तुझ्या माझ्या आयुष्यात
एक संध्याकाळ यावी
दोन जीवांना जोडणारी
जणूकाही दुवाच व्हावी
मिलनाची ओढ लागते
पहाताच तुला स्वप्नात
सुखाची बरसात होता
सजवले तुला नयनात
तुझी अर्धांगिनी शोभेल
असाच शृंगार करणार
किणकिणारा हिरवा चुडा
मोरपंखी साडी नेसणार
किनाऱ्यावरील लाटांचे
खेळ ते जणू मिलनाचे
ठेवून डोके खांद्यावर तुझ्या
सुख आहे मिलन पहाण्याचे
सागराच्या लाटा येता
अंगावर शहारे येतात
सुर्यास्त पहात पहात
तुझ्या गोड मिठीत नेतात

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800