“सावली”
नमस्कार मंडळी.
जग प्रसिद्ध चित्रकार विनसेंट व्हेन गोघ यांनी १८८८ मध्ये काढलेल्या “द सॉवर विथ द सेटिंग् सन” या चित्रातून “सावली” ही कविता करण्यामागची स्फूर्ती मला मिळाली.
या चित्रामध्ये दिसणारा तो पेरणी करणारा शेतकरी, त्याच्यामागे तळपणारा सूर्य, ते पिवळ्या रंगाचं मागे टाकलेले शेत आणि आजूबाजूला दिसणारे कावळे, पायवाट अश्या गोष्टींचा संदर्भ तुम्हाला या कवितेतून नक्कीच जाणवेल.
सावली ही कविता आहे एका शेतकऱ्याची व्यथा. खरंतर अत्यंत काबाडकष्ट करणारे आणि स्वतःला दिवस-रात्र झोकून देणारे शेतकरी, तरीही त्यांना त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या वेदना आपण सर्वांनी बघितल्या आहेत. तरीही नेहमी आशावाद जिवंत ठेवणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाचा मला जाणवलेला हा ठाव माझ्या या कवितेतून मी तुमच्यापुढे सादर करत आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800