रेडिओ अँड टेलिव्हिजन प्रोफेशनल असोसिएशन ही एक अतिशय प्रतिष्ठित संस्था आहे. संस्थेच्या वतीने रेडिओ, टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञ आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येत असतात. तसेच यंदा प्रथमच ओटीपी क्षेत्रात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज दिग्दर्शक, छायाचित्रकार असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत .
संस्थेने 2024 या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच केली आहे. पुरस्कारांसाठी प्रवेशिका भरण्याची शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2024 असून त्यासाठी आवश्यक प्रवेशिका संस्थेच्या वेबसाईटवर मिळतील.
संस्थेची वेबसाईट https://rapatrust.com/awards/ अशी आहे.
तरीही इच्छुकांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून द्यावेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार समारंभ संपन्न होईल,
असे रापा चे विश्वस्त रत्नाकर तारदाळकर यांनी कळविले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800