Sunday, June 29, 2025
Homeसाहित्यवारी : काही कविता

वारी : काही कविता

१. चंदूची वारी : आत्मसाक्षात्काराची वारी

पाऊले चालती पंढरीच्या दिशेने,
चंदू निघाला ओढी पोटी माऊलीच्या विश्वासाने…
डोळ्यांत विठ्ठल, ओठी अभंग,
हृदयात तळमळ, ओवीत दंग !

पहिलं पाऊल टाकताना वाटलं थोडं अंतर,
दुसऱ्या दिवसाला वाटे
हे तर चालतंय अंतरावर अंतर!
पाय दुखे, पण मन फुले,
वारीचा आनंद अंगांअंगातून झरे !

पावसाचा सडा अंगावरती पडे,
पण चंदू म्हणतो,“ही तर माऊलीची ओवाळणी वाटे !”
ना भुक ना तहान,
पण एखादा विठूरूपी देतो प्रेमाने भाकर आणि भाजी !

दिंडीत चालताना वाटतं
“आपणच हरवून गेलो,
की आपणच आपल्याला सापडलो !”
अन् त्या क्षणी,
पंढरपूर जवळ येताच तो ओढीचा क्षण येतो

चंद्रभागेच दर्शन डोळे भरून घेतो,
चरणी विठ्ठल उभा, मुखदर्शन घेतो
आणि चंदूला जाणवतं
“मी नाही आलो, मला बोलावलं गेलं !”
सोबतीला पद्माकर काका
जणू विठ्ठल सोबतीला
धीर देत देत नेतो हा पंढरीला
तेव्हा तो म्हणतो स्वतःशीच…
माझं देहभान हरपल आणि
मी नामात रंगलो आता मी नाही,
उरलाय फक्त माऊलीचा ‘चंदू’ !
पांडुरंग हरी ! पांडुरंग हरी !!

— रचना : डॉ चंद्रकांत हलगे.

२. पंढरीची वारी (षडाक्षरी)

विठ्ठल सावळा, वारीचा सोहळा !
भक्तांचा हा मेळा, प्रेमे शिंपीयेला !

विठ्ठल माऊली, मायेची सावली !
मनाला भावली, सोबत चालली !

अठरा दिसांची, पंढरीची वारी !
विठ्ठल कैवारी, दुःखांना निवारी !

तुकया, ज्ञानोबा संतांच्या विभूती !
तयांची पालखी, सकल पूजती !

वारीचे रिंगण, एकीची गुंफण !
भजनी कीर्तनी, रंगले हे मन !

डोक्याशी तुळस, दिसला कळस!
सुखाचा सागर, विठ्ठल आधार!

वारकरी सारा,पायीच चालला !
पंढरीच्या पायी, तल्लीन जाहला !

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
           
३. वारी भक्तांची

पांडुरंग भक्तांचिया उभे असे विटेवरी
चंद्रभागे च्या तिरी कर ठेवी कटेवरी… 1

प्रेमाने पाहतसे विठ्ठल हंसत
सावळे स्वरूप दीप ते उजळत… 2

शोभतसे माथी चंदनाचा टिळा
रुळे ती गळ्यात वैजयंती माळा… 3

मृदंग व चिपळ्या वाजवीत वारी
भक्तजन घाईत चाललीत पंढरी… 4

भाविक विहरती ज्ञानाचे सागरी
परि मुक्तीचिया विठुराया अंतरी… 5

मायबाप जाणोनी भक्त जिवलगी
डोहात आनंदे मानती श्रेष्ठजगी… 6

जगावे जीवन समाधाने सुखानी
विठ्ठलाच्या सेवेत भक्तीत हो रमुनी… 7

जमला मेळावा चंद्रभागे तिरी
पांडुरंग कृपे संकटात  तारी…8

करतसे गजर भाविक नामाचा
निरंतर मुखी टेकूनिया माथा… 9

विठुराया माझा पाहतसे वाट
चालतंसे भक्त पंढरीची वाट… 10

— रचना : सौ.मीना घोडविंदे. ठाणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील
अविनाश ब.हळबे. on अष्टपैलू सुचिता पाटील