Homeसाहित्यउपरती...

उपरती…

वठलेल्या वृक्षाला पुन्हा बहर येत नाही,
कोमेजलेले फूल पुन्हा उमलत नाही !

निष्प्राण शरीर परत सचेतन होत नाही,
घातलेला घाव फुंकर मारून भरत नाही!

भात्यातून सुटलेला बाण माघारी फिरत नाही,
मुखातून निघालेले शब्द बदलता येत नाहीत!

भंगलेली वस्तू पुनःस्थितीत आणता येत नाही,
विश्वासाला गेलेला तडा पुन्हा सांंधता येत नाही !

कुठे थांबायचं हे कळलं तर;
अपराधीपणाची भावना येत नाही,
विध्वंस होण्याआधी थांबलं की;
पश्चातापाची वेळ येत नाही !

आयुष्यभर भोगल्यावर;
उपभोगण्याची किंमत कळते,
तेव्हाच मिळालेल्या प्रत्येक क्षणासोबत
आनंदाने जगता येते.

स्वातंत्र्याची किंमत समजली की;
स्वैराचाराची दुर्बुद्धी होत नाही,
ठेच लागल्यावर जाग आली तरच;
खड्ड्यात पडायची वेळ येत नाही.

संकटकाळी विस्मरणात गेलेले सुद्धा आठवतात,
पण सुख वाटल्याने वाढते;
हे का बरे विसरतात ?

— रचना : सौ योगिनी पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments