Homeलेख'साक्षी'ची क्रिकेट सामन्यात वादळी कामगिरी

‘साक्षी’ची क्रिकेट सामन्यात वादळी कामगिरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे प्रत्येक वर्षी आयोजित महिला खुला वयोगट आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत साक्षी कानडी ही खोऱ्याने धावा काढत आहे. जळगाव संघाकडून खेळताना मागील एका महिन्यात साक्षीने तब्बल 3 शतक आणि 2 अर्धशतकासह जोरदार कामगिरी केली आहे.

याच स्पर्धेतील एकदिवसीय प्रकारात साक्षीने 8 सामन्यात 58 च्या सरासरीसह 470 धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकविले. यात नाशिक विरुद्ध 104 चेंडूत 13 चौकरासह 108 धावा आणि नांदेड विरुद्ध 114 चेंडूत 19 चौकार आणि एका षटकारासह 139 धावांचा समवेह होता. तसेच पुणे जिल्हा क्रिकेट संघाविरुद्द 65 धावांची सुरेख खेळीही यात होती.

नुकत्याच सुरुवात झालेल्या 20-20 सामान्यांमधेही साक्षीने पुन्हा एकदा मेट्रो संघाविरुद्द फक्त 64 चेंडूतच 19 चौकरासह दमदार 111 धावा फटकाविल्या तर रिक्रियेशन संघाविरुद्द 65 धावांची सुरेख खेळी साकारली. उर्वरित सामन्यांमध्येही धडाकेबाज कामगिरी करण्याचा मनोदय साक्षीने व्यक्त केला आहे.

आपल्या ह्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना साक्षी म्हणाली की, “मी फक्त माझा नैसर्गिक खेळ करत गेले, महाराष्ट्र आमंत्रित महिला स्पर्धेत खेळणे ही केवळ जबाबदारी नाही, तर सिन्नर आणि जळगाव या दोन्ही ठिकाणचं प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान आहे. संघाला समोर ठेवून सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा प्रयत्न आहे”

संघ व्यवस्थापकांनी सांगितले की, “साक्षी ही शिस्तप्रिय आणि प्रेरणादायी खेळाडू आहे. तिच्या ह्या कामगिरी मुळे संघ आणखी बळकट झालाय आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतोय.”

दरम्यान, सिन्नरचं क्रिकेट दिवसेंदिवस महाराष्ट्रच्या क्रीडाविश्वात आपली वेगळी छाप निर्माण करत आहे. श्री. सुनील कानडी, शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तरुण खेळाडू राज्यस्तरावर चमकत आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments