दिनकर करी तो तप्त रत्नाकर
शामल मेघ येती अंबरी,
जलधारा त्या बरसती अवनीवरी
समीरा संगे झगमगे सौदामिनी
घन गडगडाट येई कानी,
पर्जन्यधारा पडता धरतीवरी
मोदीत होई चराचर सृष्टी सारी
रौद्ररूप पर्जन्य दाखवी,
हलकल्लोळ तो माजवी
जलमय होई सारी धरती
जीव सारे भयभीत होती.
थेंब टपोरे पडता मेदिनी वरी
आनंदाने डोलती पिके शिवारी
विधात्या ही तुझीच करणी.
नतमस्तक मी तवचरणी,
नतमस्तक मी तवचरणी….

— रचना : संगीता तेलंग. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
