उन गोंजारत
सावळी सावली
पूर्वे कडे पडलेली
तिचीच सावली.
सावलीचे नाते
झाडाशी जडते.
त्याच्या खोल मुळामध्ये
ओळखीचे पाते
पात्यावर लिहिली
जुनीच काहाणी
सय जुनीच आदिम
आज ठरली विराणी.
झाडाच्या पानांवर
दुःख कातिव कोरीव
झुलत्या फांदीवर
ओघळते दव.

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
