पूज्य साने गुरुजींना जयंती निमित्त विनम्र अभिवादन — संपादक
साने गुरुजी समाजसेवक प्रतिभावंत
सृजनशील कवी लेखक क्रांतिकारी भक्त IIधृII
जन्मले रत्नागिरी पालगड खेडेगावांत
घराणे होते त्यांचे वैभव संपन्न श्रीमंत
परिस्थितीने दिला फटका गांव गेले सोडून II1II
पिता छत्र हरपले गुरुजींचे बालवयांत
आईने केले त्यांचेवर संस्कार बालपणांत
मातृ शिकवणुकीनं झाले उच्चशिक्षित II2II
काही काळ शिक्षकी नोकरी केली अंमळनेरांत
शिरले सविनय कायदेभंगाच्या चळवळीत
काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले देश प्रेमार्थ II3II
अनिष्ट रुढीं विरुद्ध लढले भेदातीत
समाज सुधारक झाले बहुभाषा शिक्षित
अंर्तभारती चळवळीने केली भारत जोड II4II
साधना साप्ताहिक काढले देशभक्ती प्रेरित
बहुतांश लेखन भाषांतर केले तुरुंगात
हिंदू धर्मावर लिहिला भारतीय संस्कृती ग्रंथ II5II
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावेत
कविता असंख्य श्यामची आई कादंबरी प्रसिद्ध
मातृभक्ताने स्वीकारले देशसेवा ब्रह्मचर्य व्रत II6II

— रचना : अरुण गांगल. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
