Homeसाहित्यप्रश्न

प्रश्न

थेंबात पाणी
पाण्यात थेंब
आधी कोण ?

उन्हात झाड
झाडात उन्हं
कोवळं कोण ?

ढगात पाऊस
पावसात ढग
ओलसर कोण ?

नभात तळं
तळ्यात नभ
निळसर कोण ?

मनात काळ
काळात मन
गुंतलंय कोण ?

शून्यात जग
जगात शून्य
अपूर्ण कोण ?

दीपाली दातार

– रचना : दीपाली दातार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on जिचं तिचं आकाश : 23
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 3
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 3
स्वाती देशपांडे on माझी जीवन नौका : 2
मृदुला राजे on पुस्तक परिचय
Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 3
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : 3