प्रसन्न पहाट, गंधित वारा
सुस्नात ओलेती हसरी धरा
मन वसंती फुले मोगरा
मम हृदयी फुलला फुलोरा
अचानक किमया झाली
गाली माझ्या आली लाली
अबोली पण बोलू लागली
रातराणी ही दिनी दरवळली
मधुमालती कशी लाजली
कोरांटी मस्त सुगंधली
सदाफुली प्रभूपदी विराजली
जास्वंदीही गंधित झाली
सृष्टीत अद्भूत न्यारी किमया
मिळाली मला माझी दुनिया
सखा माझा भेटला अवचित
अद्वैताचा आनंद अकल्पित
— रचना : रेखा दीक्षित. कोल्हापूर.
— संपादक : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
