Monday, June 16, 2025
Homeकलाभारतीय विवाह संस्कृती : अनोखे दर्शन !

भारतीय विवाह संस्कृती : अनोखे दर्शन !

भारताच्या विविध राज्यात, समाजात विवाह करण्याच्या विविध पद्धती आहेत. विविधांगी भारतीय विवाह सोहळे हे एक जागतिक आकर्षण आहे.

अशा या विवाह संस्कृतीचे अनोखे दर्शन घडविणारा एक शानदार कार्यक्रम नुकताच मुंबईतील वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला.

गणरायाच्या सुंदर स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपारिक वधू वर परिधानाचे सादरीकरण, विवाहाप्रसंगी होणारी नृत्ये, “आव्हान” पालक संघटनेच्या वतीने दिव्यांग मुलांचे विशेष नृत्य, मराठी, मुस्लिम, मारवाडी, दक्षिण भारतीय, पंजाबी, गोवा, बंगाली अशा विविध विवाह पद्धतीचे खास सादरीकरण झाले.

या कार्यक्रमात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, गिरीजा प्रभू, तेजा देवकर. पुनम चांदोरकर, प्राजक्ता परब, प्रियांका नर, आरती पानसरे, लावणी सम्राट आशिमीक कामठे, भार्गवी चिरमुले, रूपकला नृत्य अकादमीच्या श्रद्धा गायकवाड, डान्स गुरु रीमा वाघ नृत्य अकादमी यांच्याबरोबरच टीव्ही मालिकेतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन रॉयल व्हिजनचे अध्यक्ष अविनाश कोलगे, संकल्पना, दिग्दर्शन मेकअप आर्टिस्ट मनीषा कोलगे व सहसंयोजन कालिष्का आभूषण प्रियांका घारे यांनी केले.

या कार्यक्रमाचे निवेदन विनीत देव यांनी अतिशय सुंदर केले.

याप्रसंगी चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे, सहायक पोलिस आयुक्त ॲड. धनराज वंजारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल, सेक्रेटरी विद्याधर राणे, खजिनदार विकास नलावडे इत्यादी अनेक मान्यवरांचा रॉयल व्हिजनतर्फे श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास मनोरंजन, फॅशन, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, लोकमत सखी परिवार, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, युनियनचे माजी पदाधिकारी विजय पंदिरकर, मुबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज ग्राहक सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आप्पा सूर्यवंशी, मराठा विवाह मंडळाचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव, याशिवाय दिव्यांग बालक, शिक्षक व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे भारतीय विवाह संस्कृती आणि परंपरेचे चांगलेच दर्शन घडले. ही सांस्कृतिक परंपरा जपणे काळाची गरज असून असे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्याची गरज आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?