संपताच सण कोजागरी
लागतसे वेध दिवाळीचे
करोनी जय्यद तय्यारी
लगबगीने साफ सफाईचे…
परिसर सभोवती आंगण
रांगोळीने सजवण्यास
करुनी दिव्यांची आरास
संस्कृतीस गे जपण्यास….
फटाके व आतिषबाजी
धावती मुले अंगणात
अंधार हरवण्या आजी
दिवे पणत्या लावतात….
रंगावलीनक्षी दारामध्ये
पणती उजळे अंगणात
दरवळे सुगंध घरामध्ये
लागले वेध मनामनात…..
दिवाळी रम्य पहाटेस
सुगंधी अभ्यंग स्नान
दिवा लावून मानवतेस
उजळवू आपले सदन…..
तिमिरातून तेजाकडे
जातसे दीपावली पर्व
आनंद पसरे चहूकडे
भेटतसे जिवलग सर्व….

— रचना : सौ.मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
