Homeसाहित्य"राष्ट्रसंत"

“राष्ट्रसंत”

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !”
– संपादक

तुकडोजी महाराज होत राष्ट्रभक्त संत
समाज उद्धार करती जनजागरण IIधृII

माणिक बालवयापासून विठ्ठल भक्त
गुरु अडकोजींनी ठेवले तुकडोजी नाम
मराठी हिंदी भाषेत त्यांनी लिहिले ग्रंथ II1II

सहभागी होते तुकडोजी स्वातंत्र्य लढ्यांत
गीते लिहीती करती स्फुल्लिंग निर्माण
कारावास भोगला त्यांनी स्वदेश हितार्थ II2II

राष्ट्र सुरक्षेसाठी सांगितला गीतेचा अर्थ
अनिष्ट चालीरीतींना करिती विरोध
सुराज्यासाठी करिती देशभर भजन II3II

गावोगावी भजनी मंडळे केली स्थापन
गुरुदेव सेवा मंडळाने केले जन जागृत
एकात्मिक ग्रामोन्नतिची दिली शिकवण II4II

भारत कृषिप्रधान व्हावा पाहती स्वप्न
आत्मनिर्भर उद्यमशील व्हावा विकसित
विश्वबंधुत्व मंत्र ग्रामगीता केली प्रदान II5II

राष्ट्र संतांचे कार्य विशाल साहित्य महान
स्त्री शिक्षण जागृती केली टाळीत भेदाभेद
संत तुकडोजी महाराजांना करू वंदन II6II

अरुण गांगल

— काव्य : अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments