Homeसाहित्यश्रावण : २ कविता

श्रावण : २ कविता

१. श्रावणातले सण

 आला श्रावण साजरा
सजतो सणांचा मेळा
घरोघरी आनंद आगळावेगळा 🪻

शिवमूठ वाही
दर सोमवारी
धनधान्याची बरकत
होई घरोघरी 🪻

नववधू सजली
खेळ खेळी मंगळागौरी
नटूनथटून
घाली झीम्मा, फुगडी🪻

आली नागपंचमी
नागपूजेचा दीवसी
झुला झुलती संवगड्या
दोर झाडाला बांधूनी🪻

येता रक्षाबंधन
भावा बहिणीचे
गोड नात्याचे जुंपण
देई भाऊ बहीणीला
रक्षणाचे वचन🪻

कृष्णा जन्माची गाऊ कहाणी
करू जन्माष्टमी साजरी
थरावर थर सजला उंचावरी
अशी गोपालांची सुरेख दहीहंडी 🪻

साज घालुनी, शिंगे रंगवूनी.
बैल राजा हा सजला.
साध्या भोळ्या शेतकऱ्यांचा
सण आहे हा पोळा🪻

असा श्रावण साजरा
सजतो सणांचा मेळा
पंच पक्वान्न करी
आनंद घरोघरी
त्याचा सुगंध आगळा वेगळा

— रचना : सौ. शितल अहेर. रायगड.

२. श्रावण

म्हणे एके दिवशी
श्रावण आला
म्हणे घन निळा बरसून गेला
छटा आसमंती पसरून गेला

इंद्रधनू नाम दिधले तयाला
दिमाखात तो
बरसत राहिला
ऊनसावल्या खेळवत राहिला

क्षण पाठशिवीचे
घडवत राहिला
धडधड मनाची
वाढवत राहिला

कोणी म्हणे तो
धुरा शांततेची
कोणी म्हणे
वेल चैतन्यतेची

मनाच्या पल्याड
उगा आस “त्याची”
असे रीत न्यारी
श्रावणसरींची

— रचना : सौ. प्रिती लाड. पनवेल

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr. Surekha Vivek Joshi on माझी जीवन नौका : 2
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : 2
प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2