Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यनरेंद्र स्तोत्र

नरेंद्र स्तोत्र

नररुपी साधुमहान, राम भक्त जसे मारुती |
नरेंद्र हिराबासूता अतुलित देशभक्ती ||१||

महाबळी देशभक्ता, सकळां आडवे बळे |
सौख्यकारी दुःखहारी, भाजपाई गायका ||२||

दीनानाथा नर रूपा, फिरतो जगदांतरा |
काँग्रेस हेतू हंता, नेटके वस्त्र घालता ||३||

पंतप्रधान लोकप्रिय, गुजरात चा लाडका |
पुण्यवंता पुण्यकर्मा, परदेशी पण आवडता ||४||

ध्वज तुम्ही उंचावला, देशास नेला पुढें |
अरीस काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे चंद्रयान गेले, इसरो ने शिखर गाठले|
चीन अमेरिका जळले, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

अयोध्यास मंदिर दिले, वाराणसी ही केली बरीं |
सुवर्णरूप झाले सोमनाथ, घंटा किंकिणी नागरा ||७||

निश्चय कडक ऐसा, नोकरशाही घाबरे |
चपळांग पाहतां तुमचे, अभिमानाने छाती भरे ||८||

अनेकानेक उड्डाणें, फिरावे विश्व पूर्णपणे |
जिंकता मने विरोधकांची खेळ अनेक तुम्ही करे ||९||

आणली लस तुम्ही कोरोनाची, वाचवले देशास बरे |
दुष्मनांना टाकले मागे, मतीसी तुमच्या तुलना नसे ||१०||

अणुपासोनि पंतप्रधान तुम्ही झाला असे |
वडनगर कुठे, दिल्ही पुढे गुजरात धाकुटे ||११||

विरोडपक्ष करतो आढेवेढें, तुम्ही मात्र कामात असे |
तुलना कामाची कैची, ब्रह्मांडी असा देश भक्त नसे ||१२||

आरक्त होतो आपला डोळा, कोणी भारतास पाहता |
पळवून लावी त्या अरिस, कोणी तयारी युद्धाची करता ||१३||

धनधान्य घरबार, शौच्यालय आणि गॅसही |
दिले खऱ्याखुऱ्या गरिबांना, खूप तपासणी करूनियां ||१४||

नेते अभिनेते सर्व लोक, करतो आदर समस्त विश्वही |
नासती तूटती चिंता, तुझ्या वरच्या विश्वासाने ||१५||

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली आवडली बरी |
दृढदेहो निसंदेहो, तुम्हीच येणार निवडून पुढे ||१६||

रामदासी तुम्ही प्रिय नेता, राम मंदिर बांधून,
राम फक्त अंतरात्म्यात, तुम्हा रामाशिर्वाद मिळती ll१७ll

— रचना : अनला बापट. गुजरात
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments