Wednesday, February 25, 2026
Homeसाहित्यआनंदकंद

आनंदकंद

आदरणीय शाहीर अण्णाभाऊ साठे यांना
जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

आवाज पाहिजे बघ अण्णा तुझ्या डफाचा
फाडून टाकण्याला बुरखा पुन्हा जगाचा

फकिरा नवा लिहाया घे लेखणी नव्याने
आहे गरज नव्याने घे जन्म त्या नराचा

टपले जुनेच वैरी तोडावयास मुंबा
विश्वास राहिला ना तू बांधल्या घराचा

ज्याच्या हजार तारा ते तुणतुणे कशाचे ?
जर एक सूर नाही तो तोड एकदाचा

राजा मनामनाचा तू झोपड्यात होता
घे घे सलाम माझा तुज जन्मल्या दिनाचा

यशवंत पगारे

— रचना : यशवंत पगारे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments