हे बंध रेशमाचे
सुंदर बांधले देवाने ते
अमाप कष्टाची प्रेरणा
दिली त्या विधात्याने,
नाही कसले व्यसन
शिस्तीचे पालन
अन् अध्यात्माची गोडी
बेचाळीस वर्ष सहवास
जणू अत्तराचा सुवास,
पिक्चर, नको अन्
कट्ट्यावर बसून…
केवळ सुंदर वैचारिक
करावे सदैव मंथन
अविरत हरीचे मनात चिंतन
दोन पाखरे शिकून
घेतली भरारी,
जाब असो करारी
सदैव गोड विचारी,
स्नुषा, पुत्र, नातू
आज ओळखले सारे
वंशाचे गोंडस द्वार
होईल नक्कीच उद्धार
मृत्यू जरी आला तरी
वंदीन मनाने त्रिवार
वंदीन मनाने त्रिवार….

— रचना : सौ.शोभा कोठावदे नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800
