Monday, July 14, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

🕉️मेधा जोगदेव पुणे यांनी सादर केलेली “अशाच असतात बायका” कविता आवडली. छान जमली आहे.
कवयत्रींना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
🌼सुधाकर तोरणे🌼
– निवृत्त माहिती संचालक. नाशिक

अभिनंदन.
रामदास भटकळ अप्रतिम भेट.
– मोहनदास.
निवृत्त दूरदर्शन निर्माता. मुंबई.

रामदास भटकळ यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्या काळातले लोक गांधी, नेहरू, पटेल यांनी भारावलेले दिसतील.कारण जगणे आणि बोलणे यात खूप फरक असतो.
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ

Heartiest congratulations.
– Nirmala Samant Prabhavalkar
X Mayor. BMC. Mumbai.

“रामदास भटकळ : खळखळता उत्साह” हा लेख वाचला. या वयातही रामदासजी यांचा उत्साह आणि नवनिर्मितीची उर्मी पाहून त्यांच्यापुढे नतमस्तक झालो…
थोर व्यक्तिमत्त्व !!
– उद्धव भयवाळ. औरंगाबाद

Gandhiji was miracle n influence of his personality over many great men like Vinoba, Patawardhan n several others including many top brass in British govt was surprising.😊
– Ranjit Chandel
Retd. District Information Officer.

आशा कुलकर्णी यानी कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल खुप छान लिहिलेलं आहे.🙏
– सौ कल्पना विजय गव्हाणे. पैठण

वक्ता दशसहस्त्रेशु… आमचे सर होते… पुस्तक न पाहता मराठी शिकविणारे… गुरू.. 🌹🙏🌹
– सुधाकरराव धारव
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ

Article on Ba is wonderful. Author has painted Kasturba’s character beautifully.
Thank you Bhujbal saheb.🙏
– Ranjit Chandel
Retd. District Information Officer.

श्रीकृष्ण बेडेकर यांचा “आठवणीतील राम शेवाळकर” हा लेख अप्रतिम.🙏🏻🙏🏻
शब्द माझे सखे…. सुरेख
– उद्धव भईवाळ. नाशिक

🕉️”आम्ही माहेरवाशिणी” हा सौ.वर्षा भाबल यांचा सहलीवरचा अप्रतिम लेख आवडला. माहेरवाशिणींनी आपल्या आईच्या घरी कशी धमाल केली याचे सुरेख वर्णन त्यांनी केले आहे, बसमधील गमतीजमतीसह !
चहा काँफी, नास्टा, पुरणपोळीच जेवण, बटाटेवडे इत्यादी नुसतं वाचताच तोंडाला पाणी सुटले.
या सहलीचे उत्तम संयोजन केलेल्या सौ अलकाताई भुजबळांसह सौ वर्षा यांचे अभिनंदन.
📘-सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक📘

I wanted to shoot this Real Fun Fair.
– Ajit Naik. Sr. Cameraman. Mumbai.

श्रीकृष्ण बेडेकरांचा राम शेवाळकरांवरचा लेख फार आवडला.
शेवाळकर एक महान व्यक्तीमत्व. ज्ञानाचे भांडार. शब्दप्रभु..🙏🙏
– राधिका भांडारकर

राम शेवाळकर यांच्या आठवणी वाचनीय
आहेत. सरांनी वाशिम ला शांडिल्य, नांदेड ला अंबेकर, यवतमाळ ला मला मराठी शिकवले आहे… 🌹🙏🌹
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ

“माहेरवाशीण” अतिशय हृदयस्पर्शी लेख. प्रत्येकीला आईची आठवण होणारच. आईची जागा कोणीही या जगात घेऊ शकत नाही. ती जागा कुठे तरी या माहेरवाशीण येथे नक्की भरून येणार यात शंकाच नाही.
– रश्मी हेडे. सातारा

