Homeसाहित्यबोध कथा

बोध कथा

जगी सर्वात मोठे कोण ?

लहानपणी ऐकलेलं गाणं आठवतं- ‘दुनियामें बडा कौन ?
तो दुनियामें बडा शिवजी | क्योंकी वो हिमालयपर बैठता है |”

मराठी कवि वसंत बापट एका कवितेत म्हणतात, “भव्य हिमालय तुमचा अमुचा…”

आता थोडा आजचा विचार करु.
याच हिमालयावर, आपले हजारो सैनिक, रात्रंदिवस कडाक्याची थंडी, कोसळणारा पाऊस सहन करत, तहान भूकेची पर्वा न करत डोळ्यांत तेल घालून आपल्या सीमांचं रक्षण करतात.
ही माणसच आहेत. म्हणून माणूस मोठा.

आता माणूस कोणता मोठा ?
कुणी म्हणेल बलदंड खली मोठा तर कुणी म्हणेल मोदी मोठे, कारण ते शक्तिशाली देशाचे प्रमुख आहेत.

मागे, टी. व्ही.वर एक सुंदर जाहिरात आली होती.
एक शाळेतली मुलगी आपल्या शिक्षिके बरोबर बसमधून प्रवास करत होती. ती अंध होती. मात्र ती शिक्षिका म्हणाली, “आपण बाहेर बघू.”
“कसं ?”
ती शिक्षिका सांगत होती, “बघ तो सुंदर निसर्ग. बघ ती हिरवीगार झाडं. बघ ते उंच डोंगर.”
ती मुलगी म्हणाली, “बाई, तुम्ही किती सुंदर आहात !”
कारण जी माणसं मदत करतात ती सुंदरच असतात.”

दुसर्‍या महायुद्धात जगावर युद्ध लादलेल्या नाझी फौजांना, लोकशाही असलेल्या इंग्लंडनं धूळ चारली होती.
त्यांना साथ होती, दोस्त राष्ट्रांची.

आपण देवाला महान का समजतो ?
कारण, ते जगाचं रक्षण करतात.
“यदा यदा ही धर्मस्य…” म्हणत श्रीकृष्णाने लोकांना वाचवलं ना ?
श्रीकृष्ण हे योगेश्वर होतेच, शिवाय जगाला वाढवण्यासाठी त्यांनी मानवरूपात जन्म घेतला होता.

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments