कवी शान्तीलाल ननावरे यांच्या “काव्यगंध” या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच विठ्ठल मंदिर, दादर येथे
संस्कृती संवर्धनचे ट्रस्टी श्री मोहन साळेकर, कोकण मराठी सहित्य परिषदेचे लेखक रविंद्रजी आवटी, न्यूजस्टोरीटुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ, कवी शान्तीलाल ननावरे यांच्या हस्ते एका शानदार समारंभात झाले.
यावेळी अनेक लेखक, कवी आणि मान्यवर रसिक बहुसंखेने हजर होते.
या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने आयोजित कवी संमेलनात सर्वंश्री कवी मालुसरे, रविकिरण पारडकर, राऊत कमलाकर, संतोष खाडे, डॉ लक्ष्मण शिवनेरकर, बामने, सोनवणे, जोशी मॅडम, शिल्पा पोडवाल, शशि दंभरे, शब्दचे संजय सिंघलवार यांनी सहभाग घेतला. सूत्र संचालन श्रीमती रश्मी म्हांबरे यानी केले. शेवटी सर्वांचे आभार, श्री शान्तीलाल ननावरे व नामदेव ननावरे यानी मानले .
– टीम एनएसटी. 9869484800