Homeसाहित्यपुस्तक दिन : काही कविता

पुस्तक दिन : काही कविता

आज जागतिक पुस्तक दिन आहे. त्यानिमित्ताने काही कविता सादर करीत आहे. पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

1) सहवास पुस्तकाचा

पुस्तकाचे सहवासात
लाभे ज्ञानाचा खजिना
वाचन एकचित्त करतात
आनंद मिळतसे जीवना…1

वाचनाने लाभे प्रसन्नता
वाढ होतसे स्वज्ञानात
व्यक्तीत होई प्रगल्भता
परिस्थिती हाताळण्यात… 2

स्वभावात सहिष्णूता
ज्ञानाचा असे भांडार करण्यासाठी
वाचनाने येतसे नम्रता
उघडती मनामनाचे द्वार…. 3

नियमित गे वाचनाने
वळण मिळे जीवनास
पुस्तकास चाळताने
जाणवते ज्ञानकुंभ भास… 4

असती गुरु सकलांचे
विविध पुस्तकेच खरे
वाचन करावे नेमाने
ही ज्ञानरूपी भांडारे… 5

मानले तर मित्र भासे
नाहीतर रद्दी जमा होते
ठरवावे की ज्याने त्याने
स्वतः काय व्हावे त्याते…. 6

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे

2) पुस्तक वाचन

पुस्तक प्रयोगशाळा करी समृद्ध जीवन
असते मार्गदर्शक गुरु भांडार ज्ञान ।।धृ।।

असते पुस्तक वाचन शांत संभाषण
करते विहार मने अनोख्या प्रदेशांतून
किमया असते शोधण्याची काही हरवून ।।1।।

बदलवते स्वतःला तपासून घडवून
असते आचार सुप्त संभाषण सांत्वन
उभारी देते बहुमूल्य सामर्थ्य आनंद ।।2।।

बनवते विभोर अंतर मनांत जाऊन
असते अस्तित्व शरीर आत्मा मित्र राहून
वाढवते प्रतिष्ठा प्रतिभा सुसंस्कृत पण ।।3।।

असते पुस्तकाला पाठ पोट चेहरा पान
पान शोधण्यासाठी असते निशाण खूण
करावयाचे असते पानातील रसग्रहण ।।4।।

– काव्य : अरुण गांगल. कर्जत -रायगड

3) ग्रंथ माझा सखा

ग्रंथ माझा सखा
ग्रंथ माझा सोबती
पुस्तकाच्या दुनियेत
‘मी’ ला असते शोधत

होते मस्त मनोरंजन
सापडती गमती जमती
हसत सुटते खोऽ खोऽऽ
कधी डोळे ही पाणावती

ग्रंथाच्या अद्भूत विश्वात
क्षणात हिमालयाच्या कुशीत
कधी विहार करते लद्दाखच्या
रांगड्या रुपेरी चंदेरी सौंदर्यात

कवितेचं विश्वच असतं न्यारं
बोटं धरुन घेऊन जाते दूर दूर
हिरव्यागार वनराईत असतो
तो, मी अन् माझी कविता

कधी खुणावतात दुर्गाबाई
वि. स. पु. ल. रणजित देसाई
रानडे बाई नेतात अफगाणला
मस्त रमते अक्कमहादेवीच्या वचनात

जगण्याचा मार्ग दाविला
मनन चिंतनाचा वसा दिला
तुझ्याजवळ ठेवू नकोस
ज्ञानाचा दासोह करविला

सख्या ! ऋणी असेन सदैव
समृद्ध केलेस तू मला
निरंतर घडो तुझा सहवास
मनी अखंड हीच फक्त आस….

— रचना : काव्य प्रभा. लातूर

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments