपली प्रगती होवो यासाठी हार्दिक शुभेच्छा. . शुभरात्री . अप्रतिम.
— श्रीकांत. सोलापूर
११७
तुझा जीवन प्रवास अतिशय अनुभूत आहे. तू जे आयुष्यात साध्य केले आहे ते सर्व तुझ्या कष्टांचे आणि आत्मविश्वासाचे फळ आहे. हार्दिक आभिनंदन.
— चारू. न्यू जर्सी
११८
माधव गोगावले यांची यशोगाथा. ‘कोरेगाव बुद्रुक ते शिकागो’ माध्यम भूषण या पुस्तकातील लेख ठाणे न्यूज स्टोरी पोर्टल वरील बातमीवरून श्री देवेंद्र भुजबळ यांनी गोगावल्यांशी फोनने त्यांचे जीवनातील यशोगाथा ऐकून त्याचे सुंदर लेखन केले. त्यांना धन्यवाद.
श्री माधवरावांची घरची परिस्थिती बेताचीच होती पण माधवरावांच्या शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छेमुळे कृषी क्षेत्रातील उच्च पदवी मिळवता आली. 45 वर्षांपूर्वी ते अमेरिकेला गेले. तेथे अनेक क्षेत्रात यशस्वीरित्या काम केले. तेथील एकही क्षेत्र असे नाही की, त्यात माधवरावांचा सहभाग नाही. अशा अष्टपैलू व्यक्तीचा परिचय झाला याचा मला आनंद वाटतो. शिकागो येथील मराठी साहित्य कट्ट्यामध्ये माझ्या “गीत महाभारत” काव्यसंग्रहातील कविता वाचण्याची संधी मला माधवरावांच्या मुळेच मिळाली, याबद्दल त्यांना धन्यवाद. माधवरावांचा स्वभाव मनमिमळावू आहे. नवीन परिचय झालेल्या व्यक्तीशीही ते आपलेपणाने वार्तालाप करतात, जणू काही त्यांची त्या व्यक्तीशी कितीतरी वर्षापासूनची ओळख आहे. आज काल मोबाईल मुळे घरातल्या घरात सुद्धा संवाद होणे मुश्किल झाले आहे, पण माधवरावांना फोन केला की बोलतच राहावे असे वाटते. त्यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तीची ओळख समाजाला झाली पाहिजे. त्यांच्या उज्वल यशोगाथेमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल व एकापेक्षा एक असे अष्टपैलू हिरे अमेरिके सारख्या बलाढ्य देशात चमकतील, अशी आशा वाटते. ते आजही आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी झटत आहेत. आपल्या संस्कृतीची जोपासना करणे हे प्रत्येकाचे, प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे ते मानतात. त्यांचा मराठी विषयाचा अभिमान दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात एकही इंग्रजी शब्द न वापरता एक मिनिट शुद्ध मराठीत बोलण्यावरून दिसून येतो.
श्री माधवरावांना त्यांच्या पुढील विविध कार्याला व साहित्य लेखनाला हार्दिक शुभेच्छा. ताजा कलम लवकरच त्यांचा कवितासंग्रह व ललित लेख संग्रहाचे प्रकाशन व्हावे व ते आम्हाला वाचायला मिळावेत. अशा या माधवरांना माझ्याकडून धन्यवाद.
— सुहासिनी येवलेकर. निगडी, पुणे
११९
Hello Uncle,
Hope all well. Nice article on you congratulations!
— Charu D. Mumbai.
१२०
Madhav dada, I learned a lot about you from this article. Your work is an inspiration. I got motivated reading the article. You have done a great job balancing work and all other activities. Very nice article by Devendra ji.
— Anju D., Morganville. New Jersey
१२१
Nice write-up. Congratulations!!!
— Chandra V. Chicago
१२२
Extremely inspiring Congratulations!! Sanjay D.
— Morganville. New Jersey
१२३
Madhav Kaka ekdum masta lekh aahe. Congratulations!
— Yogendra Puranic Tokyo. Japan
१२४
Very nice to see this article regarding you. Congratulations!!!
— Malvika K. Boston
१२५
गोगावले सर, तुमचं मनापासून अभिनंदन तुमच्यावरचा लेख वाचून खूप बरं वाटलं, समाधान झालं कारण तुमच्या कष्टाच अगदी चीज झालंय. माझ्या गाण्याच्या कार्यक्रमातून का होईना तुमच्या संपर्कात आलों, हे आमच नशीबच तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ही देवाचरणी प्रार्थना
— अनिल ताटके. मुंबई
१२६
Very nice article . Congratulations!
— Vivek S. Kivale – Rajgurunagar
१२७
ATI Sundar & Uttam ..
— Mahindra N. Pune
१२८
Congratulations to Madhav Dada,
— Alaka G.l. Chicago
१२९
हार्दिक अभिनंदन माधवजी !!
— मंदा. शिकागो
१३०
Hearty congratulations !!
— Vijaya P. Chicago
१३१
माधवदादा, साहित्यकट्टा किंवा रचना हे फक्त निमित्त आहे. तुमचे कष्ट, तुमचा जनसंपर्क, तुमचा उत्साह हेच तुमच्या यशाचे खरे कारण आहे
— सुजाता. शिकागो
१३२
श्री माधवराव गोगावले तुमची सर्व जीवन गाथा मी वाचली. तुमचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे .
— मोरे महाराज. देहू
१३३
मा.श्री.माधव गोगावले साहेब आपला अविस्मरणीय प्रवास. आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी व बळ देणारा ठरेल असा आशावाद वाटतो. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
— गोपाल. वाडे
१३४
Very inspiring journey Madhavdada!!
— S. B. Liasle.
१३५
माधवदादा, तुमच्या प्रेरणादायी कर्तृत्व, कारकीर्द आणि व्यक्तिमत्वाच्या परिचयाने भारतातील नव्या पिढीला निश्चित खूप लाभ होईल. हार्दिक अभिनंदन .
— अनिरुद्ध. नागपूर
१३६
माधवराव. फार सुरेख वर्णन केले आहे त्यामुळे मला आज दुसरा माधवराव दिसला. Hats off for your hard work.
– S. Gadkari. Chicago
१३७
वाह वाह अभिमानास्पद दादा – नितीन,
— छ. संभाजीनगर.
१३८
Wow! Great journey Madhavrao.
— Vijay P.l. california
१३९
श्री माधवराव गोगावले, आपला जीवन आलेख कौतुकास्पद आहे. अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभकामना.
— द्न्यानदेव दोंदे. पुणे
१४०
गोगावले साहेब, तुमचं मनापासून अभिनंदन ! तुमचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
— मानसी. खेड
१४१
माधवदादा, तुमच्यावर लिहिलेला लेख फारच छान आहे. तुम्ही करत असलेले तेथील कार्य पाहून तुमचा अभिमान वाटतो. तुमचे आणि ज्योती ताईचे मनापासून अभिनंदन !!!
— सोनाली. पुणे
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800