Sunday, March 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
मागील महिना चांगलाच धामधुमीचा होता. त्यामुळे कसा गेला कळलेच नाही. असो….
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक.

चला खेळूया 👌👌
मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले👍👍
– महेश खुटाळे. राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक

मी क्रेटर लेक लेख वाचला. अप्रतिम. दुसरा शब्दच नाही. श्री फुलसुंदर साहेबांचे निवेदन असलेला व्हिडिओ पाहून मी तो लेक स्वतःच पाहात आहे असेच वाटले. तो नजारा पाहून डोळे तृप्त झाले. धन्यवाद भुजबळसाहेब.
– डॉ भास्कर धाटावकर
निवृत्त पुराभिलेख संचालक. मुंबई.

खूपच सुंदर वर्णन शिल्पा.
केवळ निसर्गाच्या रूप रंगांचे हे वर्णन नाही तर मानवी मन , त्याचे निसर्गाशी नाते आणि तुझ्या आनंदमयी लेखणीतून उलगडणारे उत्साहवर्धक चैतन्यमय विचार यांचा सुंदर संगम झालेला हा लेख अप्रतिम आहे.
– डॅा. सोनाली कुलकर्णी, चिंचवड

Amazing टिपलाय fall !!
We Californians are always mesmerized by these fall colors and the summary of this article portrays the beauty of colors so well !! Thanks for sharing Shilpa !
– Supriya Sarawate. California.

आदिवासी बांधवातील दिवाळी.. छान झाली. त्यांचा आनंद हाच आपला आनंद….. अनेक शुभेच्छा💐
– सुधाकर धारव. यवतमाळ

Nice initiative for bringing smile on the faces of Tribals on the auspicious occasion of Diwali !
Best wishes for the good work of shri Chatrapati Shivaji Maharaj Organization keeping social obligation !
Regards !
– D L Thorat.
Retd. Joint Secretary. Govt of Maharashtra.

‘कुटुंब रंगलंय….’ मधे सुधीरचा फोटो पाहून बरं वाटलं, आणि माझा फोटो पाहून आश्चर्य, गंमतच वाटली.
– डॉ किरण चित्रे. ह.मु.अमेरिका

आमची लतावेल
मुंबईतील पार्ले या उपनगरात जे साहित्य आणि संगीत इतकेच नव्हे तर कलाप्रेमी रसिकांची क्षेत्र पंढरी म्हणून ओळखले जाते अशा पुनीत नगरीत तुझ्या पुस्तकांचा दशकपूर्ती दिपावली अंकांचा प्रकाशन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला याला दुग्ध शर्करा योग् म्हणायचे नाही तर काय ?
कोणतेही पुस्तक हातात घेऊन वाचण्यात जो अवर्णनीय आनन्द प्राप्त होतो तो कोठेच मिळत नाही. शिवाय पुस्तक संग्रही राहते ते वेगळेच, हे श्री प्रा अशोक बागवे यांनी मांडलेले मत सर्वानाच पटण्यासारखे आहे.
पुरुषांची मक्तेदारी समजल्या जणाऱ्या प्रकाशन क्षेत्रात सुध्दा आजच्या महिला मुसंडी मारून शिरल्या आहेत याची नोंद त्यांनी घ्यावी असे सांगणाऱ्या श्री देवेंद्रजी भुजबळ यांचेही मन:पूर्वक कौतुक. त्यांनी लता गुठे यांचे यजमान श्री वाल्मिक हे पत्नीच्या पाठीशी खम्बीरपणे उभे राहतात यासाठी शाबासकीची दिलेली थाप यथार्थच आहे.
सौ अलकताई भुजबळ यांनी लता ताईंचा भावपूर्ण सत्कार केला त्यासाठी त्याना त्रिवार वंदन.
लताताई N S T परिवारातील एक सदस्य या नात्याने
माझी ही शब्दबद्ध भाऊबीज व ओवाळणी अर्पितो आहे
– प्रकाश पळशीकर. बावधन, पुणे

सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया
वेड्या बहिणीची
वेडी ही माया…
हे गोड, भावभावनेचे गाणे.. काळजात रुतलेले गाणे..
विकास भावे यांनी सुंदर रसग्रहण करुन पुन्हा एकदा त्या चित्रपट काळात नेले…
हे गाणं ओठावरचं नव्हे..ह्रदयातले सूर हे..
धन्यवाद विकासजी.

आषाढी कार्तिकी भक्त जन येती हा सुश्री. अरुणा मुल्हेरकर यांचा लेख अतिशय वाचनीय आहे. मनापासून भक्तीभावाने लिहिलेला लेख ! त्यांच्या प्रगाढ संत वाङ्मयाच्या अभ्यासाचा अनुभव येतो.
कालचक्र ही त्यांची कविताही उल्लेखनीय आहे.
डाॅ. विजया राऊत यांचा महानुभवांचे योगदान, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
– राधिका भांडारकर. अटलांटा/पुणे

विसूभाऊ बापट किती भाग्यवान !
शा़ंताबाई शेळकेंचा आशीर्वाद 👌🌹
प्रा विजया राऊत यांचे प्रसाद वर्णन खूप कौतुकास्पद आहे 👌 पल्लवीताई उमरे, हार्दिक अभिनंदन. ताई,
पुढील वाटचालीसाठी अमाप शुभेच्छा 💐
– सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.

शांताताई शेळके यांची स्वहस्ताक्षरातील कविता आवडली. प्रा.विसुभाऊ बापट यांना धन्यवाद…
सुधाकर तोरणे.

“असे घडले लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे”….
आपण सर्वसामान्यमधील असामान्य व्यक्तींची माहिती जनतेला पुरविण्यात नेहमी अग्रेसर असता.
धन्यवाद💐
– विलास प्रधान. मुंबई.

राग सुरभी सुंदर सदर आहे. प्रियाताई मोडक यांनी सविस्तर माहिती दिल्यामुळे शास्त्रीय संगीतातील रागदारी चा परिचय होतोय.
मनःपुर्वक धन्यवाद.
– चंद्रशेखर द. धर्माधिकारी, पुणे

देहदान बद्दलची माहिती उत्तम. मी आधीच हे सर्व केले आहे याचा आनंद झाला.
ऋचाजींचे अभिनंदन. त्यांची बाग आवडली.
“दीपयोग” मधली कार्यशाळा, मुलांचा सहभाग बघून छान वाटले.
हॅलोविन ची माहिती वाचताना मागे 31 ऑक्टोबरला मी सॅन् फ्रान्सिस्को ला होते ते आठवले. मजा वाटली.
आदर.. कविता खूप छान
भ्रष्टाचारामुळे त्रस्त असलेली जनता या अशा घोषणा, वचने यामुळे कितपत सुखी होतील जरा साशंकच आहे. इतके आपण या गर्तेत बुडालो आहोत. तरीही नैराश्य सोडून प्रयत्न करणे कर्तव्य आहेच .स्तुत्य
माथेरान आवडले, ओठावरलं गाणं ..
चांगले रसग्रहण केले आहे.
काटे कविता सुंदर.
पल्लवी चे यश बघून आनंद झाला. तिचे खूप अभिनंदन
साकव्य संमेलन कौतुकास्पद.
शब्दावाचून कळले सारे …योग्य शब्दात शब्दांचे महत्व सांगितले आहे शेवटला परिच्छेद खूप प्रभावीपणे मांडला आहे.
“चष्मा” आवडला.
लेख खरोखरच नावाप्रमाणे हलका फुलका मजेशीर वाटला. छान.
कालचक्र चे फोटो, अमेरिकेतील फॉल सिझन, त्याचे सुंदर शब्दात वर्णन स्तुत्य.
– स्वाती वर्तक. मुंबई.

Though apparently the “chashma” is a dry subject, if u dig into it y will find it immensely interesting. Author Vilasji with his typical style opened it up n unveiled the beauty in this otherwise boring subject.
In general we wear glasses to empower the flawed vision. However there are people who have normal vision, still they wear glasses in different shades n glasses as a fashion. In this they look rather visionery than have a flawed vision. Thus here chashma enhances their personality n gives u new identity. In this article author has given nice examples of typical glasses of popular icons like Gandhiji n PUL. Our munimji is known from his thin glasses always parked on the nose bridge below his eyes. Thus chasma gives specific identity to varied people.In the beginning wearer of specs feel it burdensome though after a long time he developes intimacy with this amazing eye gear that also protect ur eyes from sun, heat n dust. Author’s father, who weared his round brown specs with its one arm broken through out his life attaching thread. Thus the same burdensome chashma had become indispensable for him. I appreciate the author for giving typical examples n nice exposure made his Navin chashma unforgettable. Also our editor Bhujbal sahebs efforts are laudable who tirelessly gives us always something news on the portal.
– Shri Ranjitsinh Chandel, Yavatmal

दैनंदिन जीवनातील कामकाजाकडे निर्मळपणे पाहण्याची दृष्टी देणारा लेख. छान.अभिनंदन !
(‘शोर’ मधील उल्लेख राजेश खन्ना की मनोज कुमार ? कृपया तपासावे.)
– श्री प्रल्हाद जाधव, माजी संचालक (माहिती), मंत्रालय, मुंबई
टीप : शोर मधील कलाकार राजेश खन्ना नसून मनोजकुमार आहे, उपरोक्त नोंदविलेले निरीक्षण बरोबर आहे. लेखक श्री विलास कुडके यांनी तशी दुरुस्ती कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदविली आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल जाधव साहेबांचे मन:पूर्वक आभार.
– संपादक

अतिशय सुंदर शब्दांकन. अभिनंदन !
– श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती), नागपूर
👌 chan lekh aahe kaka 💐💐
– प्रा. युगांत अशोक कुडके, पुणे

“नवीन चष्मा” हा विलास कुडके यांचा मनोरंजक लेख आवडला. मी जेव्हा मुलगी पाहण्यासाठी गेलो, तेव्हा तिच्या मैत्रीणींनी, कंदील, म्हणून मला चिडवले ! तेव्हा चष्म्याला ऐनक ही म्हणतात हे ही कळले. तसेच “मामाजीकी ऐनक” नावाचा एक विनोदी धडा आम्हाला होता. त्यांत मामाजी नेहमीप्रमाणे चष्मा कपाळावर ठेवतात व घरभर सर्वांना विचारत फिरतात. शेवटी सुनबाई त्यांची ऐनक कपाळावरील डोळ्यावर आणून देते, असे होते.
चष्म्याला चाळिशी पण म्हणतात. अशा अनेक गमती आहेत.

रंगभूमी सद्य स्थिती…
पुर्वी कथानक आणि अभिनय यावर विशेष भर होता, आता केवळ वेषभूषा, आणि नेपथ्य यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते… मुंबई.. पुणे.. बेळगाव हा भाग सोडला तर ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
– सुधाकर धारव.यवतमाळ

विवेक‘ या सुप्रिता यंदे यांच्या लेखावर पुढील अभिप्राय प्राप्त झाले आहेत.

आपल्या ग्रुपच्या कार्यकर्त्या सौ यंदे यांनी ‘विवेक’ यावर लेखन केले आहे, जे खरोखर चिंतन करण्यासारखे आहे .प्रत्येकाने विवेक बाळगून आपले बोलणे, कामाची पद्धत ठरवावी असे त्या म्हणत आहेत. खूप छान यंदे मॅडम 💐
– सुजाता सातळकर

हा लेख फारच छान आहे. आवडला.
– रागिणी बोगम. ठाणे

अप्रतीम लिहीले आहे.
– श्रीमती कुलकर्णी. डोंबिवली.

Farach chhan 👌🏻
– भीमराव बगाडे

फार सुंदर..💚💙💜
– ईश्वर दत्त वेदक

खूपच छान लेख . आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
– प्रकाश कोरडे. पुणे

Chaan lihale ahe.
Khup chaan 👌👌
Vivek mast 👏🏻👏🏻
– सुरेखा हिंगे. ठाणे

खूपच छान लेख 👌🏻
– Priti yande. Thane

विवेकाबद्दल सुंदर विवेचन
शेखर शिंदे

आर्टिकल छान आहे. माणसाची विवेक बुध्दी तर चांगली हवी. 👌अग खूप खूप छान प्रभा.
– पुष्पा कांबळी. वसई

थोडक्यात काय तर प्रत्येकाने आपली सत सत विवेकबुद्धी जागृत ठेवून वागावे, मनानी आपण काही क्षणात पाहिजे तिथे पोहोचू शकतो. त्यामुळेच हे चंचल मन ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. ज्याला हे जमले तोच जिंकला.
फार छान लेख लिहिला आहे 👌👍👍
– शेखर टेमघिरे

वा ! सुंदर लेख आणि विषय तितकाच सुंदर विचाराचा. जीवनातलं विवेकाचं स्थान ज्याला कळलं तोच सार्थ जीवन जगू शकतो.
सौ सुप्रिता यंदे, लेखिकेसारखे लिहिते. तत्वज्ञानाचे विचार मांडते.विवेकासारखा अंत: करणातल्या दिव्य शक्तीचा तिने या लेखात सुटसुटीतपणे मागोवा घेतला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंत:चतुष्टीत विवेक लोकांना सहसा गवसत नाही.
या शिवाय सौ यंदे गेली अनेक दशकें अतिशय सुरेल गायन करते. संगीताच्या बऱ्याच मैफिली, व्यासपीठं गाजवून ती आता लेखणी हाती घेऊन नव्या मोहिमेवर गेलीय. ही स्वारी जिंकतील असे सर्व गुण तिच्यात संस्कारित आहेत.
– शांताराम चासकर

Suprita, Nice write up. Keep it up.
– Sima

अतिउत्तम…👍🏼👍🏼
– प्रतिभा साबळे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments