Monday, February 16, 2026
Homeसाहित्यनिसर्ग माझा सखा

निसर्ग माझा सखा

वसुंधरा माय माझी
ढग आहे पिता
लतावेली भगिनी
व्रुक्ष मानून भ्राता

निसर्ग राजा मोठा
मानून त्यास सखा
पर्यावरण वाचवू
एकच धडा घोका

देणे तो अमौलिक
आपणास देतच असतो
विनास्वार्थ काहीच नको
शिकवण कर्तव्य पूर्ण देतो

नदीनाले निसर्ग डोंगर
भरभरून सम्रुद्धी जपतो
मानव मात्र टिकवण्यासाठी
किती धडपडत दिसतो

जाण मनुजा जाग आता
निसर्गाच्या सानिध्यात
राहू कायम सदा सर्वदा
वसुंधरेचा -हास थांबवण्यात

– रचना : कविता बिरारी. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11