माहेरवाशिण भन्नाट व तितकीच हळुवार संकल्पना. खरचं अलका मॅडम ज्यांचे माहेर (विषेशतः)आई नाही त्यांना ही ट्रीप म्हणजे अप्रतिम मेजवानी. 🙏💃💃💃💃
– सुनीता नाशिककर
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई

वर्षा भाबल ह्यांचा माहेरवाशीण लेख माहितीपूर्ण आहे. वर्णन इतके सुंदर आहे की लगेच आपणही जावे अशी ओढ निर्माण झाली.
कॉन्टॅक्ट नंबर व पत्ता post केला तर बरे होईल.
– सुलभा गुप्ते. ऑस्ट्रेलिया

“आम्ही माहेरवाशिण”
मायेचा ओलावा हा दुधावरची साय असते ! छान वर्णन केले आहे. वाचायला मजा आली. धन्यवाद.
– विलास प्रधान. मुंबई.

आम्ही माहेरवाशिणी खूप मस्तच
– अपर्णा महाडिक. ठाणे

👍🏼 वाह !!! खूप छान सहलीचे वर्णन केले आहे…मला ही तिथे जावेसे वाटते…😀
– नीता

NewsStoryToday is very nice, informative, & entertaining portal. Keep it up ! 💐🙏
– Sujit Dol. Pune

आदर्श शिक्षिका : सीमा मंगरुळे
अभिनंदन.
खूपच मेहनत घेऊन, एक नवा आदर्श निर्माण केलात.

केरळ आयुर्वेद.
मनीषा पाटील
खूप उपयोगी माहिती.
– प्रतिभा चांदुरकर

विलास कुलकर्णी.
छान मुद्दे मांडलेत.
अशोक बी साबळे. Ex. Indian Navy. महाड

सर, केरळ मध्ये आयुर्वेद उपचार उत्तम होतात. अगदी फॉरेनर सुद्धा खास पंचकर्म, इतर आयुर्वेदीक उपचारांसाठी केरळ मध्ये येतात. तसेच काळीमिरी, लवंग,वेलची,जायफळ, तमालपत्र, असे मसाले खूप छान मिळतात. मी तिकडे गेलो की पत्नी आधी तिथून मसाले आणायला सांगते. निसर्ग सौदर्य तर आहेच🌴🌴
– गणेश जोशी, व्यंगचित्रकार. ठाणे.

छान आहेत दोन्ही अंक
बेडेकर यांचा आठवणीतील शेवाळकर लेख भावला.
– स्वाती वर्तक. मुंबई.

आदर्श शिक्षिका
केरळ आयुर्वेद
स्वप्नरंग स्वप्नीच्या
छान 👌🏻👌🏻
– सौ मंजूषा किवडे. पुणे

रामदास भटकळ एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व वाचनात आले. साहित्य व संगीतातील व्यासंगी आज 87 व्या वर्षीही सुद्धा गाण्याचा रियाज, लेखन ह्या मध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू न देता तरुणाईला लाजवेल अशा सळसळत्या उत्साहात जे कार्य त्यांच्या हातून घडत आहे त्याला तोड नाही. तरूणाईचा आदर्श म्हणून हा लेख जास्तीत जास्त तरुण युवकांमध्ये पोहोचणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील अनेक क्षण प्रत्यक्ष अनुभवलेले जाणकार म्हणून त्यांच्या साहित्याचा अभ्यास पूर्ण माहिती साठी उपयोग करणे आवश्यक आहे.
– सुधीर थोरवे
पर्यावरण व औद्योगिक सुरक्षा तज्ञ. नवी मुंबई.

साथी स्पोर्ट्स : यशोगाथा
खूप जबरदस्त
यांच्या कष्टाकडे पाहून उर भरून येते
साथी स्पोर्ट्स ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
– गणेश महामुनी.

आदर्श शिक्षिका : सीमा मंगरुळे
सीमाताई तुमचे मनापासून अभिनंदन. दुर्दम्य इच्छा, जोडीला जिद्द चिकाटी, संघर्षाची तयारी यामुळे तुम्ही शिखर गाठले.
युवापीढीसाठी उत्तम आदर्शवत् व्यक्ती आहात तुम्ही.
– राधिका भांडारकर.

ओठावरलं गाणं…
हिरव्या एकाकी झाडीवरचे घरकुल ,पती पत्नी व दोन पिल्ले आणि पतीची वाट पाहणारी पत्नी कवीकल्पनेप्रमाणे तंतोतंत डोळ्यासमोर उभे राहिले. सुरेख चित्रण!
– शुभा खांबेकर पाणसरे

ओठावरलं गाणं…
विकास भावे यांचा लेख मनापासून आवडला! अनेक स्मृती जाग्या झाल्या!
– प्रतिभा सराफ.

युद्ध काय असतं ?
वास्तविक कविता…ज्यांनी सोसलं…त्यांनाच खरी झळ माहित आहे…
– पूर्णिमा शेंडे.

मैत्री…
मैत्री शिवाय जीवन म्हणजे व्यर्थ आहे, मैत्रीबद्दलची संकल्पना अप्रतिम पद्धतीने मांडली आहे💐
– निशिकांत

मराठी पाऊल पडते पुढे
धन्यवाद. मला सामील व्हायला नक्की आवडेल. कृपया मला या मंचाबद्दल माहिती पाठवा. तुम्हाला माझ्याविषयी काही कळवू का?
– डॅा सुलोचना गवांदे.

‘मराठीच बोलू कौतुके’
मस्त सुलभाताई. म्हटल तर हलका फुलका पण बोध करणारा. मला माझ्या मुलाने पण डॅडींचे नाव “अहो” सांगितले होते त्याची आठवण झाली. ०२/११/२०२१ च्या याच वेबपोर्टलवर “निरागस फुलबाज्यात” त्याचा उल्लेख केला होता. आणखी असेच छान, छान लेख वाचायला मिळतील ना? धन्यवाद
– लीना फाटक. यु.के.

मराठी पाऊल पडते पुढे
खूप सुंदर लेख.
आपण जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूहात सामील व्हावे अशी विनंती करतो.
– विलास कुलकर्णी
जनसंपर्क अधिकारी जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह.
W’app no.
7506848664

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सामाजिक समतेत अमुल्य योगदान’
खरोखरच भारतमातेची ही कणखर महान दैदीप्यमान रत्नेच.
सावरकारांसारखी माणसं कारागृहातही मुक्त असतात. त्यांच्या ध्येयवादाला कुठल्याच शृंखला अडकवू शकत नाहीत.

‘मराठी माणसाची भाषिक जबाबदारी’
दिलीप गडकरी यांचा मराठी भाषेसाठी लिहीलेला लेख खरोखरच
बाणेदार आहे.आणि समस्येवर ऊपाय सांगणारा आहे
– राधिका भांडारकर

माझी “माय मराठी” !
अमर ज्योत आहात आपण मराठीची. जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूहात आपले स्वागत आहे. आपण समूहात सामील व्हावे अशी विनंती करतो.
विलास कुलकर्णी
जनसंपर्क अधिकारी जागतिक साहित्य कला व्यक्ती विकास मंच समूह
7506848664
– विलास कुलकर्णी

‘आपण काय ग्रहण करतो, त्याचा विचार करा – देवेंद्र भुजबळ’
अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर आणि अलका मॅडम!
तुमच्या कार्याला सलाम!
– मेघना साने

अभिनंदन देवेंद्र भुजबळ सर खूप खूप शुभेच्छा 🌹🌹अलका तुला पण शुभेच्छा 🌷
– वृंदा आदतराव

वर्षा भाबल ह्यांचा माहेरवाशीण हा लेख अतिशय आवडला. वर्णन ऐकून जाऊन येण्याची इच्छा झाली. शब्दांकन अतिशय सुंदर…
– सुनंदा पानसे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments