सावरकर म्हणजे व्यास आधुनिक
अलौकिक प्रतिभेचा जणू महाकवी !
नतमस्तक होऊनी झुकवितो माथा
दिशादर्शक देशाचा, तळपला रवी !
क्रांतिकारक ते, जेव्हा झाले बंदीवान
हादरले काळेपाणी आणि अंदमान !
नाही डगमगले जरा… नाही झुकलेही
त्याग आणि कर्तव्याचे फक्त ठेवले भान !
नाही केले पूजापाठ, खोटे थाटमाट
‘आपणच विश्वाचा भाग’ दिला दृष्टिकोन
तत्त्वनिष्ठ, चिंतनशील, विज्ञानवादीही
‘गुणदोष स्वीकारावे’ दिला कानमंत्र
वकृत्व-काव्य-साहित्य सावरकरांचे
पूर्णत्वाने कामी आले, स्वातंत्र्य मिळाले.
फडफडला तिरंगा आणि स्वप्न पूर्ण झाले
देशप्रेम जागवुनी आत्मार्पण केले

– रचना : प्रतिभा सराफ.
तळपला रवी ।
दिशादर्शक देशाचा ।
भक्तिभाव विभोर कविता।
प्रेरणादायी शब्दकळा ।
अर्पिले विनायक चरणी ।।
सादर वंदन !
भक्तिभाव विभोर कविता हे मनापासून आवडले. धन्यवाद अरविंद सर!
प्रतिभाताई अतिशय सुंदर झाली कविता🌷
असे क्रांतीवीर पुरुषांना सादर पूर्वक नतमस्तक होऊन नमस्कार 🙏 परत असे थोर पुरुष होणार नाही👍🏻
खरंच थोर पुरुष! लिहावे तितके कमीच…
अतिशय सुंदर झाली कविता 🌷
अशा क्रांतिकार थोर पुरुषांना नतमस्तक होऊन
झुकावे 🙏
असे परत कधी ना होणार👍🏻
धन्यवाद लीलाताई
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला उजाळा देणारी सुंदर रचना ताई👌👌👌👌
धन्यवाद
मनापासून धन्यवाद प्रवीणजी!
धन्यवाद