Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार, मंडळी.
आपल्या स्वातंत्र्य दिन विशेषांकाला लेखकांचा आणि वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
उद्या रक्षाबंधन आहे. त्यासाठी व पुढील आठवड्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. धन्यवाद.
आपला,
देवेंद्र भुजबळ, संपादक.

आम्ही अकोटकर..
अत्यंत महत्वपूर्ण आणि
नवनवीन मेजवानीच.
खूप दुर्मिळ माहिती मिळाली.
– श्रध्दा वानखेडे

सहजच कधीतरी…
किती सात्विक रचना!
डिप्रेशन आणि इतर नैराश्याने ग्रासणाऱ्या मानसिक व्याधींचे हेच तर उत्तर आहे.
सुंदर कविता👌🏻👌🏻

अप्रतिम रसग्रहण !
मुळात आधी कवीवर्य, गीतकार गदिमांचे ईश्वरी शब्द, त्याला संगीतकार आणि गायक यांची मिळालेली सुरेख साथ. वीर रसाने ओतप्रोत भरलेल्या ह्या गीताचे आपण अतिशय सुंदर रस विवेचन केले आहे. आपले मनापासून आभार 🙏🏻
– डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका

ओठावरलं गाणं…
एकेकाळी गाजलेल्या या गाण्याचे आपण फार सुरेख रसग्रहण केले आहे. आपण अशीच ओठावरल्या गाण्यांची रसग्रहणाद्वारे आम्हाला आठवण करुन देता त्याबद्दल धन्यवाद.
– विवेक भावे

रसग्रहण फार सुंदर केले आहे. मनःपूर्वक आभार ! 🙏
– गुरुप्रसाद, निलाक्षी पिसोळकर

उत्तम रसग्रहण
विराग भावे

करिअरसाठी पर्याय असावेत – देवेंद्र भुजबळ यांची
शेषराव वानखेडे यांनी अतिशय सुंदर मुलाखत घेऊन ती वाचकांसमोर मांडली. या मुलाखतीतून देवेंद्र भुजबळ सरांचे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन तसेच स्वतःचे अनुभव स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रासाठी मोलाचे ठरतील.
– आनंद कल्याणकर, जेष्ठ पत्रकार, नांदेड

करिअरसाठी नियोजन आवश्यक – श्री देवेंद्र भुजबळ
“गर्दी असेल तिथे जावू नये.” देवेंद्र सरांचा हा संदेश, आजच्या पिढीला खूप मोलाचा असेल. “अपयश म्हणजे जीवनाचा अंत नसतो.” सरांनी दिलेला हा मंत्र, आजच्या पिढीने जरूर मनात कोरावा.सुंदर व उपयुक्त लेख आहे.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल

True & meaningful
– प्रीति परदेशी

पाऊस आणि हिरवाई
सुंदर लेख. खरंय, पावसामुळे लेखक, कवी, चित्रकार, गायक सर्वांच्या मनांत हिरवळ उमलते. 👌👌👌
– सौ लिना फाटक, इंग्लंड.

शिल्पा, लेख खूप छान आणि चित्रे सुंदर, समर्पक
– श्रीलेखा जोशी

तलवार…
Beautiful Kshitija
Did not know this hidden talent in you
Keep it up
All the best for ur new venture
– Anjali Amarapurkar

कविता स्वातंत्र्य दिनाच्या…
फारच छान
– मनोज सुराडकर

जीवन कोडे
Very nice.
This is one of the best. Keep writing,.
Pravin C Kapadnis

आठवणी स्वातंत्र्यसेनानीच्या…..
अतिशय स्फुर्तीदायक कारकिर्द…
माहिती व जनसंपर्क कार्यालयासाठी अभिमानास्पद की असे अधिकारी महासंचालनाललयात सेवेत होते.
त्यांचा आम्हाला अभिमान आहे.
– विकास पाटील. फिल्म एडीटर

समर्थ भारत
Happy Independence Day

I would like to add my existing strength, the Hard Work, Honesty, Loyalty and Dedication towards the service to the Nation. It gave me the wisdom to understand, what is good or bad for the people of India. As, the Independent India, failed to taste the real Freedom even after 75 years, which we got on 15 Aug, 1947, through the Supreme Sacrifices by our great Martyrs, which in fact, proved to be the mere transition of power to Develop our Nation Globally.
– Prachii Ganesh Jagtap

स्वातंत्र्य देवतेचा विजय असो…
सुंदर लेख आहे. छान
– सविता पोतदार

छंद झाला उद्योग !
नमस्कार
लेख फार छान आहे
छंदामधून उद्योग आणि आनंद फार छान आहे. आपण त्यास प्रसिध्दी दिली हे महत्वाचे आणि आजच्या पिढीस आदर्श आहे आणि त्यांनी यातून बोध घ्यावयास पाहिजे.
– मदन लाठी

हिरवे प्रेम
खूप सुंदर मनभावन कविता

साप आपला सखा
श्री.दिलीप गडकरी यांची सर्पविषयक माहिती अतिशय उपयुक्त.

मरावे परी अवयवरुपी उरावे…
देहदान किती महत्वाचे आहे हे आशाताई कुळकर्णी यांनी अतिशय सुंदर रित्या वाचकांना पटवून दिले आहे.मृत शरीराची जाळून राख करण्यापेक्षा जिवंत माणसाला त्याचा उपयोग झाला तर त्यासारखे पुण्यकर्म नाही
– अरूणा मुल्हेरकर, अमेरिका

छंद झाला उद्योग !
विश्वकर्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम मनाला भावला. आजच्या लेखांत प्रतिक्षा जाधव यांनी लिहीलेला तेजस देशपांडे यांनी सुरू केलेल्या उद्योगाबद्दल माहिती समजली व जुन्या कपड्यांतून नविन गोष्टी करण्याचा घरगुती बिझनेस त्यांनी सुरू करून एक खुप छान कल्पना सर्वांनसमोर मांडली आहे. स्तुत्य उपक्रम. तेजस देशपांडेंना सुयश येवो.
– सौ लिना फाटक, इंग्लंड

जीवन कोडे
अप्रतिम👌🏼💥
– सुमेधा

अतिशय समर्पक भावना.
– विनोद निकम

जीवनाचे कोडे अतिशय सुंदर रित्या उलगडले आहे. अप्रतिम 👌👌
– सुनिल कोतकर

जीवन कोडे, खुप छान
– दीप्ती भदाणे

जीवन कोडे, सुंदर कविता
राहुल कोतकर 👏👏

जीवन कोडे खूप छान 👌
– दीप्ती

जीवन कोडे खूप छान 👌👍
– लीना जोशी

जीवन कोड, सुंदर कविता
अर्पणा

बाल मेळा दणक्‍यात साजरा
👍👌सुंदर उपक्रम
– मोहन आरोटे

आम्ही यवतमाळकर…
यवतमाळचे छान वर्णन केले आहे. यवतमाळला न जाता सगळं गांव डोळ्यापुढे उभे राहिले.
– सौ. लीना फाटक

आम्ही यवतमाळकर…
लहानपणी च्या आठवणी दाटून आल्या। Yavatmal is Yavatmal
– मदन चिव्हणे

अप्रतीम वर्णन. यवतमाळला जाऊन प्रत्यक्ष भटकंती करायची उर्मी दाटून आली.
अविनाश

Varsha vahini khup sundar varnan ahe. Short but complete.
– Vikas Gopal Phatak

छान लिहिले आहे, आम्ही यवतमाळकर…
– जयंत फाटक

आम्ही यवतमाळकर , वाचून छान वाटले.
– भालचंद्र रघुनाथ फाटक

आम्ही यवतमाळकर…
यवतमाळचे रेखाटन अप्रतिम
– विलास कुडके

व्वा!….यवतमाळला प्रत्यक्ष गेल्याचा भास झाला…..
– सुहास

छंद झाला उद्योग !
छान लिहिले आहे। एक नवीन घरगुती उद्योगाचा परिचय करून दिला। इतरांना प्रेरणा देणारे लिखाण। अभिनंदन
– राजेश राजोरे

करिअरसाठी पर्याय असावेत – देवेंद्र
भुजबळ सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. करिअर चे इतके पर्याय नक्कीच युवकांच्या विचारांच्या क्षितिजांना अधिक विस्तारित करतील.
धन्यवाद भुजबळ सर.
– डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका.

नमस्कार
करिअर कट्टा मध्ये आदरणीय श्री भुजबळ सरांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आणि ते आजच्या तरुण पिढीला आवश्यक आहे आणि त्यात सरांनी आपला स्वतःचा आयुष्याचा प्रवास कसा केला ते अनुभव सांगितलं.
फार सुंदर माहिती आहे त्याच्या फायदा आजच्या तरुण पिढी ने घेवून आपल्या स्वतःच्या आयष्य सुधारण्यास मदत होते.
आदरणीय भुजबळ सरांचे आणि शेषराव वानखेडे सरांचे खूप खूप आभारी आहोत.
– मदन लाठी

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments