संताची भूमी मंगळवेढे येथील सप्तर्षी प्रकाशन संस्थेच्या वतीने मातोश्री सौ.काशीबाई घुले साहित्य पुरस्कारासाठी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक तथा महाराष्ट्रातील प्रयोगशील बालकवी शफी बोल्डेकर यांची निवड मान्यवर समिक्षकांकडून करण्यात आली आहे.सदरील पुरस्कार “डिझेलगाडी” या बहुचर्चित बालकाव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहे.
शफी बोल्डेकर यांचा ‘आम्ही मराठी मुसलमान’ २००७ हा काव्यसंग्रह ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे. तसेच “डिझेलगाडी” हा बाल कवितासंग्रह बालसाहित्यातला पहिला दीर्घ बालकवितासंग्रह असल्याचे मत ज्येष्ठ समिक्षक प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सत्याग्रही विचारधारा या मासिकातील लेखातून स्पष्ट केले आहे. शफी बोल्डेकर यांचे ग्रंथ अॅमेझानवर वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
या यशाबद्दल शफी बोल्डेकर यांचे ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थाच्या वतीने सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
शफी बोल्डीकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन ….
मनःपूर्वक धन्यवाद आभारी आहे.