Homeलेख"गाढव" आपला मित्र !

“गाढव” आपला मित्र !

गाढव हा अतिशय भोळा प्राणी आहे. तो आपले काम शांतपणे करत असतो. असे असूनही तो बिचारा अनेकदा चेष्टेचा धनी ठरतो. कुत्रा, मांजर, घोडा, गाय, बैल, उंट, हत्ती आदी पाळीव प्राण्यांपेक्षा गाढवाच्या नशिबी कौतुकापेक्षा अवहेलनाच येत असते. काही भाषांमध्ये एखाद्या माणसाला चक्क “गाढव” म्हणुन त्याची मानहानी करण्यात येते. याला आपली मराठी ही अपवाद नाही !

एखादा माणुस जसे वागणे अपेक्षित असतो तसे तो वागला नाही तर, मराठीत त्या व्यक्तिला खुशाल, “काय गाढवपणा केलास ?” असे म्हटल्या जाते ! इंग्रजीतही नको असलेले काम केल्यास त्यास Donkey work म्हणतात.

गाढवाचे वैज्ञानिक नाव Equus asinus आहे. गाढवाची उंची सुमारे ७० ते १५० सेंटीमीटर असते. प्रौढ गाढवाचे वजन सुमारे ९० किलो ते ४०० किलो पर्यंत असू शकते. गाढव भिन्न आकार आणि रंगांमध्ये असते. जंगली प्रजाती खुरांपासून खांद्यापर्यंत सुमारे ४९ इंच वाढतात त्यांचे वजन सुमारे ५५० पौंड असते. सिसिलियन गाढव सर्वात लहान असते. ते फक्त २४ इंचांपर्यंत वाढू शकतात.

गाढवाला बुरो या नावाने देखील ओळखले जाते. गाढवे जगभरात आढळतात. घोडे आणि झेब्रा हे प्राणी ज्या इक्विडे कुटुंबातील आहेत, त्यातच गाढवही समाविष्ट आहे. नर गाढवांना जॅक म्हणतात आणि मादींना जेनेट किंवा जेनी म्हणतात.

गाढवांचे दोन प्रकार आहेत. एक पाळीव आणि दुसरा जंगली. पाळीव गाढवे वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यांची पैदास कशी होते यावर ते अवलंबून असते. स्पेन, चीन, नायजेरिया, मारीटॉनिया, बुर्किना फासो हे देश गाढवाच्या मासाचे प्रमुख उत्पादक आहेत.

“भारतातील गाढवे”
भारतात २०१९ च्या पशुगणनेनुसार गाढवांची लोकसंख्या १.२० ते १.२३ लाखांच्या दरम्यान होती. २०१२ मधील ३.२ लाखांच्या तुलनेत त्यात ६०% पेक्षा जास्त घट झाली. सर्वाधिक गाढवे राजस्थानमध्ये आढळतात. (सुमारे २३,०००) होती. महाराष्ट्रातही गाढवांची संख्या कमी झाली असून, नांदेड सारख्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात ती आढळतात. गाढवांची संख्या कमी होण्याची कारणे म्हणजे बांधकाम आणि वाहतुकीत गाढवांचा वापर कमी होणे, बेकायदेशीर कत्तल ही आहेत.

भारतीय जंगली गाढव केवळ गुजरातच्या कच्छ भागात आढळतात. या जंगली गाढवांची संख्या २०२४ मध्ये वाढून ७,६७२ झाली आहे.

देशातील गाढवांची संख्या कमी होत असल्याने, केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत गाढव पालनासाठी प्रोत्साहन दिले आहे.

अशा या गाढवाच्या उपयुक्ततेची योग्य ती दखल रझिक आर्क या शास्त्रज्ञाने दहा वर्षांपूर्वी घेतली आणि म्हणुन तेव्हापासुन 8 मे हा दिवस जागतिक गाढव दिन म्हणुन साजरा करण्यात येऊ लागला आहे.

आजच्या जागतिक गाढव दिनाच्या निमित्ताने, इतर पाळीव प्राण्यांवर आपण जसे प्रेम करतो, तसेच प्रेम गाढवावर देखील करण्याचा निश्चय करू या !
(संदर्भ : गुगल)


देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अरे वा ‘गाढव दिन’ही असतो हे आजच कळलं… खूप छान माहिती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments