नमस्कार मंडळी.
होळी, धुळवड आणि रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)
*लीना फाटक मॅडम यांच्या “ओढ” ह्या अभंगावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत*
1
अनंताची ओढ लागली आम्हासी ❤️❤️🙏खूप भावला अभंग. शेवटचा दिस गोड व्हावा. ❤️🙏🌷
☝️☝️
– सौ स्मिता किनरे
2
मला खूप खूप आवडला.
खूप सुंदर अभंग.
-सौ वनिता टोळे, पुणे.
3
अतिशय आवडला अभंग. सर्वव्यापी असेच म्हणतो आपण परमेश्वराला, त्याच्या अस्तित्वाने चेतना आहे, त्याच्याशी बोललो की मनावरचा भार कमी होतो. तोच एकमेव आहे ज्याच्यावर विसावून हे एकटेपण निभावून नेऊ शकतो.
-सुनंदा पानसे, पुणे
4
ओढ, खूपच छान लिहिले आहेस प्रभा मावशी!
संपूर्ण अर्थ समजायला दोन वेळा वाचावे लागले…
कॉन्सेप्ट खूपच आवडला 👌🏻 -महेश साठे, पुणे
5
छान अभंग आहे. अगदी सहज सोप्या शब्दांत मांडलेला.
-कुमार जावडेकर,
स्टॅफोर्ड, इंग्लंड
6
हे काव्य नाही ..
ही अनुभूतीतून स्फुरलीये त्यामुळे त्त्यात वेगळंच रसायन झिरपलंय 🙏🏻निदा फाजलीं चा दोहा आणि तुझी अनुभूती एकतत्व आहेत
-संकेत वारूडकर, अमेरिका
7
लीना ताई अतिशय उत्तम काव्य आहे. कृपया ग्रुप वर शेअर करू शकता तुम्ही.
खूपच सुंदर विचार🙏
Thank you for sharing with me 🙏
-विवेक कुलकर्णी, मॅंचेस्टर
8
आजी अभंग छान जमून आला आहे. 🙏
-ह्रुषीकेश टोळे, वाॅरिंग्टन
9
छान संकल्पना आणि कविता. कवितेचे शिर्षक पण आवडले.
-शैला गोखले, अमेरिका
10
फारच सुंदर कविता,
लीनाताई.
खूप भावपूर्ण आणि विचार करायला लावणारी.
-सौ मीरा पट्टलवार,
रनकाॅर्न, इंग्लंड
11
वा, फारच सुंदर लिहिले आहे 💐🙏🙏
-केशव फडणीस,इंग्लंड
12
तुझा अभंग वाचलाअप्रतिम आहे. धन्यवाद,
-वृंदा जोशी, इंग्लंड
13
छान. लिंकवर क्लिक करून वाचला.पण तिथे कमेंट करणे जमले नाही.
छान झालाय अभंग.
लिहित रहा.
-सदानंद डबीर, मुंबई,
(यांचेच नाव “मनोगत” मधे आहे. )
14
खूप छान आजी 🤗
-स्वप्ना गोरे, वाॅरिंग्टन
15
आदरणीय लीनाताई,
सकाळी WhatsApp वर नियमित येणारे छान लेखन, काव्य,विनोद. बघून माझी सकाळ छान सुरू होते.
आज तुमचा” ओढ “हा अभंग कसा आणि कोणत्या संदर्भातून प्रकट झाला .हे नीला मुळे मला ही वाचून आनंद घेता आला.
सर्व प्रथम तुमचे वाचन आणि त्या बद्दल चे सखोल चिंतन, मनन करून नेमका अर्थ शोधून आपले विचार, भावना, कल्पकता आपल्या शब्दात, कथा, काव्यात आणि लेखात दिसते याचे खूप कौतुक वाटलं.
श्री. डबीर यांनी केलेला नीदा फाजली यांचा एक दोहा “बच्चा बोला देख मस्जिद “हा भावानुवाद, लेखन वाचून किती उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्या शब्दबद्ध केलेल्या या “ओढ “अभंगातून मलाही अंतर्मुख करून गेला.
वंदी ते चरण —-अखंडित (5)
या चार ओळी परमेश्वराला
फार योग्य विनंती करणाऱ्या आहेत. शिवाय
“अंतराळयाच्या घराच्या
जन्म आणि मृत्यू ही दारे “तुमचे
मन आणि बुद्धी अशी मागणी,
ओढ हाच नेमका शब्द “अभंग”
निर्मितीसाठी वापरून मानसिक तळमळीने केलेली ही प्रार्थना मीही करते.
ताई तुला खाली वाकून नमस्कार 👏👏👏
– सुनंदा रानडे फाटक, भारत
लीना फाटक मॅडमना काही जणांनी फोन करून आवडल्याचे कळवलेय. त्यांच्या बहिणीने स्वतः त्याला चाल लावून लगेच गाऊन पण दाखवला व रेकॉर्ड करुन पाठवला. एका भावाने पण रेकॉर्ड करून पाठवलाय. आपल्यासाठी तर हे खूपच मानाचे वाटतेय. ..
*|| वेड्यांचा बाजार, शहाणे बेजार || ह्या लेखावर प्राप्त प्रतिक्रिया …*
1
स. न.वि.वि.
‘ न्यूज स्टोरी टुडे ‘ हा आपल्या लोकप्रिय ‘पोर्टल’चा अंक वाचनीय झालाय. छान. आवडला.
डॉ विजय पांढरीपांडे यांच्या
|| वेड्यांचा बाजार, शहाणे बेजार || ह्या लेखाचा खास उल्लेख करावा लागेल एवढा तो वास्तववादी आहे.हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह .
– नंदकुमार रोपळेकर
– मुंबई.
2
वेड्यांचा बाजार… लेख वाचल्यानंतर असे वाटते की,
या जगात आल्यानंतर आमच्याकडून चार मोठी कामे होऊन गेलीत.
१. मॅगी येण्यापूर्वीच आम्ही मोठे झालो.
२. मोबाईल येण्याआधी आमचे शिक्षण पूर्ण झाले.
३. व्हाट्सॲप येण्यापूर्वीच आमचे लग्न आटोपले.
4. AI येण्यापूर्वीच निवृत्त. झालो.
आजचे सीनियर सिटीजन त्यामुळेच सुखी आहेत!
– प्रा चंद्रकांत
*“स्वातंत्र्यवीर सावकारांची जाज्वल्य पत्रकारिता” ह्या शोध निबंधावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया* …
1
भुजबळ साहेब,आपले
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि योगदान या बद्दलचे लेख खूप आवडले. त्यांना एका विशिष्ट गटाने बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्याची किमया अगाध आहे असे माझे मत आहे.
– निरंजन राऊत, विरार.
2
सावकारांची जाज्वल्य पत्रकारिता..हा लेख छान, अभ्यासपूर्ण आहे .आणि विषय नवा आहे. अभिनंदन.
– अनुराधा जोशी, मुंबई.
3
नमस्कार सर,
आजच्या पोर्टलमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आपले दोन्ही लेख अतिशय सुंदर. त्यांची अखंडित निर्भीड पत्रकारिता सेवा,सुस्पष्ट विचार, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, समाजाभिमुखता आपणांस खरोखरच थक्क करून सोडते. किती अंगानी थोर होती ही व्यक्ती! अशा या अलौकिक राष्टभक्ताची थोरवी सांगणारे आपले लेख वाचून पुन्हा एकदा त्यांच्याबद्दलचा अभिमान दाटून आला.
सिडनी येथील चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात आपण (देवेंद्र भुजबळ) ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ या विषयावर दिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानावर प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा श्री. नागेश शेवाळकर यांनी खूपच सुंदर परिचय करुन दिला आहे.
-श्रद्धा जोशी,डोंबिवली.
*सौ रश्मी हेडे ह्यांच्या “मैत्रीची चाहूल” या कवितेला मिळालेल्या प्रतिक्रिया* . ….
१)खरंच मैत्री असणे व ती टिकवणे हेच श्रीमंतीचे लक्षण आहे.खूप छान कविता रश्मी ! 👌🏻👌🏻👍🏻
-सविता हेडे.
२) माझी प्रिय मैत्रीण रश्मी तू लिहलेली मैत्रीची चाहूल ही कविता मनाला खूपच भावली. खूप उत्कृष्ट रचना झाली आहे. असे मैत्रीचे आनंदवन प्रत्येकाच्या आयुष्यात बहरावे..👌👌👍👍
विशाखा खुटाळे. सातारा
३) अगदी असेच होते तुम्हा सर्वांची आठवण येते तेव्हा. 😞
खूप छान कविता 👌👌
संगीता पालकर. पुणे
४) रश्मीताई.
तुमची ” मैत्रीची चाहूल ” ही कविता वाचली, खूप छान कविता लिहिली आहे.
प्रत्यक्ष शब्द अर्थपूर्ण आहे.
न कोणते हेवे दावे…
येथे सुखाचे मिळावे….
न सांगता मन वाचावे….
खूप छान शब्दरचना.
नेहमी लिहित रहा….
शुभेच्छुक
मदन कोकीळ,कराड.
५) 🙏 रश्मी ताई मैत्रीची चाहूल खूप छान लिहीले आहे. खरच कविता वाचताना मैत्रीचे कवाडे उघडत गेले. काही आठवणीने डोळे भरून आले. मैत्रिणी खूप असतात. पण मैत्रीणीचे नकळत मन जाणून घेणारी अगदी प्रत्येक वेळी सोबत करणारी एकच असते आणि ती खरी मैत्रीण असते. ताई वाचून खूप छान वाटले. मैत्रिणच समोर उभी राहिली. खूप छान लेखणी आहे तुमची. असेच छान लेख, कवीता नेहमी लिहील्या जावो. खूप खूप शुभेच्छा.💐🙏
अनिता येवारे. कराड
६) वाह रश्मी छान 👌🏻👌🏻
सुनीता गजर्मल. पुणे
७) छान लिहिलेली आहे कविता🌹🌹🌹
महेश कोकीळ. सातारा
८) मैत्रीची खूप सुंदर कविता लिहिले आहे रश्मीताई खरोखरच वाचून छान वाटले
मनःपूर्वक अभिनंदन🌹🙏
ज्योती यंदे. पुणे
९) खूपच छान
आरती झुंजूरके. पुणे
१०) 👌👌 खूपच सुंदर मला खूप आवडली.
अलका जगदाने. नाशिक
११) खूप छान विचार 👍🏻
साधना इंदूरकर. अमरावती
१२)खूप छान,,,👌👌👌 रचना,,,
मनोज मांडेकर. ( अकोट )
१३) खरेच खूप छान कविता आहे मैत्री वर 👌👌👌
अर्चना जाधव.
१४) सुंदर 👌👌👌❤️
ज्योती मुरुडकर. सातारा
१५) सुंदर शब्दरचना
ऍड लीना आढे. पुणे
१६) फारंच सुंदर 👌
राजू ओसवाल. सातारा
१७) प्रत्येकाचे रिमार्क्स एकदम परफेक्ट 👍
वेळात वेळ काढून सर्व करतेस हे फार कौतुकास्पद आहे. अशीच करत रहा ह्यासाठी शुभेच्छा 😊
सुरेखा गाडेकर.
१८) 👍मैत्रीची चाहूल कविता वाचली मला फार आवडली मैत्री बद्दल खूप छान लिहिले आहे.
माणिक तंटक. पुणे
१९) खूप छान 🫶👍👌👌👌
ज्योती कासार. सातारा
२०) खुप सुंदर वर्णन केले आहे मैत्रीचे अगदी खऱ्या मैत्रीची चाहुल 👌👌👍👍
संगीता सासवडे. पुणे
२१) उत्कृष्ट काव्य लेखन
सदाशिवराव केशवराव मेटागळे सेवानिवृत्त उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर
२२) खूप छान कविता आहे अशीच मैत्री आहे आमची खूप छान👌🏻👌🏻
प्रियांका झुटिंग.
२३) एकच नंबर कविता खूप सुंदर 👌👌👍👍👍
भाग्यश्री कुंदप.
२४) वाह !! ही पण मस्त आहे कविता 👌🏻
स्नेहा देवी. सातारा
२५) खूप सुंदर मैत्रीचे वर्णन वाचल्यावर गाणे आठवते दिल चाहता हे कभी न बिते चमकिले दिन ✨✨
स्वाती कासार. नाशिक
२६)👌👌👌, खूप छान कविता 😇
आशा गोरे. मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
