अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल हवा त्या निमित्ताने ही विडंबन कविता….
शांततेचा नारा देत,
रणधुमाळी पेटवतो,
हातात कबूतर ठेवून,
बॉम्बचाही हिशोब ठेवतो…
पुरस्कारासाठी अर्ज
त्याचा दरवर्षी जारी,
भाषणात वेडेपणा,
कृतीत अंगार भारी!
सागरात सुरुंग,
शहरात भय,
पण मंचावर म्हणे
शांतता ही माझी सवय
हात जोडून
घेतो सन्मान,
मागे चालू त्याचेच
षडयंत्र महान…
फोटोमध्ये हसू,
कागदावर करार,
पण रात्री गुपचूप
युद्धाचा नवा थरार !
जनतेला देतो तो
रोज गोड स्वप्न,
शांततेसाठी लढतो
नको तुमचे विघ्न !
शांतता पुरस्कार
त्यालाच हवा असतो,
जगाचा आवाज दाबून
शांतीचे नरडे घोटतो…
विडंबन हे हेमंतचे
त्यात संदेश खास,
शांततेच्या नावाखाली
प्रसिद्धीचा हव्यास !

— रचना : हेमंत सुधाकर सामंत. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
