Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यवाचक लिहीतात...

वाचक लिहीतात…

माहिती’तील आठवणी  ( 4 )
बद्दल फेसबुक, वाॅटसअॅप ग्रुप व वाॅटसअॅप वैयक्तिक यावर आलेले अभिप्राय दि. 24/4/2022 पर्यंत

1)  Dear Kudakesaheb u have beautifully painted sweet memories of those days though some memories might be bitter but we learn from them also. While reading ur article i also peeped in to those days n got delighted.
I entered in our department in April 1985 n was immediately posted at Dio Yavatmal, late dy director manohar Gosavi was my first Dio. Ramesh Wabgaokar saheb selected me. In this Pendsesaheb helped me a lot to whom I would never forget. Prior to 1985 i was in directorate of languages. Pendsesaheb n i usedeto meet during tea time canteen on 15 floor. He became my friend n he guided me to come to our department. As belong to Yavatmal dist. My parents were old n job in languages was not transferable. I told my story to Pendsesaheb n he extended all help after Information Asstts posts became vacant. He also helped me to get posted at Yavatmal.

No Pendsesaheb since very beginning told me vacancies were very soon for information Assistants post n when it happened he took my application. Jogwarsaheb was looking after establishment n my file was moved through him. Because of my application was processed earlier jogwarsaheb knew this n following my application he would have suggested u to follow the suit.
Yes that i knew. He had his ancestral home in peshwe plots locality of Yavatmal.

Though name is too hard, person is too soft

Dear vilasji you have admirable writing talents n I try to read ur write ups as n when possible. Keep it up 👍🙏
– Ranjitsinh Chandel

2) रणजित, माझ्या आठवणीनुसार तुला प्रथमत: भाषा संचालनालयातील जोगवार साहेबानी प्रसिद्धिविभागात उपसंपादकांची पदे रिक्त असल्याचे व त्यासाठी अर्ज करण्याविषयी सुचवले. …(तसे त्यानी मलाही सांगितले होते—सुचवले होते…)
– दत्तात्रय जिवाजी कुलकर्णी

3) जोगवार मुळातच यवतमाळ चे होते. त्यांच्या वडिलांचे सरस्वती मुद्रण आलय होते.

आद्याक्षर सह सर्व सहकार्याचा उल्लेख केला. हे सर्वच कौतुकास्पद आहे🚩🚩🚩 शुभेच्छा विलास. तुला… 🌹🌹🌹
– श्री सुधाकर धारव

4) प्रिय श्री. कुडके साहेब, तुमचे संपूर्ण आयुष्य अत्यंत खडतर आहे पण तुम्ही तुमच्या सोशीक स्वाभाविक वृत्तीने सोपे केले, तसेच अवघड विषय सोप्या शब्दात तुम्ही लिहिलेले आहे, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
– श्री शिवाजी मानकर साहेब

5) खूप सुंदर आठवणी. लेखन शैलीही उत्तम. असेच लिहित राहावे.
Kudke touching memories. Keep it up
– Bhikku Mahendra Kausal

6) श्री विलासजी कुकडे यांनी फारच छान लेख लिहिला आहे.माझी तशी विस्मरणशक्ती पावरफुल असल्याने अनेक लहानथोर अधिकारी कर्मचारी यांची नावे व त्यांचे काम या लेखामुळे चांगलेच लक्षात आले त्याबद्दल कुकडेजींना धन्यवाद दिले पाहिजेत. मी संचालक असतांना त्यांचे प्रशासकीय मार्गदर्शन घेतांना मला कधीच कमीपणा वाटला नाही. ते कदाचित विसरले असतील.पण माझ्या कायम तेवढे लक्षात आहे. कुकडे छान लिहू शकतात .त्यांच्या प्रशासकीय टिपण्या त्याहून उत्तम.याची पुन्हा प्रचिती आली..धन्यवाद.
श्री देवेंद्रजींनी त्यांच्या लेखाचा समावेश केल्याबद्दल त्यांचेहि आभार.
माझ्या अभिप्रायात श्री विलासजींचे आडनाव जरी कुडके असले तरी मी त्यांना कुकडेच म्हणायचो कारण कुडके नावाचा शब्द मला त्याकाळात फार पसंत नव्हता.असो..
– श्री सुधाकर तोरणे, माजी संचालक

7) खूप छान लिखाण झालंय सर… वाचून बरे वाटले… काम करत असताना तुमची आठवण नेहमी येते… प्रत्येक प्रकरणाला तुम्ही मदतीला यायचे… मार्गदर्शन करायचे…. आता तसे नाही… केबिनमध्ये बसून फक्त ऑर्डर दिले जाते..
– श्री चंद्रकांत धम्मा

8) माहिती खात्यातील आठवणी हया आठवणीत राहण्यासारख्याच आहेत. आपल्याला पुढील लिखाणासाठी खूप खुप शुभेच्छा
*सौ प्रिया रामटेककर*

9) छान आठवणी आजही पूर्वीच्या काळात घेऊन जाता.
श्री गोविंद देशपांडे

10)”माहिती”तील आठवणी-४
फारच छान लेख
🙏🏻👌👌👌👌👌🙏🏻
*श्री विश्वनाथ मोरे*

11) लेख वाचला..
विभागाचा चांगला दस्तावेज !
*श्री हेमराज बागुल, संचालक*

12) कुडके साहेब अप्रतिम लेख. मा व ज मधील तीन साडेतीन दशकां मधील जागवलेल्या आठवणी वाचून मन अलगद भूतकाळात रमले. आपली चिकाटी व अभ्यासु वृत्ती प्रशंवसनिय आहे. आपल्या भविष्यातील कारकिर्दीस हारर्दिक शुभेच्छा !
– श्री किरण ठाकूर

13) आमचा मित्र दीर्घकाळ सेवा करून परिश्रम घेऊन मोठा झाला, त्याचे आधीचे दिवस आम्ही पाहिले आहेत खूप समाधान वाटले वाचून ..मित्रा तुला आभाळभर शुभेच्छा आनंदी रहा, समाधानी रहा अमच्यवरील कृपालोभ असाच राहू दे ..👍👌💐
*श्री पद्माकर देशपांडे, नाशिक*

14) एकदम मस्त काका
– श्री चेतन अशोक कुडके*

15) कुडके साहेबलिखाण खुप छान
जीव लावावा लागतो तेव्हा कुठे असे पाहायला मिळतं. जसं कुडके साहेबांनी मित्र परिवार जमवला.
– श्री विष्णुपुरीकर धोंडोपंत

16) सर खूप छान अनुभव सांगितले आहेत.👍
– श्री ज्ञानेश्वर मडके

17) कुडके साहेब लिखाण खूप छान
– श्री शेलार.

18) संपूर्ण लेख वाचला. खूपच छान आठवणी
-श्री सुरेश कदम डीएड ग्रुप

19) खूप सुंदर
-श्री उत्तम ढोली, डीएड ग्रुप

20) छान आठवणी
– श्री जगदीश बैरागी, डीएड ग्रुप

21) खूप छान माहिती
– श्री राजेंद्र साळवे डीएड ग्रुप

22)👍👍👍
– श्री अरुण पाटील डीएड ग्रुप

23) आपला ‘नोकरी’ तील प्रवास” अतिशय समर्पक यथायोग्य आणि नि:संदिग्ध शब्दांत मांडला आहे.वाचतांना आपल्या नोकरीतील अनुभवांशी ऋणानुबंध असल्याचे सारखे जाणवत होते.
– प्रा. डॉ. गजानन सिताराम शेपाळ

24) अप्रतिम
– श्री सुरेश कळसकर, माजी उपसचिव, सा. प्र. वि. मंत्रालय

25) फारच छान लेख
– श्री सा. ना. पुंड

26) सर नमस्कार, आठवणींचा उजाळा. लेख आवडला. लिहित रहा.
– श्री रघु पाटील

27) आठवणी लेख वाचला. 75 वय झाले. सगळे डोळ्यासमोर उभे राहिले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
– श्री सु. रा. भारती

28) खूपच अप्रतिम लेखन साहेब👍🏻👍🏻👌🏻👌🏻🌹🌷🙏🏻
*श्री भगवान खारके*

29) छान आठवणी आहेत. याचे एक पुस्तक होईल. जरूर लिहा. शुभेच्छा 👍
– श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक

30) अशीच आठवण मी सेवा निवृत्त झाल्यावर मला आठवली सेवा अधिकार प्रशासकीय भाग केलेला मला आजही आठवतोय शेवटी आठवण ती आठवण राहिली
– श्री अशोक दगु कुडके, माजी प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, नगरसूल

31) Sir जुन्या आठवणीचे खूप सुंदर शब्दात वर्णन केले आहे. Hearty congratulations. 💐
– कीर्ति लाला

32) मंतरलेले दिवस !👍🏻
– श्री अविनाश सुखटणकर

33) अप्रतिम लिखाण सर🙏
– श्री विकास कपोले

34) Namskar saheb
Khup Sunder
Abhinandan🌹🌹🌹
– श्री लक्ष्मण पवार

35) 👍👍👍अप्रतिम लेख💐💐
– श्री ततार साहेब, माजी लेखाधिकारी

36) छान👌🏼
– सौ विद्या रावराणे

37) एकदम मस्त.
– श्री अनिल ठाकरे

38) सर नमस्कार🙏
अभिनंदन, खूप छान ! प्रत्येक सहकाऱ्यासाठी चपखल शब्द आणि गोड आठवणीने शासकीय सेवेतील क्लिष्टता किती सोप्पी झाली, आपले विचार आणि लेखाची मांडणी यामुळे आपण ही सेवा किती सकारात्मक अन सहजतेने पूर्ण केली हे प्रकर्षाने जाणवले. मला देखील आपल्या सोबत काम करण्याची संधी मिळाली, ती संधी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवून गेली.. आजही आपली आठवण निघाली की, एक आदर्शवत व्यक्तिमत्वची जाणीव होते, आपणांस मनःपुर्वक शुभेच्छा! 👍👌🙏🌿
– श्री दिलीप केदारे

39) वा खूप छान लिहिले आहे. अजून लिहा
– सौ श्रध्दा बेलसरे, माजी संचालक

40) Sahi .👌👍👍
– वृशाली बर्गे

41) माहिती व जनसंपर्क हा मोठा परिवार आहे, इतर कोणत्याही विभगापेक्ष वेगळा असून सर्व अधिकारी कर्मचारी एक कुटुंब म्हणून काम करतात, विलास कुडके यांनी विभागातील पदार्पणा पासून आपले अनुभव कथन केले आहे. माहिती विभागात काम करताना दररोज नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते त्यातून आलेला अनुभव पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरतो. जिद्द परिश्रम चिकाटी असली की आपले भावविश्व समृद्ध होते, याचा अनुभव श्री कुडके यांनी छान पद्धतीने मांडला. आपण कवी व लेखक आहात यापुढेही अनुभवसंपन्न लिखाण आपणाकडून होईल, अशी अपेक्षा आहे.. खूप खूप शुभेच्छा
– श्री अनिल गडेकर

42) Kudke saheb great
– श्री रवींद्र पाटील

43) वाह, खूपच छान.. जीवनाचा अनुभव किती सोज्वळ पणे लिहलय..आणि त्या आठवणी शब्द नी शब्द क्रमशः जपून त्यला उजाळा दिला… अप्रतिम संघर्षाचे ते जीवन 🙏
म्हणतात जीवन जगणे ही देखील कला आहे, त्या कलेची एक झाकी आज दिसली 🙏
– श्री तुषार फटांगरे, पंचवटी एक्स्प्रेस ग्रुप

44) लेख वाचला. अगदी भरुन आले. त्याकाळातील सर्व चित्र उभे राहिले. तुम्ही नुकताच नोकरीस लागला होता. धुरु साहेब तुम्हाला सायंकाळी निघायला सांगायचे. तुम्ही निघतांना हात करायचे पण कामात आमचे लक्ष नसायचे. म्हसकर साहेब जोशी साहेब पेंडसे साहेब सगळे डोळ्यासमोर उभे राहतात व डोळे भरुन येतात. माझी मुलगी पण जाॅबला आहे पण आजकाल असे वातावरण नाही. ती आपल्याला एकदा साहेब म्हणाली तर आपण साहेब म्हणू नका म्हटले होते ते आठवते. अगदी सलोख्याची तेव्हा वागणूक मिळाली. मला लिहिता येत नाही. पण यासगळ्या भावना आज आहेत. (शब्दांकन)
– सौ श्वेता प्रदीप येसाजी

45) एक वेगळी ऐट आहे या मजकुराला .
आवडला . त्यात उल्लेख झालेली बरीच नावे परिचयाची आहेत.
विलास कुडकेही आठवतात पण, फार संपर्क नाही आला त्यांच्याशी.
– प्रब (प्रवीण बरदापुरकर), जेष्ठ पत्रकार

46) व्यासंगी “विलासराव“ आणि कवीमनाचे ”कुडके“ या दोन्हीचा सुंदर मिलाफ म्हणजे हा लेख ! स्मरणशक्ती मानावी लागेल !
मा. श्री. प्रमोदराव नलावडे, माजी महासंचालक, माहिती व जनसंपर्क

47) साहेब, मुद्देसूद लिखाण आपलं वैशिष्ट्य… त्यामुळे सुरुवातपासूनचे व्यक्तिनुरुप प्रसंग आपण क्रमाने उभे केलेत, आता पूर्वार्ध झाला आहे लवकरच उत्तरार्ध वाचावयास मिळावा.. या शुभेच्छांसह
– श्री राजेंद्र महाडिक

48) छान लिहिलंय, निवृत्त शासकीय अधिकारी, हळव्या मनाचा कवी ते साहित्यात रमणारे आमचे साहेब, तुम्ही लिहित रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा साहेब 👍👍
श्री विलास शिर्के

आदरणीय सर,
जय हिंद.
श्री सुनिल कडूसकर सरांचा लेख वाचला. मला एक गोष्ट विचारावी वाटते कि प्रथम ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद करून घेतला तो फोन मिळाला काय?साधारण 2, 3 महिन्यात चोरीस गेलेले फोन कार्ड बदलून रिऍक्टिवेट होतात.
(दुसऱ्या मुलखात विकून) परंतुआय एम इ आय नंबर वरून त्याचा शोध लागू शकतो.ही झाली एक बाजू.

दुसरे म्हणजे जे वरिष्ठ निरीक्षक भेटले त्यांना सुनिल कडूसकर सरांनी आपली पत्रकार म्हणून ओळख दिल्यावर त्यांचा गुन्हा नोंद केला काय ? कि त्यांनी पत्रकार म्हणून ओळख देण्यापूर्वी त्यांचा गुन्हा नोंद केला ? हे मी यासाठी विचारत आहे कि, पत्रकार लोकांची दखल घेतली जाते तशी सामान्य लोकांची दुर्दैवाने दखल घेतली जात नाही.

आता दुसऱ्या प्रसंगाकडे वळू. महिला पोलिस अधिकारी यांनी वृध्द नागरिकाची तक्रार घेतली नाही, ते अत्यंत चुकीचे घडले.
अर्थात जर त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे कडे गेले तर फरक पडतो .
पोलिस खात्यात अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू पुरूष तसेच महिला अधिकारीही आहेत व ते पोलीस दलाची शान आहेत.
आता आपण गुन्हे न नोंदविणे ह्या प्रकाराबद्दल पाहू. हे खरेच आहे कि मागील वर्षा पेक्षा कमी गुन्हे संख्या नोंद झाली तर पाठ थोपटून घेण्याचे प्रकार घडतात कारण तो कार्यक्षमतचा निकष समजतात. पण मी हेही पाहीले आहे कि त्या त्या झोनचे उपायुक्त परखड असतील ते ‘गुन्हे संख्या वाढू दे पण सर्व गुन्हे नोंद करा ‘असा आग्रह करतात. तेंव्हा पो.ठाण्याचा इनचार्जच जबाबदार असतो. त्याचे हाताखालील अधिकारी देखिल गुन्हा नोंद झाला तर काम वाढते (उदाहरणार्थ तपास व त्या अनुषंगाने येणारी कामे) परंतु गुन्हे नोंदविणे वा ना नोंदविणे याचसाठी पोलिस ठाणे इनचार्ज हेच जबाबदार असतात हे नक्कीच..

आता मापदंड बदलता येतील काय ? याबाबत पाहू. पोलीस दलाला अमर्याद कर्तव्ये असतात. त्यामुळे पोलीसांना सर्व बाजू परिणाम कारक करण्यावर मर्यादा येतात.जस कि (काॅन्टीटी व काॅलीटी ) फारशी एकत्र पहायला मिळत नाही.त्यामुळे बंदोबस्त (लाॅ व ऑर्डर) साठी वेगळा विभाग व गुन्हे नोंद व तपासासाठी वेगळा विभाग असावा असा एक विचार चालू होता. अर्थात आता त्याचे काय झाले याबाबत मला कल्पना नाही.
धन्यवाद.
– सुनिता नाशिककर पोलिस उपअधीक्षक (सेवानिवृत्त) मुंबई.

आठवणीतील महर्षी …
खूप सुरेख लेख👌👌
सर्वच सदरं सुंदर आणि वाचनीय👍👍
– प्रणाली म्हात्रे. मुंबई.

नमस्कार.
सर्व सदरे सुंदर आहेत. महर्षी कर्वे यांचे आशिर्वाद लाभलेले लेखक आपल्या पोर्टलमध्ये आहेत,ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. केरळची कॉफी सचित्र लेख छान होता.
परदेशांतही मराठी कविता जपली जातेय ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रिय सखी अलका ही कविता मनाला खुप भावली .असो.
धन्यवाद 🙏🙏
– कवयित्री आशा दळवी, फलटण, सातारा .

अलकाताईंचे सार्थ वर्णन मुक्त छंदातील कवितेत त्यांची सखी सुरेखा रासने यांनी केले आहे. अतिशय सहनशील, धैर्यवान, खंबीर तरी तितक्याच प्रेमळ अलकाताई मृदू स्वभावाच्या आहेत, हे मला दोन भेटीतच जाणवले. त्या एक आदर्श गृहिणी तर आहेतच, पण त्याहीपेक्षा त्या एक आदर्श सहचारिणी आहेत. न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टल चे संपादक देवेंद्रजी आहेत, संपादक म्हणून त्यांच्या यशात अलका ताईंचा सिंहाचा वाटा आहे. Behind every successful man there is a woman. ही म्हण या उभयतांच्या बाबतीत तंतोतंत जुळते. जिवेत शरद: शतम् ! अलकाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
– आशा कुलकर्णी, विलेपार्ले, मुंबई. 😊💐

नमस्कार.
भुजबळ दांपत्याची मुलाखत पाहिली. त्यांच्या यशाचा उंचावत जाणारा चढता आलेख पाहून, जीवनात आलेल्या संकटांवर सकारात्मकतेने मात करून यशस्वी झालेलं दांपत्य म्हणून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला. न्यूज स्टोरी टुडे सारख्या वेब पोर्टल वर मला लेखन करायला मिळतंय याचा जास्त आनंद होतो आहे.👌
– विकास भावे. कवी, लेखक. ठाणे

Meghna Sane
Salute 👍👍👍👍
– Dr Sangita Kamat. Mumbai.

शब्दसुरांचा जादूगार…..
पाहिलाच पाहिजे !
– कवयत्री पद्मजा नेसरीकर. पुणे

मुलाखतीतुन भुजबळ दाम्पत्याची अप्रतीम माहिती मिळाली. काळानुसार नवनवीन प्रचलित माध्यमं वापरून त्यांनी समाज प्रबोधनाचे सातत्य राखले आहे. माझ्या मते ते महाराष्ट्रातील मान्यवर आहेत. मी, त्यांच्या पुढील उत्तोमोत्तम कारकीर्द आणि आरोग्याची कामना करतो.
आईवडिलांना नव्या दिशेबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या कन्येचंही कौतुक वाटते. तिलाही अनेक शुभेच्छा.🙏
– श्रीकांत चव्हाण. आर्किटेक्ट. मुंबई

स्वप्नगंधा आंबेतकर यांची उन्हाळ्याचा अनुभव देणारी कविता. आशयघन, सकारात्मक आहे. आवडली.
– प्रा अजित मगदूम. नवी मुंबई.

मा.विलास कुडके साहेबांनी अगदी नोकरीवर रुजु होण्यापासून ते आँफीसमधील निरनिराळ्या व्यक्ती ची सजीव वर्णने खुप मनापासून उभी केली आहेत. त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव चरित्राच अगदी गुणवैशिष्ट्ये लकबी ही सुक्ष्म अश्या निरीक्षणातुन प्रांजळपणे मांडली आहेत.सर तुम्ही छान आत्मचरित्र लिहुन काढा.
– उद्धवराव काळे.

मनापासून आभार, अर्पणा मॅडम. वृत शाखेत असताना डिक्टेशन पध्दतीने आपल्या सहकार्याने कितीतरी प्रकरणे हातावेगळी करु शकलो हे माझ्या कायम स्मरणात राहील.
– विलास कुडके.

“माहिती” तील आठवणी ( ४ )
खूप सुंदर. संपूर्ण आॕफीस डोळ्यांसमोर उभे राहिले. वाचताना आठवणी जाग्या झाल्या. मस्तच सर
– अर्पणा महाडीक.

“माहिती” तील आठवणी ( ४ )
काका, अप्रतिम लेखन. डोळ्यासमोर चित्र उभ करता तुमच्या लेखातुन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
– युगांत कुडके.

“माहिती” तील आठवणी ( ४ )
आदरणीय श्री भुजबळ साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. त्यांनीच लिहिते केले आहे. वाचकांना विनंती आहे की प्रांजळ अभिप्राय मिळावेत. आपले अभिप्राय पुढील लिखाणासाठी निश्चितच बळ व प्रेरणा देणारे ठरतील. काही सूचना असतील तर त्याही कृपया या. वाट पहात आहे
– विलास कुडके.

“माहिती” तील आठवणी ( ४ )
कुकडे सरांसारखे अनुभवी अधिकारी जेव्हा आपली अनुभवाची शिदोरी सादर करतात तेव्हा ती नवीन कर्मचारी/अधिकारी यांना मार्गदर्शक ठरते. अनुभवाची ही देवाणघेवाण नवीन कर्मचाऱ्यांना घडवण्यासाठी मार्गदर्शक असते.
– अभय बापट.

आज पुस्तक दिन..
दिलिप गडकरींचा जागतिक पुस्तक दिनाचा लेख आवडला. दुर्मिळ माहिती दिली भुजबळ साहेबांनी उपलब्ध करुन दिली धन्यवाद. शुभेच्छा.

काश्मिर : ट्युलीप गार्डन
ट्यूलीप गार्डन छान, दुर्मिळ माहिती दिली. मोहक फुलांची छायाचित्रे. अजुन एकदोन फुलांचे क्लोज अप टाकल्यास छान दिसेल. खुप छान
– सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी.

🌹शाश्रीय संगीतातील थाट 🌹
अप्रतिम लेख.
काही गोष्टी खरंच मला समजल्या नाही. असो.
धन्यवाद.

श्री. दिलीप गडकरी यांचा माहितीपूर्ण लेख खूप आवडला. मुद्देसूद वर्णन केल आहे. महत्वाचा मुद्दा येथे छान मांडला आहे, तो म्हणजे ई बुक बाबत. खरंच मराठी भाषा या बाबत मागे राहिली आहे. अभिजात दर्जा बद्दल आपण फक्त एक दिवस बोलतो. भाषा दिन किंवा एखादं साहित्य संमेलन, बस. पाठपुरावा होताना दिसत नाहीहे. असो अप्रतिम लेख 🌹
– अशोक साबळे.

🔥तप्त उन्हाळा 🌞
आपली ही कविता खूप छान, आशयघन आहे
शेवटही सकारात्मक.
आवडली.
– अजित मगदूम.

आज पुस्तक दिन
🙏ई बुक बाबतीतील मराठी पुस्तकांनी मागे राहून चालणार नाही. वाचकांनी एक आघाडी उभारून शासनाला ह्या निकडीची जाणीव करून देऊन होई पर्यंत पाठपुराव्यासाठी समजमध्यमांचा वापर करून एकत्रित येणे जरुरी आहेच. चला लागा कामाला
🙋‍♂️… श्रीकांत चव्हाण.

“माहिती” तील आठवणी ( ४ )
सुंदर आठवणी कुडकेसाहेब
– कुसुमानंद

सुंदर लिखाण आणि सुंदर आठवणी, तसेच सुंदर संपादन, साहेब आपले कामकाज मी जवळुन पाहिले आहे, अतिशय उत्कृष्ट..
– आत्माराम लब्दे.

Khupach chaan
– राजेश भोईर.

आज पुस्तक दिन
दिलीप गडकरी यांचा सुरेख लेख..
शेले ने म्हटलं आहे,
books are the companions of man
they are our real friends
they are never seen with their new faces
they enlight our thoughts
they elevate our ideas
and enlighte our thoughts to the gates of heaven.
– राधिका भांडारकर.

चतुरस्त्र मेघना साने…
आज लेख वाचून मेघनाताई आपल्या सर्वगुण संपन्न वाक्तिमत्वाची ओळख झाली ,आपल्या यशाची कमान अशीच उंचावत राहो ही सदिच्छा.

हेमा राचमाळे : हे विश्वची माझे घर !
हेमाताई, विद्याताई दोघींच्या कार्याला सलाम आणि त्यांच्या कार्याची ओळख करुन दिल्याबद्दल मेघनाताई तुमचे आभार
– प्रज्ञा हुल्याळकर.

मनात घर केलेलं घर !
हृदयस्पर्शी लेख, खूप आवडला.
सुहास.

“ओठावरलं गाणं”
खूप यथार्थ रसग्रहण, खूप आवडले
– राधिका परांजपे.

सुख म्हणजे नक्की काय ?
सुखाचे सोप्या भाषेत केलेले वर्णन भावले. सुख मानण्यात आहे. थोडेसे दु:ख झटकून मी सुखी आहे अशी सकारात्मक भावना किती सोप्या शब्दांत सांगितली.

दिलीप गडकरी यांचा लेख जसा माहितीपूर्ण आहे तसाच वाचनीय आहे. पुस्तक दिनानिमित्त प्रकाशन क्षेत्रातील बदलांचा नेटका आढावा घेतला आहे.

मनात केलेले घर- उत्तम

भारतीय संगीतातील थाटाचे उत्तम स्पष्टीकरण

भारतातील टी.व्ही. चा ऐतिहासिक प्रवास चांगल्याच शब्दांत सांगितलाय.

मन माझे….
मानवी भावना व निसर्गातील प्रतिमांची योग्य सांगड.
– डाॅ.सतीश शिरसाठ.

‘आणि, मी पोलिस अधिकारी झाले !’
सुनिता नाशिककर यांचा ३४ वर्षाचा पोलीस खात्यातला लेखाजोखा वाचताना मनोरंजन तर झालेच पण खूप माहितीही मिळाली.
धन्यवाद सुनिताताई.!
धन्यवाद देवेंद्रजी !!
– राधिका भांडारकर.

मन माझे….
🌹अप्रतिम शब्द रचना, सागर, नदी, किनारा सर्व छान जुळून आले.
🌹माहेरची आठवण खूप सुंदर 🌹
धन्यवाद. सौं शोभा

“साहित्यव्रती” प्रा. सिंधुताई मांडवकर
🌹अभिनंदन 🌹
काय बोलणार मी फार छोटा पडतो मनोगत व्यक्त करायला. धन्यवाद.
– अशोक साबळे.

“ओठावरलं गाणं”
आपण अनेक जुन्या आठवणी जागवल्यात विकास भावे सर !
– प्रतिभा सराफ.

थकले रे डोळे माझे हे गाणं वाट पाहण्यातील आर्तता दर्शविते. त्याचे रसग्रहण यथार्थ केले असून उचकी लागली तर आठवण काढली हेही किती छान वर्णन केले आहे.
– निलाक्षी पिसोळकर.

हे गाणं विस्मरणा गेले होते. तुमच्या भावपूर्ण रसग्रहणाने पुन्हा गुणगुणायला लागले. छान रसग्रहण.
– आशा लिंगायत.

सर खूप छान लिहिले आहे
पंकज.

हेच खरे जगज्जेते उत्तम.

फक्त तुझ्यासाठी..
सौ.भाबल यांनी कवितेतून अलकाताई यांना दिलेल्या शुभेच्छा भावनांना दिलेली चांगली अभिव्यक्ति आणि उत्तम रचनेची साक्ष आहे.

सिंधुताईंच्या कार्याचा नेटका आढावा.

मन माझे….
मानवी भावना व निसर्गातील प्रतिमांची योग्य सांगड.
– डाॅ.सतीश शिरसाठ.

“सार्थक” प्रकाशित
🌹श्री. भुजबळ साहेब आपण एक प्रेरणास्थान आहात. 🌹
Dr. अमोल यांचे कष्टाचे फळ त्यांना मिळाले.
आपल्यासारखं मार्गदर्शन असेल तर लोखंडाचा परीस होणार हे निश्चित.
🌹धन्यवाद साहेब 🌹

फक्त तुझ्यासाठी..
🌹खूप सहजतेने आपण ताईंबद्दल वर्णन केले.
जे आपण लिहिले त्यासाठी ताईंनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना येते 🌹
धन्यवाद,
सौं. वर्षा भाबल
– अशोक साबळे. Ex. Indian Navy

पुस्तक परीक्षण : हेच खरे जगज्जेते
व्वा… खूप सुंदर आढावा घेतलाय.
मनापासून धन्यवाद!
– विनोद पंचभाई.

प्रिय सखी अलका..
Alka तुझ्यासाठी समर्पक असेच हे लिखाण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– वृंदा पाटील.

प्रिय सखी अलका
कवयित्री सुरेखा ताईंनी दिला खूप छान
काव्यमय पुष्पगुच्छ सौ.अलकाताईंना
अलकाताईंचं कर्तृत्व वाचून आनंद ह्रुदयी मावेना.
अभिनंदनासह वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो प्रेमपूर्वक सौ.अलकाताईंना..

न्यूज स्टोरी टुडे मार्फत करतायत
अलका ताई छान सेवा माय मराठीची
सेवानिवृत्त होऊनही उभारली गुढी
देवेंद्रजींच्या जोडीने राष्ट्रीय कार्याची

दुर्धर आजारावर मात करत
दिलं तोंड संकटांवर हिमतीने
शेकडो वाचकांना दिली सकारात्मक ऊर्जा
सुंदर पुस्तकातून अलका ताईंच्या लेखणीने

उत्तम आरोग्यासह‌ लाभो अलका ताईंना
आनंदाचं सुखाचं दीर्घायुष्य
प्रभूकृपेने उज्वल होवो त्यांच्यासह
सर्व कुटुंबियांचं भविष्य
Happy Birthday sau.Alka Tai
– राजेंद्र वाणी. दहिसर मुंबई 🙏🌹

आठवणीतील महर्षी
महर्षी कर्वे ह्यांच्या बद्दल आशाताईंचा लेख छान आहे. प्रसार माध्यमांनी त्यांना दुर्लक्षीत केल्याची खंत आशाताईंसारखी मलाही वाटते.
– मीरा पेंडसे.

प्रिय सखी अलका
🌹सौ. अलकाताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
– अशोक बी साबळे.

प्रिय सखी अलका
खूप सुंदर शब्दरचना… कधी पाहिले नाही अलकाताईना. पण डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. खूप खूप शुभेच्छा अलकाताई. तुमच्या पुढील दीर्घायुरारोग्यासाठी…
– अलका प्रताप माने.

“माहिती” तील आठवणी ( ३ )
भुजबळ सरांच्या आठवणी नेहमीप्रमाणे अनेक मुद्यांचा परामर्श घेणा-या.

आठवणीतील महर्षी
स्त्री शिक्षणात महान कार्य केलेल्या म.कर्वे यांच्या आठवणी हेलावून टाकणा-या आहेत.

परदेशस्थ मराठी कवी संमेलन
भारताबाहेरही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन किती आटोपशीर झाले .
– डाॅ.सतीश शिरसाठ.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रतिसाद, प्रतिक्रिया व अभिप्राय हे लेखकाला हवेच असतात. त्याच्या लेखनाची प्रेरणा व बळ म्हणजे ही भरभरुन मिळणारी दाद. आपल्या सर्वांच्या अभिप्रायाबद्दल व आदरणीय श्री भुजबळ साहेब यांचे मनापासून आभार… असाच लोभ व स्नेह असू द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा