Thursday, February 12, 2026
Homeसाहित्यएक संध्याकाळ…

एक संध्याकाळ…

अशीच एक संध्याकाळ
आठवणीत गुंतलेली
अंतरंगात कुठेतरी
साठवणीत राहिलेली – १

साक्ष अथांग सागराची
हात हातात गुंफलेले
हितगुज दोन जीवांचे
स्वप्नपूर्तीस जुंपलेले – २

अधीरता असे भेटीत
ओढ मनाला लागतसे
सूर्य समोर मावळता
हाती किरण कवडसे – ३

वाळूमधल्या ओल्या रेषा
सवे बसून आखलेल्या
स्वप्ने त्यामध्ये भरताना
लाट येताच पुसलेल्या – ४

अशीच एक संध्याकाळ
विमनस्कपणे भटकतो
अस्वस्थता मनी दाटते
वाट सूर्यास्ताची बघतो – ५

श्रद्धा जोशी

— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11