Sunday, June 1, 2025
Homeसाहित्यरेघोट्या…

रेघोट्या…

सुख दुःखाच्या रेघोट्या
तुझ्या माझ्या हातावर
सारीपाटाच्या पटात
आपण सारे सोंगाटया

सांजवेळी दिवा हाती
थरथरते दिप वाती
नशिबाचा उंच झुला
वर नभ खाली माती

सावर सावर झुला
फिरे नभ गोल गोल
मनाची हीकाळी माती
आता निर्मळ अबोल

मनाच्याया दारी उभा
पांडुरंग हा साजिरा
तन मन हरविले
उडे गुलाल अंबरा.

काही नाही देणे घेणे
सारा सरला व्यापार
देहाच्या ही पल्याड
माया विठूची अपार

अनुपमा मुंजे

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम