पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता अंतर्गत महात्मा फुले विद्यामंदिर व श्रीमती कांताबेन जे.पी. मेहता ज्युनियर कॉलेज यांच्या सहकार्याने शहरात काल २ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेची सुरुवात हिलदारीचे प्रमुख डॉ. मुकेश कुळकर्णी यांच्या स्वच्छतेचे महत्त्व, कचरा संकलनातील सुरक्षितता व योग्य पद्धती यावरील मार्गदर्शनाने झाली.

विद्यार्थ्यांचे दोन गट पाडून, पहिल्या गटाने महात्मा फुले विद्यामंदिर मुख्य प्रवेशद्वारापासून परिसर स्वच्छ केला तर दुसऱ्या गटाने अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील सुका व प्लास्टिक कचरा गोळा केला.

या मोहिमेत १०० विद्यार्थी व १० शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. हिलदारीतर्फे स्टिक, हँडग्लोव्हज व बॅग्ज उपलब्ध करून देण्यात आल्या. मोहिमेत एकूण १८७ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.


मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. स्वच्छता निरीक्षक सागर बडेकर, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सहाय्यक निरीक्षक गणेश कासुर्डे, शहर समन्वयक ओंकार ढोले, सुरेश मडके, पालिकेचे कर्मचारी तसेच महात्मा फुले विद्यामंदिर व श्रीमती कांताबेन जे.पी. मेहता ज्युनियर कॉलेजचे शिक्षक रामचंद्र वरणे, सुनील कांबळे, दीपक पाटील, सुनील बाबर, शिवाजी सुरवसे, भारती पवार, दिशा कांबळे, वर्षा कासुर्डे व अगरवाल इत्यादींचे सहकार्य लाभले.

हिलदारीचे दीपक मदने, गणेश शेडगे, दिपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे, अस्मिता कासुर्डे व शुभम भंडारे यांनी परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
