Sunday, February 15, 2026
Homeसाहित्यजिजाऊ : काही कविता

जिजाऊ : काही कविता

राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना केलेले हे वंदन…..

१. थोर जिजाऊ

आदिमाया आदिशक्तीचे रूप घेऊन प्रकटली
ती थोर जिजाऊ
जिच्या संस्कारातूनच स्वराज्याची तोरणे लागली सजू

मराठी मातीत घडले एक दिव्य
थोर जिजाऊच्या पोटी जन्मले एक रत्न.

कुंभार जसा आकारतो निराकार चिखलाला
तसा दिला आकार बाल शिवबाच्या कर्तृत्वाला

रुजविले तिने त्याच्या अंगी सर्वधर्मसमभाव
त्यानेच बांधिले स्वराज्यावर तोरण

संस्काराचा अमूल्य ठेवा नसानसात भिनविला
थोर जिजाऊच्या पोटी शिवबाच्या रूपात रामकृष्ण जन्मला

अशी ही आदिमाया आदिशक्ती जिजाऊ एक द्योतक
तिच्यापुढे सारी स्त्री जाती होते नतमस्तक

अनिता व्यवहारे

– रचना : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर

२. स्वराज्याची जनक

आई म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई
वडील लखुजीराजे जाधव
पती शहाजीराजे भोसले
जिजाऊ मातेने घराला घरपण दिले

जिजाऊ मातेचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात
जन्म स्थान भुईकोट किल्ला राजवाड्यात
१२ जानेवारी १५९८ रोजी,
सिंदखेड राजा नगरीत जिजाऊ मातेचे बालपण गेले

इ स १६०५ मध्ये जिजाऊ मातेचा विवाह
शहाजीराजे सोबत दौलताबाद येथे संपन्न
उदयपूरचे भोसले व देवगिरीचे जाधव घराणे
झाले एकत्र
जिजाऊ मातेचे बालविवाह झाले

जिजाऊ मातेला एकूण ८ मुलं,
त्यात ६ मुली २ मुलं, पण मुली मात्र दगावल्या
मनाने खंबीर नेतृत्व उत्तम करी
जिजाऊ माता कार्यभार सांभाळी

मोठा मुलगा शहाजीराजें कडे
छोटा मुलगा जिजाऊ माते कडे
त्यास चांगले संस्कार ने घडविले
जिजाऊ मातेने राजपुत्र गुण दिले

जिजाऊ मातेने घडविले आदर्श राजा शिवबाला
न्याय- युद्ध कौशल्य घडविले शिवबाला
स्वतः कणखर खंबीर नेतृत्व असे माता
जिजाऊ मातेला त्रिवार मानाचा मुजरा

अशी जिजाऊ माता घडावी घरा घरात
जो शिवबा घडेल घरा घरात

विलास देवळेकर

– रचना : विलास देवळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11