Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल वर गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या, मीच लिहिलेल्या “मराठी नाईटेंगल : मीनाताई घोडविंदे” आणि “माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो” या दोन यश कथांना वाचकांचा इतका प्रतिसाद लाभला आहे की, सर्व प्रतिक्रिया या सदरात बसणार नाहीत, म्हणून त्या लवकरच स्वतंत्रपणे प्रसिद्ध करीत आहे.
आता वाचू या, अन्य लेखनावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)


नोकरीच्या संधी विडिओ बघितला ..एकाला अग्रेषित ही केलाय. छान वाटले

शुभ मंगल…वाचून दुःख होते…कधी आपला समाज सुधारणार ?

पप्पा… वाचून बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या माझे बालपण सुखावून गेले.. माझे वडील असेच .. एक वाक्य विचारले तर संपूर्ण शेक्सपियर दाखविले आणि पूर्ण नाटक त्यांना मुखोद्गत … सध्याची शैक्षणिक अवस्था बघून मनात येते ..पूर्वीचे हे लोक आज हयात नाहीत हेच किती छान … किती दुखावले असते… माझी एक परिचित …बी ए करीत होती ..मला म्हणाली, ज्ञानेश्वरीचे काही शब्द सांगशील का ? मी आनंदाने म्हटले.. वा.. तुला ज्ञानेश्वरी पाहिजेय का ? माझ्याजवळ आहे ..तिचे उत्तर..छे छे !!. ते काही नको …अभ्यासाला जे आहेत तेवढे बघायचेय बस …एवढी जड ज्ञानेश्वरी कोण धरेल ?
महाराष्ट्रातील मराठी शिकणाऱ्याची ही अवस्था ? दुःखद !

For your tomorrow we gave our today
वाक्य मनाला भिडते…
फडतरे यांची लडाख सफर वाचनीय.

उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेली गुजराती कथा खूपच हृद्य आहे. मनास भिडते. अनुवाद सहज सुंदर झाला आहे

अपर्णा काकिर्डे बद्दल वाचून खूप कौतुक वाटले.. छान, लोभस व्यक्तिमत्त्व… ओळख करून दिल्याबद्दल चित्रा ताईंचे आभार.
— स्वाती वर्तक. मुंबई

काजवा महोत्सव… सुंदर अनुभव.. मलाही असे फोटो एका नातेवाईकाकडून नुकतेच पाहिला मिळालेत.
— विजया केळकर. हैदराबाद

सन्माननीय पद्मश्री शंकरबाबा पापळकर ह्यांच्या कार्याला सलाम! अपंग, मतिमंद मुलांसाठी आश्रम चालवून त्यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म करणारा हा थोर पुरुष नक्कीच ईश्वरी अवतार असणार, कारण “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे!” …. तोच देव शंकरबाबांच्या रुपाने समाजात वावरत आहे.त्यांचे कार्य खरोखरच अभिमानास्पद आहे. १८ वर्षांवरील स्वतःची उपजीविका करण्यास सक्षम झाली नसल्यास त्यांना आश्रमात राहू द्यावे, ही शंकरबाबांची रास्त मागणी शासनमान्य व्हावी, हीच अपेक्षा आहे. कारण पालकांनी आपल्या मुलांना मरण्यासाठीच रस्त्यावर आणून सोडले होते, त्या मुलांना आश्रमात आणून त्यांचे रक्षण, पालनपोषण केल्यावर आता वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही म्हणून पुन्हा रस्त्यावर नेऊन सोडण्याइतके क्रूरकर्म कोणतेच नाही ! अशा मुलांच्या पुनर्वसनाची सोय शासनाने केली नसेल, तर त्यांना आश्रमात राहू देणे हाच माणुसकीचा धर्म आहे. म्हणूनच शंकरबाबांच्या ह्या मागणीचा पाठपुरावा करून त्याला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी मिडियाने जनजागृती व इतर सहकार्य करायला हवे.
सन्माननीय पद्मश्री शंकरबाबा ह्यांना विनम्र अभिवादन आणि ह्या लेखाच्या लेखिका नीला बर्वे ह्यांचे हार्दिक अभिनंदन.
🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर

💐 नमस्कार फारच छान मी सहमत आहेच.
व्हॅलेंटाईन डे नव्हे पद्मश्री डाॅ शंकरबाबा पापळकर डे 🙏
— अनिल चाळके.
सामाजिक कार्यकर्ता, बदलापूर

शंकरबाबा खरे हिरो आहेत अशी comment मी टाकली. लेखिका नीला बर्वे यांचा वाटसॅप नंबर / ईमेल देऊ शकाल काय ? त्यांना माझ्या भावना कळवू इच्छितो.
— प्रा. डाॅ. सतीश शिरसाठ. पुणे. ह. मु.लंडन.

शंकरबाबा यांना अभिवादन 🙏
— डॉ मिर्झा बेग. मिर्झा एक्प्रेस फेम.

लेख वाचला. स्वा.सावरकर यांचे जवळजवळ संपूर्ण चरित्रच थोडक्यात लेखात रेखाटले आहे. अभिनंदन. लेखाची भाषा व शैलीही ओघवती आहे. कंटाळवाणी नाही.👌👍
— ब रा देशपांडे.
निवृत्त उपसचिव, मंत्रालय. मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खासदार नरेश मस्कें नी छान लेख लिहिला आहे.💐
— भारती सावंत. नवी मुंबई

खा. नरेश म्हस्के यांनी सावरकरांच्या संपूर्ण जीवनावर लिहिलेला लेख वाचताना अभिमानाने छाती रुंदावते.

श्री. देवेंद्र भुजबळ यांनी सावरकरांच्या जाज्वल्य पत्रकारितेवर सुरेख प्रकाश टाकला आहे आहे. तसेच सावरकरांचा जीवनक्रम स्वतंत्रपणे यथासांग मांडला आहे

सर्वच लेख, पुस्तक परिचय वाचनीय.
वीर सावरकरांच्या चतुरस्त्र व्यक्तीमत्त्वाची पुन्हा एकदा उजळणी करून देणारा आजचा उत्कृष्ट अंक.
त्या थोर क्रांतीवीरास त्रिवार नमन🙏🙏
— राधिका भांडारकर. पुणे

१०
वर्षा भाबल ह्यांचे नाव लेखिका म्हणून साहित्यिक वर्तुळात बरीच वर्षे ऐकिवात होते, पण त्यांचा हा रोमांचक जीवनप्रवास माहिती नव्हता. न्यूज स्टोरी टुडे च्या माध्यमातून आज तो समजला म्हणून सर्वप्रथम संपादक श्री. देवेंद्र भुजबळ सरांना मनःपूर्वक धन्यवाद आणि वयाच्या ६२ व्या वर्षी नोकरीतील निवृत्तीनंतर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सौ. वर्षा भाबल ह्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढच्या शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
न्यूज स्टोरी टुडे ह्या प्रकाशन संस्थेची सर्वच पुस्तके खूप छान प्रेरणादायक आहेत. ठाण्यात ती एकत्रितपणे पाहायला व विकत घ्यायला मिळणार ही गोष्ट खूपच आनंददायक व अभिमानास्पद आहे. त्यासाठी श्री देवेंद्र भुजबळ सर, अलका भुजबळ मॅडम व सर्वच संबंधित लेखकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .🙏💐
श्रेयंका आणि तिच्या संपूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन .
— मृदुला राजे. जमशेदपूर

राधिका भांडारकर यांनी लिहिलेल्या “आता थांबायचे नाय” या चित्रपटाचे परीक्षण वाचून पुढील प्रमाणे अभिप्राय प्राप्त झाले आहेत.

आता थांबायचे नाय अभिप्राय..
फार सुंदर लिहिलंयत
— ऋचा पत्की. लातूर

Cinema tr khupch utkrusht ahe pn tyat je dakhvlay te tumhi tumchya shabdatun ajuch sudar post lihil ahe. Manala sparsh krnara cinema
— मनीषा भांडारकर. अमळनेर

तू उत्तम समीक्षक आहेसच. खूप छान समीक्षण.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

राधिका, अतिशय मोजक्या शब्दांत चित्रपटाचे सार फार सुरेख लिहिले आहे
— आरती नचनानी. ठाणे

उत्तम परीक्षण राधिका.
— वंदना जोशी. पुणे
६.
राधिका.. अगं छान लिहिलं आहेस.. मला सुद्धा हा सिनेमा याच दृष्टिकोनातून खूप आवडला.. आपण खेळाच्या बाबतीतले असे सिनेमे पाहिले आहेत पण प्रत्यक्ष तळागाळात असणाऱ्या लोकांच्या जिद्दीचे चित्रण याच्यात फार छान केले आहे.
— सुचेता खेर. पुणे

सौ. राधिका भांडारकर यांनी लिहिलेले “आता थांबायचं नाही” या चित्रपटाचे अल्पांश परीक्षण वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता जागी झाली. शिवराज वायचळ हे नाव खूप ऐकिवात आहे असे नाही पण त्यांनी चित्रपटासाठी निवडलेला विषय त्यांची चोखंदळ वॄत्ती दशवितो. स्वच्छता कर्मचारी हा सामाजिक स्तरामधील सर्वात निम्न स्तरावरील ठरतो. या कर्मचाऱ्यांची हालत दाठविणारा आणि त्यांची शैक्षणिक उन्नती दर्शविणारा इ. गोष्टींचा उहापोह असणारा हा चित्रपट नक्कीच सामाजिक जागृती करण्यास साहाय्यक असणार यात संशय नाही. सौ. भांडारकर यांनी परीक्षण लिहून एक समाजोपयोगी काम केले आहे असे मला वाटते. मी चित्रपट पाहीन.
— पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी. मुंबई

माझी जडणघडण भाग ५० अभिप्राय….

राधिका.
तुझ्या वडिलांचं, पप्पांच व्यक्तीचित्र तू खूपच सुंदर रंगवलं आहेस..
त्यांच्याकडून तुला सुसंस्कृतपणा, हुशारी, बुद्धिमत्ता, साहित्याची आवड, निसर्गाप्रती प्रेम अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी वारसा म्हणून मिळालेल्या आहेत.
आणि म्हणूनच तुझे व्यक्तिमत्व पण छान सर्व अंगाने परिपूर्ण आहे !!
कारण वारशामध्ये मिळालेल्या या गोष्टींचा तू पुढे पण चांगला उपयोग करून घेत आहेस.. विशेषता: साहित्यामध्ये !!
हाच खरा श्रीमंत वारसा तुला वडिलांकडून, घराण्याकडून मिळालेला आहे…
ग्रंथ संपदा, लोकसंपदा , ज्ञानसंपदा हीच खरी….
इतर संपदा येते जाते, हीच राहते जन्मभरी….
— सुचेता खेर. पुणे

Yr Pappa was a grt person indeed 🙏🏼
— जयश्री कोतवाल. दुबई

वडीलांबद्दल छान लिहिले. आहे “व्यक्तिचित्रण”.
त्यांचे व्यक्तिमत्त्व अगदी हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहिले. 🙏🏻
प्रत्येक लहानसहान प्रसंग, अगदी जिवंत केला आहे डोळ्यासमोर.
धन्य ते आपले “पप्पा”🙏🏻
— छाया मठकर. पुणे

मला हे वाचताना नेहमीच रडू येतं. आपण पप्पांना शब्दात नाही पकडू शकत. किंबहुना आपल्याला ते कधी पूर्ण समजलेच नाही असं वाटतं.
माझ्या आजूबाजूची माणसं इतकं materialistic वागतात की मला असं वाटतं, पप्पा असे वागलेच नसते.
त्यामुळे आपणही तसा विचार नाही करू शकत. इतका मोठी माणूस आपल्या अवतीभोवती होता पण आपल्याला आकलनच नाही झाले.
त्यांना माहीत होते 31 मे त्यांचा लास्ट दिवस होता. त्यांना मरणाची भीतीच वाटत नव्हती. मला नेहमी वाटायचं मी त्यांची खूप लाडकी आहे.
मला ते इतकं मन लावून शिकवायचे. परीक्षेची भीती वाटायचीच नाही. कारण सिलॅबस हून कितीतरी जास्ती मला यायचं. पण तू रडवतेस आणि हे रडणं हवंसं वाटतं.
— अंजोर चाफेकर. मुंबई

‘पप्पा’ खूप छान लिहिलं आहेस. त्यांचं व्यक्तिमत्व अगदी वेगळं, अत्यंत प्रभावी होतं. त्यांच्या आचार – विचारांचा पगडा तुमच्यावर बसणं स्वाभाविक होतं.
साहित्य, निसर्ग, बागकाम — अशा अनेक गोष्टीची त्यांना आवड होती हे वाचून मला खूप छान वाटलं. माझे वडील 1983 मध्ये गेले.
पप्पांना विनम्र अभिवादन 🙏
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

तुझा पप्पावरचा लेख वाचला. तू छान लिहीतेस यावर प्रश्नच नाही. पण वाचताना तुझं त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा जाणवते आणि असं वाटतं की तू त्यांच्या वर संबंध पुस्तक लिहीलस तरी तुला वाटेल काहीतरी राहून गेलं.
— संध्या जंगले. मुंबई

खूप छान ओघवात्या शैलीत वडिलांची ओळख करून दिली आहे.
— अजित महाडकर. ठाणे

Tumchya wadilancha parichay etkya sunder n sopya shabdat mandla. Amhala wachtanna khoopch chhan watale. Kharach very nice 👍
— मीना वाघमारे. अमरावती

पप्पांविषयी बोलावे, लिहावे तेवढे थोडेच आहे. तू तुझ्या वेचक शब्दात पप्पांची मूर्ति साकार केलीस. त्यांचे आचार, विचार आपल्या वर्तनात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली हे अगदी खरे आहे.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
१०
तू लिहिलेला जडणघडण चा भाग वाचला. प्रत्येक मुला मुलीला आपला जन्मदाता विशिष्ट वयापर्यंत आदर्श वाटत असतोच. पण तुमच्या लेखनातून जाणवते की आजही तुमच्या मनमंदिरात पपांचीच मूर्ती केवळ एक आदर्श म्हणून नव्हे तर ईश स्वरुप अशी प्रस्थापित आहे. प्रेम आणि आणि आदर निरपेक्ष आणि निरंतर असेल तर त्याचे मोल अनमोल असते असे मानावे. या दॄष्टीने तुम्ही अतिशय उत्कटतेने आपल्या जन्मदात्याचे व्यक्तीमत्व रंगवले आहे. ते चितारताना तुम्हाला शब्दांची कमतरता पडलेली नाही. त्यांच्या गुणांचे वर्णन करताना तुम्ही थकत नाही तर ‘गुण गाईन आवडीने’ असेच जाणवते. त्यांचे बहुव्यासंगी चरित्र लिहिताना जर तुम्ही काही विशेष प्रसंग नोंदवले असते तर वाचकाला पपा अधिक भावतील. दूध आणि पाल हा एकच प्रसंग तुम्ही लिहिला आहे. गुणवर्णन करताना मला जाणवले की तुम्ही पपांना साथसंगत देणा-या त्यांच्या सहचारिणी बद्दल उल्लेखही केलेला नाही. अर्थात तुम्ही मातोश्री वर स्वतंत्र लेख लिहायचे ठरवले असणारच‌‌. तरीही त्यांचा उल्लेख नसणे म्हणजे पपांचे अर्धांग न दाखवण्यागत वाटले. असो. भाषा as usual ओघवती आणि प्रवाही आहे. तुमचा हात खूपच सरावलेला जाणवतो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
— पुरुषोत्तम रामदासी. मुंबई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?