मी तिला हात दिला
तिने मला साथ दिली
एकमेकांच्या सुखदुखात
ती नेहमीच बनली सावली !१!
आनंदाच्या क्षणी ती
कधी हुरळून गेली नाही
दुःखाच्या हिंदोळ्यावर
कधीच हिरमुसली नाही !२!
येईल त्या प्रसंगाला
ती सहज निभावून नेई
पाहुणे राहूणे आले असता
घरी स्वागतच होई !३!
रूसवे फुगवे अधुनमधून
कधी अचानक पुढे येई
कोडे त्याचे मज न उमजे
आता काय समजायचे भाई ? !४!
कंटाळा कधी आलाच
ती लवकर उठणार नाही
डोके दुखीचा बहाणा मात्र
पत्थ्यावर पडला जाई !५!
आम्ही मग समजून घ्यावे
आज चुल पेटणार नाही
बाजारातून संध्याकाळी
मोग-याचा गजरा नेई !६!
वाटे तिजला कधीतरी
आपण डिनरला बाहेर जाऊ
मुलाबाळांच्या समवेत
आपण काही तरी खाऊ !७!
मुलेही मग खुष होती
आज चांगले जेवण जेऊ
तिच्या खातीर आम्ही
हॉटेलात जातो भाऊ !८!
संध्याकाळी मग एकदम
तयार होतात सारे
मेनु कार्ड हातात घेऊन
ठरवतात आमची पोरे !९!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
