सोनं कधीही घ्या
अक्षय तृतीयेचा मुहूर्त कशाला
प्रयत्न, कष्ट चालू राहू दे
ठेवा सोनेरी स्वप्न उशाला.
सोनं एक धातू आहे
तो जादूगार नाही मित्रा
सुख, शांती, समृध्दीला
समाधानी ठेवा मनाला
काम करा, नेकीने जगा
अर्थ मिळेल आयुष्याला
त्यासाठी सोनं कशाला ?
ठेवा सोनेरी स्वप्न उशाला .
शेतकरी असा ,शेती करा
कामगार असा, काम करा
मच्छिमार असा, मासे धरा
कलाकार असा, ध्येय्य धरा
येतील समस्या त्या सोडवा
आपले आयुष्य घडवायला
त्यासाठी सोनं कशाला ?
ठेवा सोनेरी स्वप्न उशाला.
— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवीमुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
