Homeबातम्याएक छान योगायोग !

एक छान योगायोग !

मराठीची एक बोली भाषा असलेल्या कलाली बोलीतील जेष्ठ लेखक, कवी, प्राचार्य डॉ रामदास चवरे यांच्या असो चैतको मयना हा पहिला कविता संग्रह आणि जेष्ठ चित्रपट लेखक- दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित यांच्या टेक 3 या मुक्त छंद आणि कविता संग्रह अशी दोन पुस्तके न्यूज स्टोरी टुडे ने गेल्या महिन्यात प्रकाशित केली आहेत.

सर्व प्रथम तर आपापल्या क्षेत्रात खूप थोर असलेल्या या महानुभावांनी त्यांच्या पुस्तकांची जबाबदारी मोठ्या विश्वासाने न्यूज स्टोरी टुडे वर सोपविली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

दुसरी गोष्ट म्हणजे, दोन्ही पुस्तकांमधील कविता अतिशय भिन्न स्वरूपाच्या असूनही त्या वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे असो चैतको मयना या पुस्तकाची दखल मुंबई येथील महाराष्ट्र टाइम्सच्या स्वागत पुस्तकांचे या सदरात तर टेक 3 ची दखल पुणे येथील दैनिक सकाळ ने त्यांच्या स्वागत नव्या पुस्तकांचे या सदरात काल म्हणजेच रविवार, 7 जून 2026 च्या अंकात घेतली आहे. किती छान योगायोग आहे हा !

दैनिक महाराष्ट्र टाइम्स आणि दैनिक सकाळचे मनापासून आभार.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments