हिरण्यकेशी
लगालगागा लगालगागा
लगालगागा लगालगागा
तुला पहावे मला सुचावे तुझ्याच साठी नवे तराणे
तुझ्या घराच्या सभोवताली
फिरावयाचे जुने बहाणे
जगात सा-या सुखी मनाने कसे असावे
कसे जगावे मला विचारा
भल्या सकाळी सुखावते मज तिला पहाणे
भणंग साधू दरी कपारी कशास जातो कसा रहातो
भकास जगती बघत असावा भयाण स्वार्थी असे शहाणे
यथातथाही असेल जगणे खुशाल व्हावे खरे जगावे
फुशारकीने लयास गेले भलेभले अन् किती घराणे
कुठे कुठे मी फिरून आलो जगात शांती कुठेच नाही
मनास जेथे मिळे विसावा चला बघूया अशी ठिकाणे

– रचना : यशवंत पगारे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800