Wednesday, June 18, 2025
Homeलेखयोगा करा, फिट रहा !

योगा करा, फिट रहा !

माझ्या सर्व बंधू,भगिनींना आंतर्राष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

“योगेन चित्तस्य पदेन वाचां।
मलं शरीरस्य च वैद्यकेन।।
योsपाकरोत्तम् प्रवरं मुनीनाम्।
पतंजलिं प्रांजलिरानतोsस्मि”
अर्थात—
ज्या पतंजलीने योगाने मनाचा, व्याकरणाने भाषेचा आणि वैद्यकाने शरीराचा मळ दूर केला त्याला माझा नमस्कार असो.
अशा प्रकारे योगाचा उगम फार प्राचीन आहे आणि मुख्य म्हणजे तो भारतीय आहे.

आज काळ खूपच बदलला आहे. ह्या कम्प्युटर आणि नेटवर्किंगच्या युगांत संपूर्ण जग जवळ आले आहे आणि आउटसोर्सिंगमुळे तर कामाचे वेळापत्रकच राहिले नाही. परिणामी जिकडे तिकडे तणावपूर्ण वातावरण. रोजच्या रोज काहीतरी नवीन ज्ञान संपादन करावे लागते. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत विलक्षण स्पर्धा आणि या स्पर्धेत टिकून रहाण्याची प्रत्येकाची धडपड….. लहान मुलांनाही आजकाल या स्पर्धेपासून दूर रहाण्याची परवानगी नाही. पालकांच्या पाल्यांविषयींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत. त्यांचे बालपणच हरवले आहे.

दुसर्‍या बाजूला दूषित पर्यावरण. अशा प्रतिकूल
परिस्थितीत आपले शारिरीक व मानसिक स्वास्थ्य समतोल रहावे कसे ? याला एकच पर्याय योग, नियमित व्यायाम !

योगामध्ये मुख्यतः आसने करावयाची असतात. आसन या शब्दाचा अर्थ शरीर ताठ ठेवून ध्यानस्थ बसणे. शरीराच्या विशिष्ठ पोश्चरवरून आसनांना नावे दिली गेली आहेत.

योगा शिकतांना
१) ताडासन
२) भुजंगासन
३) उष्ट्रासन
४) गोमुखासन
५) शवासन
ही पांच आसने महत्वाची समजली जातात. ही आसने केल्याने पचन शक्ति सुधारते, पाठ, कंबर, मणके, मान दुखणे ह्या व्याधी दूर होतात. फुफ्फूसाचे रोग नाहीसे होतात. तसेच लहानपणापासून योगा केला तर उंची वाढण्यास मदत होते. ह्या व्यतिरिक्त चतुरासन, मार्जरासन, ऊर्ध्वमुख श्वासासन वगैरे बरीच आसने आहेत.

ताडासन~
ह्यात शरीर ताडासारखे ताठ ठेवायचे. या आसनामुळे पायात मजबूती येते, पाठ, पोट यांच्या तक्रारी मिटतात.

भुजंगासन~
भुजंग म्हणजे साप, नाग जसा फणा उभारून बसतो त्याप्रमाणे मान ताठ ठेवून बसणे. यामुळे पचनक्रिया सुधारते. पोटावरची चर्बी कमी होते. दम्याचा त्रास थांबतो.

उष्ट्रासन~
उष्ट्र म्हणजे ऊंट. हे आसन करताना मान उंटासारखी ऊंच करायची. पोटाचे विकार व गुढघेदुखीवर हे आसन उत्तम उपाय आहे.

गोमुखासन~
या आसनाने छाती, फुफ्फूसे मजबूत होतात. श्वसनाच्या रोगांपासून मुक्ती मिळते.

शवासन~
संपूर्ण शरीर शिथील ठेवणे. मनावरील ताण तणाव नाहीसा करण्यासाठी हे उत्तम आसन.

आसनांबरोबरच सूर्यनमस्कार हा अत्यंत महत्वाचा व्यायाम आहे. अष्टांगयोग ज्याला म्हणतात तो या सूर्यनमस्काराने साधला जातो.

प्राणायामाखेरीज व्यायाम पूर्ण होऊ शकत नाही. रोज सकाळी आपल्या व्यस्त जीवनांतही प्राणायाम करणे फार आवश्यक आहे. यांत मुख्य म्हणजे श्वसनावर नियंत्रण करावयास आपण शिकतो व त्यामुळे मुख्यतः ह्रुद्रोगापासून आपण दूर रहातो. कपालभारती, भस्रिका, अनुलोम—विलोम, भ्रामरी आणि झोपून दीर्घ श्वासोश्च्वास हे प्राणायामाचे पांच मुख्य प्रकार आहेत.

कपालभारती~
पोट आत घेऊन श्वास सोडणे. स्त्रियांसाठी गर्भाशयाच्या विकारावर रामबाण उपाय तसेच अँन्टी ॲलर्जिक औषध असे रामदेव बाबा सांगतात.

भस्रिका~
ह्यात श्वासनलिकेतून श्वसन व उच्श्वसन करणे.

अनुलोम/विलोम~
डाव्या नाकपूडीने प्रथम दीर्घश्वास घेऊन उजव्याने श्वास सोडणे तसेच उजव्याने घेऊन डाव्याने सोडणे.

भ्रामरी ~
श्वास घेताना मकारात्मक भुंग्यासारखा आवाज करणे.
पाय पोटाजवळ घेऊन झोपून श्वसनक्रिया करणे.

उत्तम आरोग्यासाठी योग अशी खात्री पटल्यामुळे अलिकडे योगा शिकणे फारसे कठीण नाही. गृह संकूलात कोणीतरी योग शिक्षक असतोच. ठिकठिकाणी जिम्नॅशियमही असतातच.
घरच्याघरीसुद्धा हल्ली यू ट्यूबवर सगळे काही शिकावयास मिळते.

चला, तर मग आजच्या योग दिनी आपण नियमित व्यायाम करून उत्तम आरोग्य राखण्याची प्रतिज्ञा करूया.

अरुणा मुल्हेरकर

– लेखन : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. 🌹खूप छान माहिती. मिळाली या लेखातून. सर्व आसन योग्य पद्धतीने सांगितली आहेत 🌹
    🌹धन्यवाद अरुणाजी मॅडम 🌹
    अशोक साबळे
    अंबरनाथ, ठाणे

  2. खूप खूप मनापासून योग जुळून आला

  3. खूप छान माहिती दिली योगायोग

  4. करा योग रहा फिट..अरुणा मुल्हेरकर यांचा योगा आणि योगासनाची माहिती देणारा परिपूर्ण सुरेख लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?