Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यासावरकर पुरस्कार प्रदान

सावरकर पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर येथील स्वा.सावरकर प्रेमी मित्रमंडळ गेल्या 25 वर्षांपासून निरपेक्ष भावनेने, निस्वार्थपणे भक्तीयोग, ज्ञानयोग व कर्मयोग या त्रिसूत्री वर कार्यरत आहे.

या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सावरकरांच्या पुण्यतिथी दिनी, २६ फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर कार्यगौरव पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते श्री योगेश सोमण व श्री. जोगेंद्रसिंह बिसेन, प्र.कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याहस्ते करण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री श्री. शंकररावजी गायकर, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत चे श्री.संजय अप्पा बारगजे अ. भा. सा. सं. संस्कार भारती चे श्री. आशितोष अडोणी, भाऊ सुरडकर, मंडळाचे अध्यक्ष,
संमेलनाध्यक्ष श्री चंद्रकांत शहासणे, संमेलनाध्यक्षा प्रा.स्नेहलताई पाठक, संमेलनाध्यक्षा डॉ.मंगलाताई वैष्णव, सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री.प्रमोद सरकटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

दिपप्रज्वलनानंतर सारेगमप लिटील चॅम्प्स विजेती कु.अंजली गायकवाड हिने सावरकरांची सुप्रसिद्ध रचना “जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे” ही तिच्या अतिशय गोड आवाजात सादर केली. तिला हार्मोनियम वर श्री.अंगद गायकवाड व तबल्यावर श्री. अमर लाठकर यांनी साथ दिली.

श्री.भाऊ सुरडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भुमीतील आम्ही सुपुत्र आहोत याचा आम्हाला अभिमान आहे या वाक्याने सुरवात करून त्यांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. तसेच मंडळाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकानंतर श्री भाऊ सुरडकर यांच्या कार्याचा गौरव श्री योगेश सोमण यांनी केला.

यानंतर स्वा.सावरकर प्रेमी मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री योगेश सोमण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. मराठ्यांच्या संघर्षाचा इतिहासाची उदाहरणे देऊन छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेला आदरांजली वाहिली व 28 मे या सावरकर जयंती रोजी वितरण होणार असलेल्या सावरकरांच्या सेल्युलर जेल मधील कालखंड या वरील व्हर्चुअल रिअॅलिटी चित्रपटाची माहिती दिली.

श्री आशितोष अडोणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वा.सावरकरांप्रती असलेली त्यांची भक्ती व्यक्त केली. विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाची सुरवात केलेले वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनी अश्या सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले.

श्री.शंकररावजी गायकर यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय उत्स्फूर्तपणे गीतेचे उदाहरण देत जीवन कसे जगावे हे सांगितले. आज 25 वर्ष सातत्याने सावरकर प्रेमी मित्रमंडळाने केलेल्या कार्याचा गौरव केला.

श्री.चंद्रकांत शहासणे यांनी मनोगत व्यक्त करताना सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे उदाहरण देताना या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळण्याची व पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी इच्छा व्यक्त केली.

श्री. प्रमोदजी सरकटे यांनी मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या सावरकरांच्या इतिहासासाठी, कार्यासाठी, लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी 25 वर्ष ही संस्था काम करते त्याचा साक्षीदार असल्याचे सांगताना मंडळाला शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. जोगिंदरसिंगजी बिसेन यांनी मनोगत व्यक्त करताना, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा यावर रामायण, महाभारतातील उदाहरण देऊन प्रकाशझोत टाकला. अखंड भारताचे स्वप्न पाहणारे स्वा.सावरकर पुन्हा एकदा आठवावे लागतील… आणि हे सामर्थ्य जनमाणसांमध्येच आहे हे सांगितले. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यातील वैचारिक बदल अतिशय सुंदररित्या मांडले…

अब कोई सपना ना देखे ये भुमी बांट न जायेगी..
जो भुमी बांटने की बात करेगा उसकी जीभ छाट जायेगी…

सावरकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या शब्दात त्यांचे मनोगत व्यक्त केले.

यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे स्वा. सावरकर कार्य गौरव पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये पुढील 25 जणांचा सत्कार करण्यात आला.

1. श्री प्रमोद देशमुख – सैनिकी विद्यालयाचे आधार
2. डाॅ.प्रिती पोहेकर- नाट्यलेखन
3. श्री.स्वराज सरकटे- युवा गायक
4. श्री. अरूणकुमार मुंदडा -संपादक
5. संतोष गर्जे- सामाजिक कार्य
6. श्री अभिजीत धर्माधिकारी-युवा विकास
7. कु.अंजली गायकवाड -शास्त्रीय गायिका
8. सौ. राजश्री महाजन -तंत्रज्ञान
9. श्री. विष्णू मापारी -समाज प्रबोधनकार
10. डॉ.उत्तम काळवणे- योग
11. सौ. सविता कुलकर्णी -सामाजिक समता
12. सौ.मेघना बडजाते-पर्यावरण
13. श्री. मिलींद रथकंठीवार-आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार
14. डाॅ.सौ. सुधा साठे- लेखिका
15. सौ.अस्मिता सिंगोटे-शिक्षक
16. ह..भ.प. जनार्दन मेटे महाराज-सामाजिक समता
17. कु. गौरी कुलकर्णी – युवकांचे प्रेरणास्थान
18. श्री.अनिल महाजन -बलोपासना
19. प्रयास फाऊंडेशन – पर्यावरण रक्षण
20. डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर- प्रतिभासंपन्न लेखक
21. श्री.अभिजीत दळवी – क्रीडा
22. श्री.पार्थ बावस्कर -व्याखाते
23. श्री.प्रणव पटवारी -प्रबोधनकार
24. सौ. अनुराधा पुराणिक – महिला सक्षमीकरण
25. श्री.मुकुंद फुलगीरकर- विज्ञान..

या गौरव मुर्ती यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रविंद्र मगर यांनी केले. बहारदार सुत्रसंचलन, व प्रसंगाला शोभेसे असे त्यांचे वक्तृत्व यामुळे कार्यक्रम अविस्मरणीय झाला.

कु. सृष्टी किरण सराफ हिने आभार प्रदर्शन केले. शेवटी श्री.प्रमोद सरकटे यांच्या वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

“की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे”

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?