Sunday, March 15, 2026
Homeसाहित्यसुखी जीवनाची थाळी

सुखी जीवनाची थाळी

सुख कधी मिळतं काहो बाजारी
सहनशक्ती मिळेल का हो कुठं
मिळाली तर घेऊन या लौकर…!!

भिजवून ठेवते संयमाच्या हृदयात
बांधून ठेवते घट्ट ओठाच्या आत…!!

दुर्लक्षाच्या उबेत छान मोड येतील
सुखाचे कोंब दिसू लागतील…!!

प्रेम आणि आपुलकीचा खमंग मसाला
परस्पर स्नेह भराचं खोबरं वर पसरुन घातलं..!!

बंधन आणि मर्यादाचं मीठ घालते चवीला
आस्था देते समजूतीची कोथिंबीर घालून थोडी..!!

साखर पेरणी करते गोड गोड शब्दाची
वाढीस लागेल गोडी, कटू बोलणे देऊ सोडून.!!

झाली तयार डिश आपुलकीची
वरुन घातली साय तृप्तीची
सजली बघा डिश आस्थेची.!!

ही डिश एकजूटीने बनवायची
अगंत पंगत करून आनंदाने चाखायची..!!

आहे नां पंगत मजेची
पहाच करून मग डिश सुखाची.!!

सुरेखा तिवाटने

– रचना : सुरेखा तिवाटणे

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुरेखा ताई. खूपच छान जीवनाच्या रहस्याची कविता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments