नमस्कार मंडळी.
बरेच दिवसांनी हे सदर प्रसिद्ध होत आहे, याबद्दल दिलगीर आहे. कामाचा वाढता व्याप, झेप आणि इतरही काही पुस्तकांची निर्मिती, भूतान दौरा अशा अनेक बाबींमुळे इतका विलंब होत आहे.
विशेष म्हणजे मी लिहिलेल्या- संपादित केलेल्या “झेप” पुस्तकात आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध होत असलेल्या “झेप” सदरात लिहिलेल्या अनेक लेखक, लेखिका यांनीही लिहिलेल्या यश कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचे मनापासून आभार. आता वाचू या, वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
ग्रंथाली निर्मित “साहित्यव्रती” कार्यक्रमात आपल्या पोर्टल च्या निर्मात्या- लेखिका- प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांची प्रा अश्विनी भोईर यांनी मुलाखत घेतली होती. ही मुलाखत पाहून प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
1)
सौ. अलकाताई भुजबळ मॅडम यांचेवर लेख अप्रतिम. मला ज्ञात असलेल्या एक झुंजार (जीवनातील प्रत्येक संकटांचा समर्थ सामना करणाऱ्या रणरागिणी) आणि पोर्टलच्या आधारस्तंभ आणि महिला असून प्रकाशनाशी नाते सांगून अंधारातील प्रत्येक घटकाला प्रकाश दाखवणा-या लढवय्या व्यक्तिमत्त्वाचा साक्षेपी वेध या लेखात घेतला आहे जो वाचनीय आणि प्रेरणादायक आहे .
— प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
2)
👍 अभिनंदन अलकाबेटा,
वयाने आमच्यापेक्षा लहान असलीस तरी आपल्या कर्तृत्वाने, मेहनतीने आणि आपल्या मधाळ बोलण्याने तू सर्वांची अलकाताई झाली आहेस. बोलावला खूप गोड असलेल्या आमच्या या लाघवी, साहित्यप्रेमी अलकाची ग्रंथालीच्या “साहित्यव्रती” उपक्रमात मुलाखत घेतली गेली ही खरचं कौतुकास्पद गोष्ट आहे. तुझं मनापासून अभिनंदन. अशीच यशस्वी आगेकूच करीत रहा हीच मनःपूर्वक सदिच्छा. 💐🌹
— वीणा गावडे. मुंबई
3)
अलकाताईंची मुलाखत खुपच सुंदर आणि प्रेरणादायी आहे.
खुप छान 🌹🙏
— आशा दळवी. दुधेबावी, जिल्हा सातारा.
4)
अभिनंदन अलकाजींचे.
— प्रा सुनीता पाठक. छत्रपती संभाजीनगर
5)
“साहित्याव्रती” कार्यक्रमात अगदी त्या नावाला साजेशा अशा खऱ्या साहित्याव्रती सौ. अलकाताईंची मुलाखत ऐकताना, पाहताना इतकी नवीनवी सुंदर माहिती मिळत होती की ही मुलाखत अजून पुढे सुरूच रहावी, अजून ऐकत राहावे असे वाटत होते. अगदी लग्नाच्या आधीच्या दिवसातील माहेरच्या, वडिलांच्या संस्कारांच्या पासून सुरु केलेला त्यांचा जीवनप्रवास डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखा उलगडत होता. त्यातील प्रत्येक टप्पा खास होता. देवेंद्रजींसारखा प्रोत्साहन देणारा, समजून घेणारा जोडीदार मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहेच. त्यानंतर लेक झाल्यानंतर मातृत्वातून नव्याने ओळख झालेली लेखिका, त्यापुढचा खूप कठीण प्रसंगालाही अगदी घरच्यांपासुन, डॉक्टर, ऑफिस मधील सर्वांची सुरेख साथ मिळाली, त्यामुळे अगदी बिनधास्तपणे टक्कर देऊन संकटावर मिळावलेला विजय ऐकताना तर मन भारावले. त्यांच्या पुस्तक प्रकाशनामधील लालबत्तीची त्यांनी मुलाखतीत सांगितलेली स्टोरी ऐकूनच मनाला चटका लागला. खरंच कित्ती वेगवेगळ्या विचित्र घटना घडत असतात! अशांची मुलाखत घेऊन त्यांच्याविषयी पुस्तक प्रकाशीत करणे हे दिव्य त्यांनी केले, त्यांचे विचार, अडचणी, धडपड या माध्यमातून जगासमोर आणले, याचे खूप कौतुक वाटले आणि त्यासाठी त्याना अगदी मनापासून सलाम !
त्यांच्याविषयी लिहावे तेवढे कमीच !
त्यांच्या विषयीचा माझा एक अनुभव खास शेअर करावा वाटतो.
मलाही कुणी दोन वर्षांपूर्वी सांगितले असते, की तू काही लिहू शकशील, तर मी हसले असते. माझे मिस्टर हेमंत मुसरीफ हे उत्तम कविता करतात, त्यांच्या बालभारती पाठ्यपुस्तकात सुद्धा कविता आहेत. ते नेहमी मागे लागायचे. पण माझ्या आवडी म्हणजे सर्व गृहिणींसारख्या नवेनवे पदार्थ करणे, घर सजवणे, रांगोळ्या, विणकाम, भरतकाम, ज्वेलरी बनवणे.. अशा होत्या. त्यामुळे मी दुर्लक्षच करायची. पण अलीकडे खूपच मागे लागले, की तू बनवतेस ते फक्त लिहून तरी काढ.. मग मी सुरुवात केली लिहायला. श्री. देवेंद्रजी यांचे मुक्त व्यासपीठ मिळाले मग काय ? मला अशक्य वाटणाऱ्या या गाडीला प्रोत्साहनाचे इंधन मिळाल्यावर गाडीने जोमाने वेग घेतला. सुरुवातीला मी जमेल तसे लिहित होते. एकदिवस सकाळीच चक्क मला सौ.अलकाताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, मी तुमच्या रेसिपीज वाचते. छान लिहिता, पण…. असे म्हणून मी टाईप करताना ज्या चुका करत होते त्या, म्हणजे दोन शब्दातील अंतर, स्वल्पविराम, पूर्णविराम अशा होणाऱ्या चुका दाखवून त्यात सुधारणा केली तर लिखाणात खूप फरक पडेल असा मोलाचा सल्ला दिला.
गुरु वाक्य प्रमाण मानून मी तशा सुधारणा केल्या आणि खरंच, तेंव्हापासून माझा आत्मविश्वास खूप वाढला. आता माझ्या हजार+ रेसिपीज, ५००+लेख, प्रवासवर्णन, कथा अनेक दैनिके, साप्ताहीके, मासिके, दिवाळी अंक यातून प्रकाशीत होत आहेत. पण माझ्या लिखाणाला योग्य दिशा देणाऱ्या श्री. व सौ. भुजबळ जोडीची कायम ऋणी राहीन.
श्री. देवेंद्रजी आणि सौ. अलकाताईंच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
— सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
6)
अलकाताईंचे .. कॉमा….पुस्तक वाचायची इच्छा आहे..
त्यांचे त्याबद्दल कौतुक ..आदर ..अभिमान संमिश्र भावना दाटून येतात
सृष्टीजींची ही लेखमाला अतिशय आवडते ..छान …जे झाले ते झाले ..जे होईल ते होणारच..उगाच काळजी करू नये…आताचा क्षण विवेकाने जगावा ….सुरेख विवेचन
सुरेखाताईंचे ध्वजारोहण…चांगले ..
कला कुसर, शिवण काम, कशिदा काम बद्दलचा आळस प्रामाणिकपणे सांगितल्याची गंमत वाटली .. हल्दिया..वाचनीय
रेखाताईंची कविता छान.
— स्वाती वर्तक. मुंबई
7)
छान मुलाखत. अलकाताईंचे अभिनंदन.
💐💐💐
— गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे
8)
सौ. अलका मॅडम यांची प्रतिभांगण मधील मुलाखत ऐकली, बघितली.
खूप प्रभाविपणे त्यांनी स्वतःची मते मांडली आहेत. एकाच वेळेस सर्व अवधाने सांभाळताना स्वतः ला आनंद मिळवत, जीवन समृद्ध होत गेले, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वार्थ दृष्टिकोनातून अत्यंत प्रेरणादायी मुलाखत त्यांची झालेली आहे.
हा प्रेरणादायी प्रवास सुखकर होण्यासाठी, सर, तुमचे पाठबळ भक्कम मिळाले आहे, हेसुद्धा प्रकर्षाने जाणवते.
जीवनरथ संथ किंवा वेगाने पुढे जाण्यास रथाची दोन्ही चाके समन्यय साधत चालत आहेत, याचा प्रत्ययांनंद रसिक वाचकांना मिळत आहे.🙏
असाच सौ. अलका मॅडम यांचा प्रवास असाच सुरु राहो. हिच सदिच्छा🌹.
— सौ मीना घोडविंदे. ठाणे
9)
कर्तृत्ववान सौ.अलकाताई देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत ग्रंथालीच्या साहित्यव्रती उपक्रमात घेतली गेली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. देवेंद्रच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अलकाताईंचे कार्याचा, परिश्रमाचा फार मोठा वाटा आहे.
पुरुष प्रधान व्रृतीत कदाचित देवेंद्र हे मानतात की नाही हे अजून तरी लक्षात आलेले नाही. पण मी एवढेच म्हणेन की देवेंद्र मानो न मानो त्यास तुमची साथ मात्र नितांत आवश्यक आहे आणि तुम्ही सदैव देत रहालं याची १०१ टक्के खात्री देखील आहे. त्रिवार अभिनंदन..
— सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
10)
डॉ पांढरीपांडे यांचा लेख सामान्य लोकांचे गैर समज दूर करणाराच आहे ..छान.
आचार्य सरांच्या मतांशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपल्या घरच्या गणपतीवर तुमचा विश्वास नाही का ? तो तुमच्या मनोकामना पूर्ण करणार नाही का ? किती हे बाजारीकरण ? धक्के खात, अपमान सहन करत दर्शन …कींव येते या श्रद्धेची.
राजारामजींच्या पुस्तकांसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.
बेंगळुरू ची कार्यशाळा आणि लहान मुलींचा उत्साह बघून आनंद वाटला
निरोप बाप्पाला … कविता आवडल्या.
गेले दोन दिवस …नाना पाटेकर …यांच्यावर *नानाविध* लेख वाचलेत .. तरीही हा अंक वेगळाच..बेर्डेजींचा लेख खूप आवडला.. वेगळ्याच धर्तीचा असल्याने भावला.
गणेश भक्त नाना आणि ..नाना आणि मी हे देखील वाचनीय लेख आहेत.
प्रवासाचे साधन ..म्हणून बसचे वर्णन खिडकीतून छान दिसले .. आचार्यजी धन्यवाद..माझ्या बालपणीच्या प्रवासाची आठवण करून दिली ..
श्वेता गांधी यांच्या कवितेत त्यांनी नानांच्या नाटक सिनेमाची नावे खुबीने घातली आहेत .छान..
इतरही कविता छान आहेत.
— स्वाती वर्तक. मुंबई
“झेप” सदरात स्वाती वर्तक, मुंबई यांनी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ रघुनाथ शेवगावकर यांच्या यश कथेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
1)
आपल्या कार्याने समाजातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्यांच्या कार्यावर प्रकाश टाकून ‘न्यूज स्टोरी टूडे’ ने घेतलेली झेप स्वागतार्ह. एका दुर्गेने त्याचे केलेले स्वागतही स्वागतार्ह.
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. शेवगावकर सरांबद्दलचा लेख अप्रतिम.
सर कुलगुरू असताना आमच्या डिपार्टमेंटतर्फे अनेक कार्यक्रमात सरांचे मार्गदर्शन मिळाले होते.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
2)
खूप छान लिहिले आहे..
डॉ शेवगावकर यांची झेप खरोखरच प्रशंसनीय आहे.. छान माहिती मिळाली.. खूप शुभेच्छा.
— सौ.नीलिमा चांदोरकर. इंदूर
3)
शेवगावकरांवरील लेख फारच सुंदर आहे
— शिल्पा निगुडकर. इंदूर.
4)
झेप 27 या शीर्षकांतर्गत डॉ रघुनाथ शेवगावकर यांचा स्वाती वर्तक यांनी करून दिलेला परिचय खूप आवडला.
संपूर्ण लेखन जणू काही एका बैठकीत त्यांनी केलंय असा प्रवाह या लेखनाला आहे.
डॉक्टर रघुनाथराव यांच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला.सतत कार्यरत राहणं आणि नवीन नवीन कामं करणं हे त्यांचं वैशिष्ट्य….. त्यांचा आदर्श घेऊन आपणही काही चांगलं करावं अशी प्रेरणा स्वातीताईंच्या लेखनातून मिळाली.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्या घरी त्यांचं सतार वादन मला ऐकायला मिळालं.
श्रोत्याच्या हृदयाला भिडेल असं वादन ते करतात. त्यांचा चालण्या बोलण्यातला साधेपणा अतिशय आकर्षक आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी मी मोकळेपणे गप्पा मारू शकलो. त्यांना आणि त्यांचा परिचय करून देणाऱ्या स्वातीताईंना विनम्र नमस्कार…..
— मोहन कान्हेरे. गुरुग्राम
5)
डॉ शेवगावकर यांचा परिचय सार्थ उत्तम व्यक्तिचित्रणाचा नमुना . ते माझेही मित्र. आमचा विषय स्पेशलायझेशन एकच आहे. आम्ही दोघे एकत्र कुलगुरू होतो. एक परदेशवारी त्यांच्या सोबत झाली. प्रसन्न हसरे प्रतिभावान व्यक्ती उत्तम शिक्षक, संशोधक आहेत.
— प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
भूतान वृत्तांत : प्राप्त प्रतिक्रिया…
1)
नमस्कार, सर !
भुतानची खूप छान माहिती मिळाली. छायाचित्रांमुळे अधिक आकर्षक झाला.
— नागेश शेवाळकर.
2)
भूतान बद्दल सेवेकरजी म्हणतात ते अगदी योग्य.. अधिकांश पर्यटक प्रकृती संपदा, सौंदर्य स्थळे यावरच लिहितात पण या लेखात वेगळी माहिती मिळते .. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, त्यांच्या सीमेवर आपले लष्कर वगैरे …छान माहिती
वसुंधरा ताईंचे टेलर अकाउंट बद्दलचे अनुभव खूप काही शिकवून जातात.. शैली छान आहे लेखनाची
परविनजी म्हणतात,..ते खरेच आहे ..शिक्षण हे प्रभावी माध्यमच आहे.
कलामजींच्या दिनाचे औचित्य साधून लिहिलेली कविता वाचनीय.
— स्वाती वर्तक. मुंबई.
3)
भुतान विषयीचा लेख वाचनीय आहे. श्री. सुधीर सेवेकर यांनी या लेखातून अक्षरशः ते माहिती सहित डोळ्यांसमोर साकारले.
वर्णन वाचून आणि सुंदर फोटो पाहून कोणालाही भुतानला भेट देण्याचा मोह होणारच.
— स्नेहा मुसरीफ. पुणे
अन्य प्रतिक्रिया…
1)
साहेब नमस्कार,
‘कॉमा’ पुस्तकावरील परीक्षण अप्रतिम लिहिले आहे. मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता यामधून निर्माण होते.
— प्रा डॉ संतोष राणे. ठाणे
2)
“पंख जिद्दीचे” ही अतिशय सुंदर, समर्पक आणि प्रसंगोचित कविता ! उत्तम मानवंदना ! मनःपूर्वक अभिनंदन! 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर
3)
फारच सुंदर पंख जिद्दीचे 👌🌹👌.
— शोभा कोठावदे. नवी मुंबई.
4)
डॉॅ. प्रभा वाडकर यांनी काॅमाचे केलेले परिक्षण वेगळ्या स्वरूपात चित्तवेधक. कारण हा काॅमा केवळ अक्षरांमधले विरामचिन्ह नाही तर जीवनाच्या एका टप्प्यावर हा काॅमा आल्यावरही हा काॅमाच आहे, फुलस्टॉप नाही अशा प्रकारची जिद्द जगलेल्या एका लढाऊ स्त्रीचे आत्मकथन आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
5)
कॉमा..पुस्तक खूप भावनात्मक, हृदयद्रावी पण त्याहून अधिक प्रेरणादायी आहे असे दिसते …
धन्यवाद डॉ प्रभाजी
डॉ पांढरीपांडे यांचा लेख सद्य परिस्थितीवर नेमके बोट ठेवणारा आहे.. त्यांनी लिहिलेले अगदी बरोबर आहे या साऱ्यांना कॅमेरा दिसला की जणू काही चेव येतो..जणू…सारे काही तुझ्यासाठी..
सामान्यांना त्याचा किती त्रास होतोय, देशाचे होणारे कोट्यावधींचे नुकसान कोण भरून काढणार ?… हे कधी उमजणार ? सावरकर आठवतात…. देह आणि देव याच्या मध्ये देश असतो हे विसरू नका.
जीव जीवासी पै द्यावा, मग करू नये हेवा…किती उत्तम रीतीने विवेचन केले आहे सृष्टीताईंनी…धन्यवाद..
त्यांचे हे लेख संग्राह्य आहेत
कवितेच्या प्रकाशनासाठी त्यावर केलेले काव्य ….विशेष …
अर्चनाताई अभिनंदन
प्रशांत गौतम यांच्यावरील लेख खरोखर प्रेरणास्पद आहे असेच जिद्दीचे लोक स्वबळावर उंच शिखरावर पोचतात. उर्दूत म्हण आहे ती यांच्यासारख्या अद्वितीय इसमांसाठीच … “उडान परों से नहीं हौसलों से होती है”
सुधीरजींमुळे हिंगोलीचा वेगळाच दसरा कळला. छान. मला आमच्या ग्वाल्हेरचा दसरा आठवला.
गोडगट्ट झालेले फ्रुट सॅलड, तुतिकोरीन ची जागा. बघितलेले सूर्यग्रहण, केबिनच्या बाहेर केलेली स्वच्छता, चिऊ मुळे होणारे ब्रेक डाऊन …सारे वाचनीय आहे ..भाषेला ओघ आहे, प्रवाह आहे त्यामुळे सहज वाचत जातो आपण… वेदवतीजी छान.
दसऱ्यावरील दोन्ही कविता चांगल्या आहेत.
— स्वाती वर्तक. मुंबई
सौ वेदवती कुलकर्णी लिखित माझी जीवन नौका, भाग – २० वरील प्रतिक्रिया : –
आत्ता तुझी जिवन नौका वाचली खरच गं जादू आहे तुझ्या लिखाणात !
किती किती बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेऊन त्याचं छान सगळे चित्र डोळ्यासमोर उभे करतेस. विलक्षण हातोटी आहे ही तुझ्यात ! आणि गणित माझा प्रांत नाही म्हणणारी तू किती लीलया डेकवर असलेली लढाई (गणितं) मुकुंदराव यांच्या साथीने सोडवलीस !
मुकुंदराव ओरडून बोलले हे वाचून हसूच आले (त्यांना रागावता येत ?)
खूप छान वर्णन केलंस. पुढील भागाची उत्सुकता वाढली.
ही लेखमाला लवकरच पूर्ण होवून पुस्तक रुपात सगळ्यांसमोर येवो याच शुभेच्छा
👌🏻👌🏻👍💐💐
— वंदना ओगले. माधवनगर.
अन्य प्रतिक्रिया
1)
“जिथं तिचं आकाश” हे पुस्तक मी वाचले आहे. त्यामधील स्त्रियांनी त्यांचे कर्तुत्व ज्या प्रकारे गाजवले आहे ते वाचून स्तिमित व्हावयास होते. माझ्या मुलीसाठी मी ते पुस्तक घेऊन वाचून काढले त्यामध्ये मला सौ नंदिनीताई जोशी यांचे स्तोत्र पठणाचे काम मला खूप भावले.
माझ्या मुलीला त्यांनी विष्णुसहस्रनाम ऑनलाइन शिकविले. माझी मुलगी स्पेशल चाइल्ड असल्यामुळे त्यांनी तिला स्वतंत्रपणे शिकविले. त्यानंतर ती विष्णुसहस्रनामाचे पठण नित्यनेमाने करीत आहे. त्याचे फळ दोन महिन्यांमध्ये तिला विशेष मुलांची शाळा जय वकील फाउंडेशन कॉटन ग्रीन येथे प्रवेश मिळाला. तिथे ती रोज मेणबत्ती व पणत्या बनविण्याचे काम शिकत आहे.
त्यामुळे आमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारचे पुस्तक निर्माण केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि शुभेच्छा.
नंदिनीताई विष्णुसहस्रनाम तसेच इतर अनेक स्तोत्रे गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य शिकविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाला माझा मानाचा मुजरा. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
आजवर त्यांनी अनेक लोकांना विष्णुसहस्रनाम शिकवून सुखी केले आहे.
धन्यवाद.
— संतोष वर्तक. विजय नगर, अंधेरी, मुंबई.
2)
प्राची बद्दल वाचून त्याचे अभिमान वाटला. प्राचीवर उगवणारी सूर्य रश्मीच आहे ती..
हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
पूर्णिमाताईंचा कोजागरी छान ….. चांदण्यात न्हाऊन निघाल्यासारखे वाटते
पुस्तक परीक्षण चांगले …. या स्त्रियांच्या जीवनात आलेले कष्ट, त्यांनी केलेले कार्य मिळवलेला नावलौकिक…. वाचायलाच पाहिजे
बस प्रवास वाचनीय ..किरण आचार्य यांचा …
आशा रेखाताईंची कविता भावली.
— स्वाती वर्तक. मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
