Thursday, March 12, 2026
Homeसाहित्यसंविधान महत्व ..

संविधान महत्व ..

नमस्कार .
आज संविधान दिन आहे. त्यानिमित्ताने हे काव्य रुपी अभिवादन. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

संविधान हा राष्ट्रग्रंथ
रे प्रजासत्ताक भारता
महत्व सत्व तत्व कळे
मना असावी गंभीरता

महत प्रयासे लिहिली
संविधानाची संहिता
योगदान भीमरावांचे
सार्थ कथा जन हिता

वैश्विक मूल्य जाणावे
न्याय स्वातंत्र्य समता
संविधान हेचं सांगते
जपे सार्वभौम बंधुता

जात धर्म न् वंश लिंग
प्रांत भाषा विविधता
विसरू सर्वं भेद भाव
अखंड रहावी एकता

उत्तरदायित्व सर्वांचेच
प्रत्यक्षा येवो सिध्दता
समस्तजन रक्षणकर्ता
नितिमूल्य कटिबध्दता

संविधानाचा केंद्र बिंदू
व्यक्ती अन् नितीमत्ता
हा विकास जाहिरनामा
अंमलात सर्वां करिता

जिम्मेदारी खरी त्यांची
ज्याचे हाती असे सत्ता
समस्त जन साथ हवी
वाढे संविधान महानता

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments