Sunday, June 22, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… या सदरात आपलं स्वागत आहे. “मराठी नाईटेंगल : मीना गोडविंदे” या यश कथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या आहेतच. तथापि त्या नंतरही काही प्रतिक्रिया प्राप्त झाल्याने त्या आणि इतर प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ. (संपादक)

“मराठी नाईटेंगल : मीना गोडविंदे”  या यश कथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या उर्वरित प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…


प्रिय मीना,
तुझ्या जीवन कार्यावर देवेंद्रने लिहिलेला लेख सावकाश वाचला. त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला.

ज्याला नोबेल प्रोफेशन म्हणतात अशा पवित्र पुण्य कामांमध्ये आजवर तू अत्यंत व्यस्त होतीस. तुझ्या क्षेत्रात तू उत्तम नाव कमावलं.सर्व अडचणी दूर सारून आपलं शिक्षण पूर्ण केलं तेही वडिलांना मदत करून आणि कार्यक्षेत्र ही असं निवडलं की जिथे सदैव कष्ट आहेत याबद्दल तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.

माहिती जनसंपर्क विभागाचं अधिकार पद भूषवल्यानंतर माझ्या मित्राने आणि अलका भुजबळने अतिशय सकारात्मक आणि समाजासाठी गुणात्मक काम करणाऱ्या बातम्यांचं व्रत घेतले आहे. अशाच उत्तम कामांच्या मुलाखती सुद्धा ते प्रसारित करत आहेत. मला आनंद याचा झाला की आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट असणारी माझ्या जवळची ही दोन माणसं मला या लेखात एकत्र वाचायला मिळाली.

मीना तुला आणि देवेंद्र भुजबळ यांना तुमच्या उत्तरे आयुष्यातील कामांसाठी खूप खूप शुभेच्छा💐🙏
— वासंती वर्तक, दूरदर्शन निवेदिका.
लेखिका, ठाणे

आयुष्याशी झुंजत झुंजत अथकपणे संकटांमधून वाट काढत पण तरीही जीवनाबद्दल थोडी देखील कटुता न बाळगता माणसांवर माणूस म्हणून करण्याचा स्वभाव असल्याने अखंड सेवाभावाने केलेले परिचारिकेचे काम, आणि यातूनही वेळ काढून साहित्य, संगीत, कला या क्षेत्रात केलेली दमदार वाटचाल वाचताना मला तुमचे खूप कौतुक वाटले, आणि त्याचबरोबर दडपण देखील आले. आपण बव्हंशी व्हाट्सऍप द्वारेच संवाद साधला आहे, पण त्यात माझ्याकडून काही चूक भूल झाली असल्यास मी येथे दिलगिरी व्यक्त करतो.
आपले व्यक्तिमत्व असेच चौफेर बहरत रहावे हीच सदिच्छा.
— कवी उदय भिडे. ठाणे

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सौ.मीना घोडविंदे यांना हार्दिक शुभेच्छा.
ठाणे शहरात सर्वांना परिचित असलेल्या एका अतिशय सर्वसामान्य पण सुसंस्कृत कुटुंबातून वर आलेल्या एक सिद्धहस्त लेखिका, कवियत्री,  गायन कला व संगीत यांची आवड, समाजकार्य करताना त्यात कर्तुत्वाचा ठसा उमटवणारी सर्वांना शक्य असेल त्या प्रकारे हस्ते पर हस्ते मदतीला धावणारी अशा या सौ मीना म. घोडविंदे यांना सलाम.

गेली 50 वर्षे परिचित असलेल्या सौ. घोडविंदे या ज्या समाजाची लोकसंख्या पाच आकडी सुद्धा नाही अशा आमच्या काळण समाजातून  सामान्य ते असामान्य पर्यंत पोहोचणे यालाच बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणतात. युवा चळवळ ते आजतागायत समाज एकत्र आणण्यात आमच्याबरोबर त्यांचा मोठा सहभाग आहे.अनेक वर्तमानपत्र, पुस्तक, मासिक आणि प्रसंगीक अंक यात त्यांचे लेख असतात तसेच त्या आरोग्य क्षेत्राला जास्त प्राधान्य देतात कारण त्यांचे आयुष्य त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी  वेचले त्या कक्षा अधिकारी प्रभारी परिसेविका शासकीय रुग्णालय ठाणे या पदावर कार्यरत होऊन निवृत्त झाल्या. लहानपणापासून आईपणाची जाणीव असलेल्या या विदुशीला माझा सलाम.ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात  सर्वांचा हात घेत आणि सर्वांना हात दे वाट काढणाऱ्या या  सौ.मीना  घोडविंदे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

संचालक लेखक श्री भुजबळ यांनी  सौ घोडविंदे यांच्या साहित्य आणि सामाजिक कलागुणावर जे लिखाण केले त्याबद्दल त्यांना नमस्कार आणि आभार.
धन्यवाद.
— दिनेश ल. काळे.
जेष्ठ समाजसेवक काळण समाज. ठाणे

मीनाताई,आपल्या यश कथेवर प्राप्त झालेले सर्व अभिप्राय वाचले. अभिप्राय वाचल्यानंतर भुजबळ सरांनी उत्कृष्ट लेख लिहून तुमची जडणघडण आणि तुमच्या समाजकार्याची डोळस ओळख करून दिली आहे याची खात्री पटते….. देवेंद्र भुजबळ सरांनाही खूप खूप धन्यवाद आणि तुमचंही पुनश्च अभिनंदन 💐💐
— कवी, समीक्षक विकास भावे. ठाणे

*माझी जडणघडण भाग ५१ अभिप्राय*


बिंबा, लग्नाचा तुझा हा सुरस  किस्सा‌ मला भारीच प्रभावित करुन गेला.  😌 ठाण्याची, मुंबईत नोकरी करणारी एक स्मार्ट मुलगी अंमळनेर सारख्या ठिकाणी , तिच्या लाडक्या पपा आणि जीजी पासून दूर कशी काय रमली असेल 🤔 असा प्रश्न मला पडला. पण जशी वाचत गेले तसं लक्षात आलं की त्या मातीनी, सुरुवातीलाच परकेपणाची भावना दूर करणाऱ्या भांडारकर कुटुंबानी  आणि विलास सारख्या सुशील पतीनी तुला आश्वस्त केलं तर! किती गोड ग.😘
पुढे तू कशी रुळत गेलीस हे वाचण्याची उत्सुकता आहे बिंबा.
— अलका वढावकर. ठाणे

लग्न म्हणजे आयुष्यातील एक मोठा जुगार ! चांगले लाभले की आपलं नशीब ! अशी म्हण आहे की नारळ आणि नवरा कसा लाभेल सांगता येत नाही.. आता काळ बदलला आहे.जास्त करून मुलं-मुली आपापली लग्नं ठरवतात.
आपल्या वेळी तसं नव्हतं. पत्रिका मुलीला दाखवणे आणि बाकी घराची बॅकग्राऊंड या गोष्टीवरच लग्न ठरवत असे. तुमचा लेख वाचल्यावर मला पण माझ्या लग्नाची कथा आठवलीच ! सुदैवानं सर्व छान झाले. तुमचेही छान झाले ! आठवणींच्या रूपात ते वाचताना आनंद मिळतो..
— उज्वला सहस्रबुद्धे. पुणे

राधिका…
किती सगळं छान, सरळ आणि सुंदर लिहिले आहेस !!मला फार आवडलं..
खरं पाहिलं तर लिहिण्यासाठी हा विषय अवघडच पण तू तो एकदम तुझ्या भाषेवरील प्रभुत्वाने सोपाच करून टाकलास! आवडला मला लेख.
— सुचेता खेर. पुणे

किती  सुंदर लिहिलय.
आता पुढील जीवनक्रम वाचायची उत्सुकता लागली. सासरघरच्या वाड्याच्या वर्णनाने आम्ही देखील अंमळनेरच्या वाड्यात तुमच्या बरोबर प्रवेशलो😊👌🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

विवाह, विवाहानंतरचे झालेले परिवर्तन अगदी मोजक्या शब्दात छान सांगितले आहे, राधिकाताई
— छायाताई मठकर. पुणे

विवाह सुंदर. Liked Vilas’ answer to your question. So much maturity at that young age age.👌🏻👏
— संध्या जंगले. मुंबई.

खूपच छान.
मजा आली वाचताना. सगळा वाडा डोळ्यासमोर आला.
— अंजोर चाफेकर. मुंबई

एखाद्या लग्नाळू तरुणीच्या भावना  आणि विवाहानंतर आयुष्यात होणारे फार मोठे परिवर्तन राधिकाताई तुमच्या स्वानुभवावरून अतिशय सुंदर शब्दात आपण वर्णन केले आहे. प्रत्येक स्रीला आवडेल आणि पटेल असाच हा लेख आहे.
दर सोमवारी आम्ही फार उत्सुकतेने आपली जडणघडण वाचण्यासाठी तत्पर असतो.
ही लेखमाला अशीच चालू ठेवावी.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

किती सुंदर !! कुमारीकेची  विवाहिता झाल्याचा सुंदर प्रवास शब्दांत गुंफत गेलीस!
खरच, जडण घडण संपूच नये असं वाटतं !
— आरती नचनानी. ठाणे
१०
विवाहाचा पुढचा भाग वाचायची ऊत्सुकता लागली आहे. पप्पांवरचा लेखही छान जमलाय. आईवर अनेक लेख कविता लिहील्या गेल्यात पण वडिलांवर इतका सविस्तर, भावपूर्ण माया आदर, मैत्री, आपलेपणा आणि मुख्य म्हणजे सगळ्या मुली जन्मल्या याचा खेद न करता मोठ्या मनाने आदराने वाढविल्या याचा फार अभिमान वाटला. नेहमी प्रमाणे साधी ओघवती भाषा मनाला भावली .
— रेखा राव. मुंबई
११
भाग 51 -= ‘ विवाह ‘
फारच सुंदर लिहिलं आहेस. खान्देश, अंमळनेर बद्दल वाचून छान वाटलं. ‘ हो ‘ म्हणणाऱ्या पहिल्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय ?
पण तुझ्या सारखी जोडीदार मिळाली आणि त्यांचा विचार योग्यच ठरला.
तुम्हा उभयतांचे आयुष्य असेच आनंदात जावो. 😊🌹🙏
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
१२
खूप छान शब्दांकन 👌
— अजित महाडकर. ठाणे

*अन्य लेखनावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत* .


दैनिक पुढारी वर्तमानपत्र वर्धापन दिनानिमित्त आपण केलेले भाषण खूप छान वाटले, त्या भाषणाचा सर्वांना नक्कीच फायदा होईल.!🙏
— अनिल दस्तुरकर. नांदेड

उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेल्या पाठवणी, संशोधन
या दोन लघुत्तम कथा वाचल्या. चांगल्या आहेत. पाठवणी.. भारी 👌🏼🌿
— सचिन पाटील. कथाकार

सन्मा श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
३ जून रोजी सायकल दिनाच्या निमित्ताने , आपण सायकलचा पूर्व इतिहास, युरोपातील विशेषतः जर्मनीतील कार्ल डस यांनी लाकडी सायकलचा शोध लावला, त्या प्रित्यर्थ युनायटेड नेशन्सने ३ जून ऐवजी १२ जून सायकलदिन म्हणून साजरा करण्याचे औचित्य साधता आले असते हा आपला विचार योग्य वाटत असला तरी, आधुनिकतेच्या नावाखाली आजचा दिवस सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.

यासंदर्भात आपण नेदरलँड्स या देशातील नागरिक विशेषतः एकाच कंपनीतील छोटे कर्मचारी वा मोठा अधिकारी सायकलने कार्यालयात ये – जा करतात ही संकल्पना इतर देशांच्या दृष्टीने अतिशय मौलिक वाटते. कारण, स्वयंचलित दोन वा चार चाकी वाहनांमुळे प्रदुषण होते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो ही नेदरलँड्स मधील नागरीकांची भावना अपूर्व वाटते.

आपण सदर लेखात नवी मुंबई महानगरपालिकेतील एका उपक्रमशील अधिका-याने सुरू केलेली भाडेतत्त्वावरील सायकल योजना आज कशी धुळखात पडली आहे, या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याबद्दल महानगरपालिका प्रशासन नक्कीच करेल अशी अपेक्षा व्यक्त करु या !!
सायकल दिनानिमित्त आपण एक चांगला लेख लिहिला त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा !!
— राजाराम जाधव. निवृत्त सह सचिव,
महाराष्ट्र शासन. नवी मुंबई.

राष्ट्रीय सायकल धोरण लेख अतिशय आवडला. बीजिंग मध्ये शाळेच्या वेळात काही रस्ते फक्त सायकल स्वारीसाठी राखीव ठेवत. बहुतांशी आया (mothers) मुलांना सायकलवर बसवून शाळेत सोडायला जाताना दिसत त्या दृश्याची आठवण आली. चार चाकी वाहनाना ह्या वेळात बंदी असल्याने अपघातांचे प्रमाण अर्थात कमी. सायकल निर्धास्तपणे चालवणे सोपे होते. पर्यावरण संतुलनात अप्रत्यक्ष मदत. हाही एक मुलांवर संस्कार.🙏
— सुलभा गुप्ते. पुणे

नमस्कार सर,
उज्ज्वलाताई केळकर यांची खेळण्याचे दिवस ही कथा वाचली. सहज साधी कथा पण मनाला हलवते. ‘खेळणी भंगारात देण्यापेक्षा झोपडपट्टीतील गरीब मुलांना दिल्यास त्याना न परवडणारी महागडी खेळणी मिळाल्याचा खूप आनंद होईल’ असे कुठेतरी मनात पक्के ठेवून खेळणी देण्यास गेलेल्या भाऊसाहेबांचा झालेला भ्रमनिरास यथास्थित दृग्गोचर होतो. सुंदर कथानुवाद.
डाॅ.विद्या मंत्री यांच्या नणंदबाईना काव्यमय शुभेच्छा आवडल्या
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

*“घर सखी” कवितेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….*

घरसखी मुळे एकमेकींचे जीवन सुसह्य तर होतेच शिवाय आपला संसार करता करता तिच्या संसाराला पण आपण थोडीशी का होईना मदत करतो याचे समाधान वाटते.
— सौ सुनंदा विष्णु गायकवाड. वरीष्ठ शिक्षक

आपण वापरून झालेले पण चांगले असे त्यांना उपयोगात येईल अशा सर्व गोष्टी सहज घर बसल्या त्यांना देणे सोपे जाते. मी तर माझ्या घरसखीचे पी. पी. एफ अकाउंट पण उघडले आहे. दर महिना आम्ही पोस्टात जाऊन तिचे पैसे भरतो.
— राजश्री भिडे.

‘व्यथा योग्य शब्दात् मांडली आहे.
— अविनाश घाग.

गजाभाऊ,अतिशय मार्मिक कविता आणि नाव देखील (घर सखी). कमीत कमी शब्दात त्या वर्गाचे वास्तव  डोळ्यासमोर उभे झाले 🙏
— कविता पुरोहित.

Tyanchya jeevavar amhi nokari karto aata
Mazya aatachya doghihi  sakhi 7 varshe zali.
— priti

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on जिचे तिचे आकाश…: १३
सौ. सुनीता फडणीस on योग : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश…: १३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे
ज्ञानेश्वर वि जाचक on करवंदे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १२
अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?