Thursday, January 16, 2025
Homeसाहित्यस्वच्छतादुत

स्वच्छतादुत

आज संत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन आहे त्या निमित्त केलेली कविता…
संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

स्वच्छतेचा दुत तू खरा,
नाव तुझे गाडगे बाबा,
आरोग्याचा मंत्र दिला तू खरा
प्रेम ज्ञानसागराचा निर्मळ बाबा ॥१॥

अज्ञान अंधश्रध्दा दुर करा
शिक्षणाचा यज्ञ अखंड करा
तु दिलास सल्ला खरा
घरोघरी स्वच्छतेचा नारा ॥२॥

विज्ञानाचा तू निर्मळ झरा
समाजसेवी तू माणुस खरा
धर्माचा अभ्यासक तू खरा
संत तूच रे अध्यात्माचा झरा ॥३॥

मन केलेस तू मानवाचे स्वच्छ
जळमटे काढली अध्यात्माची
ज्ञानाचा खरा तू दूत स्वच्छ
दिशा दिलीस तू जीवन जगण्याची ॥४॥

गाडगे बाबा खरा रे तू संत
आजकालचे रामरहिम फक्त जंत
तू आज नाहीस हीच मोठी खंत
तूच खरा संत तूच खरा महंत ॥५॥

शिकवलेस तु आम्हांस
समाजसेवेसह स्वच्छता
अज्ञानापासुन दूर केले आम्हांस
खरा आहेस तू दुत स्वच्छता ॥६॥

पंकज काटकर

— रचना : पंकज काटकर. काटी.ता.तुळजापुर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय