Homeसाहित्यग्रंथ महिमा

ग्रंथ महिमा

ग्रंथ; बाप आणि आई
सदा कृपेची सावली
शांतवे मनाची काहिली 
किती असोत समस्या …१

आनंदाचे अखंड झरे
ज्ञानाची धवलागारे
समाधानाची आगरे
वाचकांसाठी….२

ध्वनी चिन्हांची गळामिठी
अक्षररूप जगजेठी
आपुल्या कल्याणासाठी
सदेह अवतरला….३

पूजा त्याची वाचन
आरती असे मनन
प्रसाद ते सुज्ञान
वाचकांसाठी….४

देती शिक्षण रोकडे 
न होती पांगुळगाडे
सोडविण्या साकडे
समर्थ करिती….५

दाखवोनी दुष्ट नष्ट
सत्यासत्य आणि भ्रष्ट
निवडाया सुष्ट इष्ट 
सामर्थ्य देती….६

सदैव राहती दाता
जीर्ण-शीर्ण जरी होता
न सोडिती महत्ता
नि:स्पृहपणे….७

माहितीच्या महाजाली
अक्षरे सारे अक्षर राखिती
तात्काळ प्रगट होती
इच्छुकांसाठी….८

किती ग्रंथ महिमा गावा 
जावे ग्रंथांचिया गावा
मिळे जिवाला विसावा 
आणि प्रबोधन….९

वेदवती कुलकर्णी

— रचना : वेदवती कुलकर्णी. विले-पार्ले (पूर्व), मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments