Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यअभंग : विठू माऊली...

अभंग : विठू माऊली…

पंढरीरायाने । निर्मिली पंढरी
वैकुंठ नगरी । भूमीवरी ।।

पंढरीत राहे । विठोबा माऊली ।
कृपेची सावली । आम्हासाठी ।।

सुंदर साजिरा । विठू पंढरीचा।
कर कटेवरी। ठेवोनिया।।

युगे उभी आहे । सावळ्याची मूर्ती।
जगण्यास स्फूर्ती । देतो आम्हा ।।

तुळशीचे हार । कासे पितांबर।
रूप मनोहर। माऊलीचे।।

विठू माऊली ती । भक्तांची कैवारी।
पंढरीची वारी। पुण्य देई।।

संत मेळा मोठा । सर्वाना पावशी।
हाकेल धावशी। विठुराया।।

दळीतो कांडीतो । धाव घेतो हरी ।
कधी पाणी भरी । भक्तांसाठी।।

विठू दर्शनाची । आस लागे मनी ।
रुप मनी ध्यानी । साठविते।।

आषाढी, कार्तिकी । एकादशी करु ।
उपवास धरु । पुण्यदायी ।।

पंढरीची वारी । करु एकवार ।
भक्तीस सादर । माऊलीच्या ।।

– रचना : मानसी जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. 🌹खूप छान लिहिले आपण. विठू माऊली हे आपले श्रदस्थान 🌹 वारकरी हा आपला प्रत्येक माऊली 🌹

    🌹धन्यवाद मानसी जोशी मॅडम 🌹

  2. असं वाटतं कि या वारीत आपणही त्यांच्या सोबत मिसळावं मनसोक्त आनंद घ्यावा व सर्व ताण तणाव दूर सारून यथेच्छ नाचावं व विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग व्हावं जय श्री विठ्ठल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments